एकेकाळी ‘ग्लुको बिस्कीट खाऊन’ दिवस काढलेली ‘ही’ अभिनेत्री आज आहे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री…

संघर्ष हा प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाच्या वाट्याला तो येतोच आणि जे या संघर्षातून मार्ग काढतात, ते यशाचे ते शिखर गाठतात ज्याचा विचार देखील केला नसेल. संघर्षाचा काळ अगदी कठीण असतो आणि याच काळात, मनुष्याने धीर न सोडता आपले कर्म करत राहिले तर नक्कीच यश प्राप्त होते.
आपण आपल्या आजूबाजूला अश्या अनेक यशोगाथा पहिल्या आहेत. त्याच्यापासून इतरांना जीवन जगण्यासाठी नवीन उमेद, नवी प्रेरणा मिळत राहते. आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये आपण असे अनेक उदाहरण पहिले आहेत. सुरुवातीच्या काळात, त्यांना ठाऊक देखील नसते की यश मिळेल कि नाही मात्र आपला प्रामाणिक प्रयत्न ते सुरूच ठेवतात.
त्यांच्या श्रम आणि कष्टांचे नक्कीच उत्तम असे फळ त्यांना मिळते. नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान, यांच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि सुरुवातीचा काळ पहिला तर ते इतके मोठे सुपरस्टार होतील असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र, जिद्द आणि कष्ट यांच्या बळावर त्यांनी आपली जागा निर्माण केली. आज त्यांच्या चाहत्यांचा खूप मोठा वर्ग आहे.
आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील आपण असे असंख्य उदाहरण पहिले आहे. भरत जाधव, पल्लवी सुभाष, सिद्धेश जाधव इ सर्वानी अगदी खडतर प्रवास केला आणि आज मराठी चित्रपटसृष्टी मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्याच प्रमाणे काही वर्षांपूर्वी, तेजस्विनी पंडित हे नाव कोणालाही ठाऊक नव्हते. मात्र आज, तेजस्विनी संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे असे बोलायला हरकत नाही.
सिंधुताई सपकाळ यांची जीवनगाथा, देशातील घराघरात पोहोचली याचे काही श्रेय तेजस्विनी पंडित यांना देखील जाते. त्यांनी सिंधुताई ची भूमिका साकारताना स्वतःला इतके झोकून दिले होते की, काही क्षण प्रेक्षक विचारात पडले होते कि पडद्यावरील सिंधुताई कोण अन खऱ्या सिंधुताई कोण ?
केदार शिंदे यांच्या ‘अग्ग बाई अरेच्चा’ या सिनेमामधून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणारी तेजस्विनी हिला खरी ओळख मिळाली ती ‘सिंधुताई सपकाळ’ याच सिनेमा मधून. मात्र, त्यानंतर तेजस्विनीने माघे वळून नाही पहिले. यशाची नवनवीन शिखरं ती गाठतच राहिली.
सिंधुताईच्या भूमिकेत सर्वसाधारण दिसणारी तेजस्विनी हि अगदी ग्लॅमरस आहे. आपल्या याच ग्लॅमरस लूक व जबरदस्त अभिनयाच्या जोरावर, माघील एका दशकापासून ती चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. केवळ अभिनेत्रीच नाही तर एक उत्कृष्ट डिझाइनर आणि चित्रकलाकार म्हणून देखील तिला ओळखले जाते.
मात्र, आजही खूप कमी लोकांना माहित आहे की अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची ती मुलगी आहे. मात्र, तिने काम मिळववताना स्वतः संघर्ष केला. एका मुलाखतीमध्ये तेजस्विनीने, आपल्या खडतर आणि संघर्षमयी प्रवासाबद्दल सांगितले होते. तेव्हा तिने सांगितले होते कि, आयुष्यात एक अशीही वेळ आली होती जेव्हा त्यांचे कुटुंब अडीच महिने अंधारात होते कारण वीजबील भरायला त्यांच्याकडे पै’से नव्हते.
तेव्हा आई एकटीच कमावती होती. तेव्हा ती एकावेळी चाट नाटकांमध्ये काम करायची. आणि त्यामधून मिळणाऱ्या पै’शांमधून आमचे घर चालत असे. मात्र अचानक, आईचे सहकलाकार प्रशांत सुभेदार यांचं नि’धन झाल्यानं ती चारही नाटकं बंद पडली. त्यावेळी आ’र्थिक अड’चण आमच्यासमोर उभी राहिली.
त्यावेळी, एक वेळ अशी होती की घरामध्ये फक्त १ रुपया, थोडा मैदा व साखरच शिल्लक राहिली होती. मग केवळ मैद्याची बिस्किटं खाऊन आमही तेव्हा दिवस काढला होता. कर्जाचे ओझे डो’क्यावर होते आणि वीजबिल भरण्यासाठी देखील पै’से उरले नव्हते. तेव्हा अडीच महिने आमचे घर अंधारातच होते. मग लावणीचे प्रयोग नाईटवेअर कंपनीची जाहिरात करून चांगले पै’से मिळाले. या पै’शांतून मी वीजबिल भरलं. असे तेजस्विनीने सांगितले होते. अभिनेता अंकुश चौधरी सोबत तेजस्विनीने पहिली जाहिरात केली होती.