लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही झी मराठीवरील ‘या’ ३ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? येणार नवीन ३ मालिका..

लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही झी मराठीवरील ‘या’ ३ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? येणार नवीन ३ मालिका..

झी मराठीवरील मालिकांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. या वाहिनीवरील मालिकांनी टीआरपीचे नव-नवे विक्रम कायम केले आहेत. राधा ही बावरी, तू तिथ मी, माझ्या नवऱ्याची बायको, लगीर झालं जी, तुला पाहते रे या मालिका चांगल्याच हिट ठरल्या.

‘जय मल्हार’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ सारख्या ऐतिहासिक मालिकांनी तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या वाहिनीवर येणाऱ्या अनेक मालिकांनी, कलाकरांना नवी ओळख मिळवून दिली. सा रे ग म प, फु बाई फु, चला हवा येऊ द्या सारखे रियालिटी शो कित्येक वर्षांपासून रसिकांचे मनोरंजन करत आहेत.

त्यामुळे झी मराठी वाहिनीचा टीआरपी कायमच चांगला असतो. सध्या देखील झी मराठीवर काही मालिकांनी धुमाकूळ घातला आहे. माझा होशील ना, देवमाणूस, येऊ कशी तशी मी नांदायाला, कारभारी लयभारी, अग्गबाई सुनबाई, या मालिका सध्या चांगल्याच रंजक वळणावर असलेल्या दिसत आहेत. यामधील काही मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

म्हणूनच लवकरच आता यापैकी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मोहन जोशी, गिरीश ओक,निवेदिता सराफ यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अग्गबाई सासूबाई या मालिकेमधून लोकप्रियतेचा उच्चंक गाठला होता. तेजश्री प्रधानने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, मेकर्सने याच मालिकेला कलाटणी देत ‘अग्गबाई सूनबाई’ मालिका काहीच महिन्यांपूर्वी सुरु केली.

मालिकेची सुरुवात चांगलीच दमदार झाली होती आणि मालिकेच्या पहिल्या भागाप्रमाणेच या मालिकेने देखील चांगलीच लोकप्रियता कामवाली. आता मालिकेला काही वेगळं वळण मिळाल्याचं बघायला भेटलं. मात्र आता मालिका बंद होणार असल्याचं चित्र समोर येत आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेचं पुढील नवं पर्व म्हणूनच ‘अग्गबाई सूनबाई’ हे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं.

अवघ्या चारच महिन्यात ही मालिका गुंडाळण्यात येत आहे. सासूबाई वर आधारित असं पाहिलं पर्व होतं तर दुसरं पर्व हे सूनबाई वर आधारित आहे. या दुसऱ्या पर्वात आसावरी म्हणजेच शुभ्राची सासू आपल्या मुलाच्या विरोधात जाऊन सत्याची म्हणजेच आपली सून शुभ्रा हिची साथ देत आहे असं दाखवण्यात आलं होतं.

आता ती शुभ्राला दगाबाज सोहमला सोडून जाण्यासाठी देखील मदत करत आहे, असं कथानक बघायला मिळत आहे. मात्र लवकरच मालिकेचं शूटिंग पूर्ण होणार असून मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. या मालिकेला सर्वात जास्त निगेटिव्ह प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर कारभारी लयभारी हे मालिका देखील बंद होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देवमाणूस मालिका बंद होणार नसून या मालिकेच्या वेळात बदल होऊ शकतो. लेखक व दिग्दर्शक असलेले तेजपाल वाघ यांची मन झालं बाजिंद ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या आठवड्याभरात झी मराठीने तीन नवीन मालिकांचे प्रोमो प्रदर्शित केले आहेत.

ती परत आलीये, माझी तुझी रेशीमगाठ, मन झालं बाजिंद या तीन मालिका लवकरच प्रसारीत होणार आहेत. ती परत आलीये ही मालिका येत्या १६ ऑगस्टपासून रात्री १०.३० वाजता दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना देवमाणूस मालिका बंद होणार का हा प्रश्न पडला होता.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *