Video : जेनेलिया देशमुखने केला डान्स, विडीयो इंटरनेटवर तुफान व्हायरल, पाहून चाहते म्हणाले की तू….

आपल्याला माहित असेल कि जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तसेच तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे आणि ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. तसेच आपल्या सर्वांची लाडकी वाहिनी म्हणजेच जेनेलिया डिसूझा देशमुख ही सोशल मीडियावर खूप अक्टिव असते.
त्यामुळे जेनेलिया आपल्या चाहत्यांसाठी व्हिडीओ आणि फोटो नेहमीच शेअर करत असते. आता नुकताच जेनेलियाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती गोलगोल फिरताना दिसत आहे. याशिवाय तिने काही फोटो देखील शेअर केले आहेत आणि या फोटोत तिची बॅकसाइड दिसत आहे.
या सर्व फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला आपल्याला दिसत आहे. तसेच तिच्या या व्हिडीओ आणि फोटोला चाहते कमेंटमध्ये विचारताना दिसत आहेत की, तुम्ही चित्रपटांमध्ये पुनरागमन कधी करणार आहात, तसेच तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला देखील आहे आणि तिच्या या व्हिडीओचे काैतुक चाहते करताना आता दिसत आहेत.
जेनेलिया ही गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे आणि चाहते गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या पुनरागमनाची वाट पाहात आहेत. काही दिवसांपूर्वी जेनेलिया आणि रितेशने त्यांच्या लग्नाच्या 9 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने ते दोघेही काही मित्रांसह घरी पार्टी करताना दिसले होते.
जेनेलियाने या पार्टी सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ देखील तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. एका व्हिडिओमध्ये ‘धडक’ या चित्रपटाच्या ‘झिंगाट’ या गाण्यावर रितेश आणि जेनेलिया दोघेही एकत्र नाचताना दिसले होते. दरम्यान, असे काहीतरी घडले की, ज्यामुळे प्रत्येकजण आपले हसणे थांबवू शकला नव्हता.
नाचत असताना जेनेलिया उत्साहात आधी स्टेप करते त्यामुळे तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. त्यांच्याबरोबर तिथे नाचत असलेला अभिनेता आशिष चौधरीलाही जेनेलियाचा ध’क्का लागतो आणि तो सुद्धा खाली पडतो आणि त्यांचा हा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांची भेट झाली होती.
आणि काहीच दिवसात ते दोघे खूप चांगले मित्र बनले आणि मग दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांचे लग्न झाले. रितेश सोबत लग्न झाल्यापासून जेनेलियाचा अभियन क्षेत्रातील वावर कमी झाला आहे. लग्नानंतर तिने फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं.
मात्र, आता पुन्हा एकदा जेनेलियाला मोठा पडदा खुणावत असून तिने चित्रपटांमध्ये कमबॅक करण्याविषयी विचार सुरु केल्याचं सांगण्यात येत आहे. एका मुलाखतीत तिने चित्रपटात काम करण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे.
लग्नानंतर कलाविश्वातून ब्रेक घेत जेनेलिया तिच्या संसारात रममाण झाली होती. घर आणि मुले यांना ती जास्तीत जास्त वेळ देत होती. मात्र, आता तिने पुन्हा एकदा करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कदाचित येत्या काळात जेनेलिया पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यासंदर्भात जेनेलिया म्हणाली की खरंतर घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना मी दुसरीकडे माझं कामदेखील मिस करत होते. मात्र, चित्रपटांच्या सेटवर लहान मुलांना घेऊन जाणं वगैरे या गोष्टी मला करायच्या नव्हत्या. मला माझं पूर्ण लक्ष कामाकडेच द्यायचं होतं.
आता माझी मुलं बऱ्यापैकी मोठी झाली आहेत. त्यामुळे आता मी पुन्हा माझ्या कामाकडे वळू शकते. एखाद्या चांगल्या भूमिकेच्या मी प्रतिक्षेत आहे. तसंच जर मला एखाद्या आईची भूमिका मिळाली, तरीदेखील मी ती करण्यास उत्सुक असेन.