‘चला हवा येऊ द्या’ फेम तुषार देवलची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत केलंय काम.

‘चला हवा येऊ द्या’ फेम तुषार देवलची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत केलंय काम.

मनोरंजन

‘चला हवा येऊ द्या’चे नाव ऐकले तरीही, चाहत्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य येतं. आपल्याला आवडलेला कोणता तरी एक जुना किंवा नवा विनोद आठवतो, ज्याने आपल्याला खळखळून हसवले आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात, या शोमुळे, लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. आपला सर्व ताण विसरुन, काही क्षण तरी, या शोचा आनंद घेतो.

काही काळ का होईना, पण आपले दुःख, चिंता, ताण सर्व काही विसरुन, आपल्या विनोदाच्या महासागरात हा शो आपल्याला घेऊन जातो. या शोमध्ये, नेहमीच सर्व कलाकार वेगवेगळ्या भूमिका साकारत असतात. त्यांच्या या भूमिकेमध्ये हास्यतरंग उमटवणे तसं तर अवघडच ठरत. मात्र हे कलाकार अगदी सहजपणे, सर्वच पात्र-भूमिका रंगवतात.

त्यामुळे, ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या चाहत्यांनी अक्षरशः या सर्व कलाकारांना डोक्यावरच उचलून धरलं आहे. छोट्या पडद्यावरील रसिकांना खळखळून हसवत, दिलखुलास मनोरंजन करणारा शो म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ या शो ने अल्पावधीतच सर्व रसिकांचा लाडका शो बनला आहे.

या शोचे चाहते केवळ राज्यात किंवा आपल्या देशातच नाही तर साता-समुद्रापार संपूर्ण जगात ख्याती कमवाली आहे. शोमधील या विनोदवीरांची त्यांच्या थुकरटवाडीत केलेली सर्व धम्माल रसिकांना खूपच भावली आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, डॉ. निलेश साबळे. चला हवा येऊ द्या शोमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रत्येक विनोदवीर हसवत असतो.

मात्र या शोने फक्त कलाकारांनाच नाहीतर शोमध्ये इतर आर्टीस्ट्सनाही ओळख मिळवून दिली आहे. त्यापैकी एक म्हणजे तुषार देवल. शोमध्ये तुषार संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळतो. त्याचबरोबर काही विनोदी स्कीटमध्येही त्याचा सहभाग असतो. या शोमुळे तुषारही प्रचंड प्रसिद्ध झाला आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का ? तुषार जितका प्रसिद्ध आहे तितकीच त्याची पत्नीही प्रसिद्ध आहे. ‘कुंकू’, ‘कळत नकळत’, ‘पारिजात’, ‘वादळवाट’, ‘विवाहबंधन’, ‘फु बाई फु’, ‘पुढचं पाऊल’  यांसह अनेक मालिकांमध्ये स्वाती देवलने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीतच नव्हे तर हिंदीतही स्वातीने काम केले आहे.’मिसेस तेंडुलकर’ या गाजलेल्या मालिकेतही स्वातीने भूमिका साकारली होती.

स्वाती देवलही उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तुषारप्रमाणेच स्वातीनेही इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहेत.  तर दुसरीकडे तुषारनेही ‘घडलंय बिघडलंय’, ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’, ‘रणवीर कॅफे’, ‘हास्यसम्राट’ अशा अनेक शोजसाठी त्याने संगीत संयोजक म्हणून भूमिका बजावली आहे.

स्वाती आणि तुषार यांचे लव्हमॅरेज आहे. काही वर्ष डेट केल्यानंतर  2003 मध्ये दोघांनीही लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.  तुषारला इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्याच्या संघर्षात पत्नी स्वातीनेही त्याला साथ दिली. त्याच्या प्रत्येकवेळी स्वाती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. आज दोघेही आपापल्या क्षेत्रात नाव कमावत असून सुखाने दोघांचा संसार सुरु आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *