विराट अनुष्काने १६ कोटी जमा करून वाचवले चिमुकल्याचे प्राण, पहा ‘या’ दुर्मिळ आजाराने होता ग्रस्त..

विराट अनुष्काने १६ कोटी जमा करून वाचवले चिमुकल्याचे प्राण, पहा ‘या’ दुर्मिळ आजाराने होता ग्रस्त..

को’रोनाच्या या सं’कटाच्या काळात समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती आपल्याला जमेल तशी मदत गरजूना करत आहे. कोणी अन्न पुरवठा तर कोणी औषधांची सोय करत आहे. प्रत्येकाची मदत आणि साथ यामुळेच या सं’कटाच्या काळातून आता देश सावरत असलेला बघायला मिळत आहे. प्रत्येकाची मदत हि मोलाची आहे. यामध्ये काही सेलिब्रिटीज आपली नैतिक जबाबदारी म्हणून समाजसेवेसाठी तत्पर असलेले बघायला मिळत आहे.

गेल्या काही काळापासून, भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दाम्पत्य को’रोनाच्या या दुसऱ्या लाटेत देशातील लोकांना आणि गरजूंना भरभरून मदत करत आहेत. को’रोनाच्या उपचारांकरिता गरजू रु’ग्णांना मदत करता यावी यासाठी त्या दोघांनी सोशल मीडिया कॅम्पेनद्वारे निधी देखील उभा केला होता.

को’रोना रु’ग्णांना आणि त्यांच्या कुटुंबाना मदत करण्याव्यतिरिक्त अनुष्का-विराट या सेलिब्रिटी दाम्पत्याने ‘अयांश गुप्ता’ नावाच्या एका छोट्या मुलाचे प्राण वाचवले असल्याचे समोर आलं आहे. स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या दुर्मीळ आ’जाराशी तो चिमुरडा लढा देत आहे.

त्याच्यावरच्या उपचारांसाठी झोल्गेन्स्मा नावाच्या औषधाची अत्यंत गरज होती. औषध जगातल्या अत्यंत महागड्या औषधांपैकी हे एक असून, त्याची किंमत तब्बल १६ कोटी रुपये आहे. एका औषधासाठी एवढे पैसे मोजणं सर्वसामान्यच काय तर श्रीमंतांनाही सहज शक्य नाही. सर्वसामान्य माणसांकडे एवढे जास्त पैसे असणं शक्यच नाही.

पण अयांशच्या आईवडिलांनी आपल्या चिमुरड्याला वाचवण्यासाठी हार मानली नाही. त्यांनी आपल्या अयांशचे प्राण वाचवण्यासाठी AyaanshFightsSMA नावाचं एक ट्विटर अकाउंट सुरू केलं आणि ऑनलाइन फंडरेझर मोहिमाही सुरू केल्या. दरम्यान, या सगळ्याचा खूपच चांगला उपयोग झाला,आ णि त्या लहानग्यासाठी १६ कोटी रुपये उभे राहिले. त्याच ट्विटर अकाउंटवर हे जाहीर करण्यात आलं.

‘अयांशचे प्राण वाचवण्यासाठी सुरू केलेला हा अवघड प्रवास इतक्या सुरळीतपणे पार पडेल, असं वाटलं नव्हतं. झोल्गेन्स्मा औषधासाठी १६ कोटी रुपये उभे झाले आहेत, हे सांगताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. आम्हाला साह्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खूप खूप धन्यवाद. हा तुमचा विजय आहे. आपण सर्वांनी हे करून दाखवलं,’ अशी भावनिक पोस्ट या ट्विटर अकाउंटवर अयांशचे आई-वडिल रूपल आणि योगेश गुप्ता यांनी शेअर केली आहे.

या दाम्पत्याने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे विशेष आभार मानले आहेत. ‘आम्ही चाहते म्हणून कायमच तुमच्यावर प्रेम केलं; पण अयांशसाठी आणि या मोहिमेसाठी तुम्ही जे काही केलं आहे, ते आमच्या अपेक्षेपलीकडचं आहे. खूप आभार. आयुष्याची ही लढाई षट्कार मारून जिंकण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केलीत.

आम्ही कायमच तुमच्या ऋणात राहू,’ अशा शब्दांत रूपल आणि योगेश गुप्ता यांनी विराट-अनुष्काचे आभार मानले आहेत. दिया मिर्झा, अर्जून कपूर, सारा अली खान,राजकुमार राव, जावेद जाफरी, इम्रान हाश्मी, नकुल मेहता, ऋत्विक धनजानी हे सेलेब्रिटी देखील या मोहिमेत सहभागी झाले असल्याचं या ट्विटर अकाउंटवरच्या ट्विट्सवरून दिसतं आहे.

अयांशला असलेला स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी हा दुर्मीळातला दुर्मीळ जनुकीय वि’कार आहे. १० हजारांत एखाद्या मुलाला तो आ’जार होतो. नर्व्ह सेल्सना क्रियाशील ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रोटीनची निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेलं एक जीन अयांशच्या श’रीरात नाही.

म्हणून त्याच्यावर जीन थेरपी इन्फ्युजन करावं लागणार आहे. हि थेरपी एकदाच करावी लागते. मात्र, एकदाच कराव्या लागणाऱ्या या उपचारांचा खर्च २.१ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १६ कोटी रुपये आहे. हा निधी आता उभा झाला असल्यामुळे अयांशचे प्राण वाचणार आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *