अभिमानास्पद ! संकटाच्या काळात ‘हा’ मराठी अभिनेता बनलाय को’रो’ना वॉरियर, पहा २ वेळा को’रो’ना होऊनही करतोय २४ तास ड्युटी….

अभिमानास्पद ! संकटाच्या काळात ‘हा’ मराठी अभिनेता बनलाय को’रो’ना वॉरियर, पहा २ वेळा को’रो’ना होऊनही करतोय २४ तास ड्युटी….

गोलमाल असेल की सिंघम, किंवा बोल बच्चन रोहित शेट्टीच्या जवळपास सर्वच सिनेमांमध्ये आपण विकास कदमला पहिले आहे. छोट्याश्या पात्रात देखील तो आपली वेगळी छाप सोडत आपल्याला हसवून जातो. मात्र श्रीयुत गंगाधर टिपरे ह्या मालिकेमधील सर्वच पात्रांनी आपल्या सर्व रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आणि त्यातूनच विकास कदम ह्याला ‘शिऱ्या’ म्हणून नवीन ओळख मिळाली.

हा शिऱ्या अर्थातच आपला विकास कदम आता को’विड वॉरिअर म्हणजेच को’रो’ना यो’द्धा बनला आहे. आपल्या कामाने तो अनेकांना थ’क्क करत आहे, हे आपल्यापैकी बऱ्याच जाणं माहीतही नसेल. चोवीस तास व ड्युटी राहून आपल्या कामाने विकास सर्वाना आ’श्चर्याचा ध’क्का देत आहे व त्यामुळे त्याचे सगळीकडून कौतुक देखील होत आहे.

विकास ने रोहित शेट्टीच्या जवळपास सर्वच सिनेमांमध्ये काम केले असले आणि त्याची भूमिका लक्षात असली तरीही आज देखील आपल्या सर्वाना ‘शिऱ्या ‘ म्हणूनच तो आठवतो. मात्र आता त्याने आपली एक मोठी ओळख निर्माण केली आहे.

बीकेसीमध्ये विकासने को’व्हिड टे’स्टिंग लॅ’ब उभारत तो आता को’वि’ड वॉ’रिअ’र म्हणजेच को’रो’ना यो’द्धा बनला आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीची हाव न ठेवता किंवा कोणताही गाजावाज न करता विकास हे काम करत होता. मागच्या सहा ते आठ महिन्यांपासून तो हे काम करत आहे.

त्यानंतर एका वाहिनीला जेव्हा ह्याबद्दल समजले तेव्हा त्यांनी त्याला संपर्क साधला. खरंतर या कामाचा गाजावाजा होऊ नये असंच त्याला वाटत असल्याचं त्याने बोलून दाखवलं. मात्र, कोणत्याही अपेक्षेशिवाय निस्वार्थपणे करत असलेले हे काम लोकांपर्यंत जाणं महत्वाचं असल्याचं पटवून दिल्यावर तो म्हणाला, “खरं बघता पहिली कोव्हिड लाट मी खूप जवळून अनुभवली.

त्यावेळी देखील मी सॅ’निटा’यझर, मा’स्क मोठ्या प्रमाणात दिले. इतर बऱ्याच लोकांप्रमाणे मी देखील त्याबद्दल काम केलं. माझ्या एका मित्राने फार्मा केलं आहे आणि त्यातूनच को’व्हि’डची लॅ’ब टाकायचं आम्ही ठरवल. सगळ्या बाबींची पूर्तता करून आम्ही को’व्हि’ड टे’स्टिंगची मशिनरी घेतली.

माघील आठ महिन्यांपासून ह्या लॅ’ब मध्ये २४ तास काम चालू आहे. बांद्रा, कुर्ला इथल्या मुलांना प्रशिक्षण देण्यात आलं व आता ते इथे काम करतात. त्यामध्ये अनेक मराठी मुलंही आहेत. को’व्हि’डशी सं’बंधित टे’स्ट करुन त्याचे रिपो’र्ट देणे असं अव्याहत चालू आहे. यामध्ये मलादेखील दोन वेळा को’व्हिड होऊन गेला आणि आमच्या मु’लांनाही हा सं’सर्ग हो’तोय.

पण तरीदेखील आमचा सगळा स्टाफ काम करतोय. को’व्हिडची लाट जशी वाढते तसा कामावर ता’ण येतो. पण हे काम महत्वाचं आहे याची जाणीव आमच्या स्टाफ मधील प्रत्येकाला आहे. कारण टे’स्ट करणारा प्रत्येकजण आतुरतेनं रि’पोर्टची वाट पाहात असतो. ‘

रेल्वेत काम करणाऱ्या लोकांचे स्वॅ’ब, मुंबई पालिका कर्मचारी, पो’लीस आदींचे देखील स्वॅ’ब विकासच्या लॅ’बमध्ये येतात. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी आणि सोबतच इतरांनी देखील विकासच्या कामाचं कौतुक केलं आहे. बऱ्याच कलाकारांना असलेली टे’स्टची गरज लक्षात घेत विकासच्या टीमने ती गरज त्वरित भागवली आहे.

“सिनेमा, अभिनय हे कोव्हिड गेल्यानंतर देखील करता येणार आहेच. मात्र, आज लॅ’ब असणं व टे’स्ट करणं ही काळाची गरज आहे. या कामाचा मला गाजावाजा करायचा नाहीय. गेले आठ महिने मी हे काम करतोय. माझी कोणतीही अपेक्षा नाहीय. सध्या समाजाची जी गरज आहे ती भागणं महत्वाचं आहे,” असे आपल्या कामाबद्दल बोलताना विकास म्हणाला.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *