लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही झी मराठी वरील ‘या’ 3 मालिका होणार बंद ?

झी मराठीवरील मालिकांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. या वाहिनीवरील मालिकांनी टीआरपीचे नव-नवे विक्रम कायम केले आहेत. राधा ही बावरी, तू तिथ मी, माझ्या नवऱ्याची बायको, लगीर झालं जी, तुला पाहते रे या मालिका चांगल्याच हिट ठरल्या.
‘जय मल्हार’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ सारख्या ऐतिहासिक मालिकांनी तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या वाहिनीवर येणाऱ्या अनेक मालिकांनी, कलाकरांना नवी ओळख मिळवून दिली. सा रे ग म प, फु बाई फु, चला हवा येऊ द्या सारखे रियालिटी शो कित्येक वर्षांपासून रसिकांचे मनोरंजन करत आहेत.
त्यामुळे झी मराठी वाहिनीचा टीआरपी कायमच चांगला असतो. सध्या देखील झी मराठीवर काही मालिकांनी धुमाकूळ घातला आहे. माझा होशील ना, देवमाणूस, येऊ कशी तशी मी नांदायाला, कारभारी लयभारी, अग्गबाई सुनबाई, या मालिका सध्या चांगल्याच रंजक वळणावर असलेल्या दिसत आहेत. यामधील काही मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
म्हणूनच लवकरच आता यापैकी तीन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मागील वर्षी लॉकडाउनच्या काळात छोट्या पडद्यावरील मालिकांचे शूटिंग थांबले होते. त्यावेळी मालिकांचे नवीन एपिसोड प्रसारीत करण्यासाठी नव्हते. अशावेळेला वाहिनीवर चित्रपट आणि जुन्या मालिका प्रसारीत केल्या जात होत्या.
मात्र त्यानंतर आता बऱ्याच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. पण त्यातील आता काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत मालिका टिकत नसल्यामुळे मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पहायला मिळाले. याच यादीत आता आणखी दोन मालिकांची भर पडण्याची शक्यता आहे.
सध्या चर्चेत असलेली मालिका ‘देवमाणूस’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी आता नवीन मालिका दाखल होते आहे. या मालिकेचे नाव आहे ती परत आलीये. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विजय कदम वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे. तसेच कारभारी लयभारी ही मालिका देखील आता शेवटच्या टप्प्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.
त्यामुळे मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. चार महिन्यांपूर्वी ‘अग्गंबाई सासूबाई’चे नवीन पर्व ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिका दाखल झाली. पहिल्या पर्वात सासूच्या पाठीशी सून आणि आता दुसऱ्या पर्वात सूनेच्या पाठीशी सासू असे दाखवण्यात आले आहे.
मात्र मालिकेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मालिका संपवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे म्हटले जात आहे. या महिन्याच्या अखेरीस मालिकेचे शूटिंग पूर्ण होईल. तर ऑगस्टमध्ये मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे बोलले जात आहे.