90च्या दशकातील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आहे तेजस्विनी पंडितची आई! फोटो पाहून चकित व्हाल..

चित्रपट सृष्टी हिंदी असेल किंवा मराठी, एखाद्या अभिनेत्रीची मुलगी तिच्या पेक्षा जास्त यश मिळवते तेव्हा तिची चर्चा सगळीकडे सुरू होते. तसे बघता असे खूप कमी उदाहरण आपण पाहिले आहेत.
सुरुवातीच्या काळात, बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी तनुजा आज काजोल ची आई म्हणून ओळखली जाते. तनुजा या देखील आपल्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. अभिनय आणि सौंदर्य याची योग्य सांगड म्हणजे तनुजा अशी त्यांची संपूर्ण बॉलीवूडमध्ये ओळख होती.
त्यामानाने काजोल दिसायला जेमतेमच, मात्र आपल्या अभिनयाच्या जोरावर मागील जवळपास तीन दशकांपासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे. आणि आज तनुजा यांना काजोलची आई म्हणून ओळखले जाते. त्याच प्रकारे करिश्मा आणि करीना कपूर या दोघींची आई बबिता ही देखील अभिनेत्री होती. आपल्या सौंदर्यासाठी तीदेखील चांगलीच प्रसिद्ध झाली होती.
मात्र विवाहानंतर त्यांनी अभिनयापासून काही अंतर केले आणि आज त्या करिष्मा व करीना कपूर यांची आई म्हणून ओळखल्या जातात. असेच काही उदाहरण आपल्याला मराठी सिनेसृष्टीत देखील बघायला मिळतात. अलीकडच्या काळात मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आपल्या दमदार अभिनय आणि आकर्षक अशा व्यक्तिमत्वाने संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टी मध्ये नाव कमावले आहे.
समांतर या वेब सिरीज मधील तिच्या कामाचे खास कौतुक झाले. मी सिंधुताई सपकाळ या सिनेमाने तिला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले. त्यानंतर मात्र एका पाठोपाठ एक असे अनेक सिनेमा तिने केले. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडितची आई आहे हे खूप कमी लोकांना माहित आहे.
ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, अनेक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवताच तेजस्विनीने देखील मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. काल ज्योती चांदेकर यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर एक अत्यंत भावनिक अशी पोस्ट तेजस्विनी पंडितने लिहिली.
आपल्या आईचा एक सुंदरसा फोटो शेअर करत तूच माझा विश्वास आहे असं कॅप्शन टाकत एक मॅसेज लिहला. ‘एका गोष्टीसाठी मी संपूर्ण आयुष्य तुझी ऋणी राहणार आहे. तुझ्या कलेचा वारसा चालविण्याचा मान तू मला दिलास, पण त्याच बरोबर कर्तबगारीचा वारसा देखील तू दिलास. तुझ्या बहारदार अभिनयाने तू नेहमीच लोकांना भुरळ घातली.
तुझ्या पायाच्या नखाची सर सुद्धा मला लाभली तरीही मी अभिनेत्री होण्याचं सार्थकी लागलं असच समजेल. तू माझ्या स्वप्नांना समजून घेऊन कायम माझ्या पाठीशी उभी राहिलीस आणि म्हणून आज मी माझ व्यक्तिमत्व घडवू शकले. बाकी अशीच पाठीशी राहा पण थोडी पाठ सोड; आणि तू वृद्ध झाली आहेस हे मान्य करून थोडी जास्तच स्वतःची काळजी घे. कमीतकमी मला तरी घेऊ दे.’तेजस्विनी च्या या पोस्ट वर भरभरून लाईक्सचा वर्षाव होत आहे.