साबणाची क्वालिटी नाही तर ‘या’ मराठी अभिनेत्रीचे सौंदर्य बघून इंग्रजांनी देखील साबण विकत घेण्यास सुरवात केली होती..

साबणाची क्वालिटी नाही तर ‘या’ मराठी अभिनेत्रीचे सौंदर्य बघून इंग्रजांनी देखील साबण विकत घेण्यास सुरवात केली होती..

जाहिरात हे माध्यम असे आहे की, या माध्यमातून आपल्या उत्पादनाचा प्र’भाव हा आपण ग्राहकांवर पाडू शकतो. जी लोक जाहिरात करत नाहीत किंवा जी कंपनी आपल्या उत्पादनाची अधिक जाहिरात करत नाही. त्यांचे उत्पादन हे विकल्या जात नाही. याचे कारणही तसेच आहे. आपण उत्पादन केलेले एखादी वस्तू दर्जेदार असेल.

मात्र, ती लोकांपर्यंत जर पोहोचलीच नाही तर त्याचा काय उपयोग. त्यामुळे जाहिरात हे माध्यम अतिशय प्रभावशाली आहे. त्यातल्या त्यात आपण एखाद्या सेलिब्रिटी ला घेऊन जर जाहिरात केली, तर आपल्या उत्पादनाची ब्रॅण्डिंग ही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या आपले उत्पादन विकण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि कलाकारांना तसेच खेळाडूंना जाहिरात करण्यासाठी घेतात.

त्यासाठी त्यांना को’ट्यव’धी रु’पये मोजत असतात. एखाद्या कलाकाराने आपल्या उत्पादनाची जाहिरात केली आणि तो कलाकार जर लोकप्रिय असेल तर त्याचा परिणाम हा सर्वसामान्य यावर होत असतो आणि सर्वसामान्य व्यक्ती हा ते उत्पादन घेण्यासाठी आग्रही असतो. त्याबाबत दुकानदाराकडे देखील मागणी करत असतो.

त्यामुळे ब्रँडिंग व जाहिरात हे दोन्ही परस्परराशी संबंधित असे आहेत. त्यामुळे जाहिरातीला गेल्या काही वर्षात खूप महत्त्व आले आहे. आपण टीव्हीवर अनेक प्रकारच्या जाहिराती पाहत असतो. साबणाची जाहिरात असते. साबण जाहिरात मध्ये साधारणत महिला यांचा समावेश असतो.

मात्र, काही वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेल्या लक्स या उत्पादनाने आपल्या जाहिरातीसाठी चक्क अभिनेता शाहरुख खान याला साइन केले होते. आजवर ज्यांनी ज्यांनी लक्स या जाहिरातीत काम केलेले आहे. अशा सर्व अभिनेत्रींसोबत शाहरुख खान दिसला होता. ही जाहिरात अनेकांना खूप आवडली होती.

त्यामुळे लक्स उत्पादन हे मोठ्या प्रमाणात वाढले होते आणि त्यांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत होती. लक्स साबणाच्या जाहिराती मध्ये आजवर ऐश्वर्या राय, करीना कपूर, माधुरी दीक्षित, महिमा चौधरी यांच्यासह जवळपास सर्वच अभिनेत्रींनी काम केले आहे. त्यांनी लक्स साबण वर आपला फोटो छापण्यास देखील परवानगी दिली होती.

त्यामुळे त्याचा प्रभाव सर्वसामान्यवर पडला आणि लक्सचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र, आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये लक्स या उत्पादनाची सर्वात आधी जाहिरात कोणी केली होती, याची माहिती देणार आहोत. आपण अशोक कुमार यांचा कंगन हा चित्रपट पाहिला असेल. या कंगन चित्रपटांमध्ये एक अभिनेत्री दिसली होती.

या अभिनेत्रीचे नाव लीना चिटणीस असे होते. लीना चटणीस या महाराष्ट्राच्या पहिल्या ग्रॅज्युएट वूमन असल्याचे देखील समजले जाते. 1936 मध्ये त्यांनी छाया चित्रपटात काम केले होते. त्यांचा हा चित्रपट खूप चालला होता. त्यांचे लग्न देखील झाले होते. त्यांना चार मुले होती. मात्र, त्यानंतर त्यांनी पतीपासून विभक्त राहणे पसंत केले होते.

लीना चिटणीस या प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच्या पणजी होत. लीना चटणीस यांनी जंटलमन डाकू या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपट ऑफर देखील मिळाल्या. 1955 मध्ये त्यांनी आज की बात हा चित्रपट केला होता. शहीद या चित्रपटात त्यांनी दिलीपकुमार यांच्या वडिलांची भूमिका केली होती.

वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे नि’धन झाले होते. जुन्या काळी सुंदर अभिनेत्रींपैकी एक अशी त्यांची ख्याती होती. लीना चिटणीसांनी सगळ्यात आधी म्हणजे 1941 मध्ये लक्स साबणाची जाहिरात केली होती. त्यावेळी त्यांना सर्वांनी वेड्यात काढले होते. मात्र, त्यांनी केलेली जाहिरात ही योग्य होती, हे आता सर्वांनाच समजत आहे.

त्यांनी जाहिरात केल्यानंतर लगेच उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढले होते. लीना चिटणीस यांनी साबणाची जाहिरात केल्यानंतर लोकांनी साबण वापरणे सुरू केले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.