‘मन झालं बाजिंद’ मालिकेतली श्वेता राजन ‘या’ मालिकेतील प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला करते डेट..

‘मन झालं बाजिंद’ मालिकेतली श्वेता राजन ‘या’ मालिकेतील प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला करते डेट..

मनोरंजन

काही दिवसांपूर्वीच झी मराठी वरील जुन्या मालिका बंद झाल्यामुळे नवीन मालिका सुरु झाल्या होत्या. जुन्या मालिकांमध्ये देवमाणूस मालिकेने प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन केले. या मालिकेचे कथानक सत्य घटनेवर आणि वेगळे असल्यामुळे याला उत्तम प्रेक्षकवर्ग लाभला होता, पण या मालिकेचा शेवट वाईट झाल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला.

दरम्यान, नवीन आलेल्या मालिका देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे ‘मन झालं बाजिंद’. ‘मन झालं बाजिंद’ मालिकेत रांगडा नायक आणि सुंदर नायिका यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री श्वेता राजन या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय.या मालिकेत कृष्णा हि व्यक्तिरेखा साकारतेय. ती खूप समंजस आणि जबाबदार आहे.

तिचं सीए बनायचं स्वप्न आहे. जरी परिस्थिती नसली तरी हि ती खूप मोठी स्वप्नं बघतेय. तिला खूप उच्च शिक्षण घ्यायचंय आणि मामा मामींवर असलेलं गरिबीचं ओझं तिला दूर करायचं आहे आणि त्यासाठी तिचे प्रयत्न करणारी अशी तिची भूमिका आहे.

मामा मामींकडे राहणारी कृष्णा ही अतिशय संयमी आणि विचार करून वागणारी आहे. मालिकेत बेधुंद बेभान अशी एक प्रेम कहाणीवर आधारित आहे. मालिकेमुळे अल्पावधीत श्वेताने रसिकांची पसंती मिळवली आहे. खरंतर मालिकेच्या प्रोमो सुरु झाले तेव्हाच तिच्याविषयीची कमालीची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती.

दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गातही प्रचंड वाढ होत आहे. तिच्या खासगी आयुष्याविषयही जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना प्रचंड रस असतो. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते. व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात ती असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे काही फोटो पाहायला मिळतील.

अभिनेता नितीश चव्हाणसोबत तिचे डान्स व्हिडीओ फोटो पाहायला मिळतील. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. ‘लागीरं झालं जी’ मालिकेतून नितीश चव्हाण घरातघरात पोहचला होता. मालिकेत अजिंक्य म्हणजेच अज्या आणि शीतलीची लव्हस्टोरी चांगलीच गाजली होती.

नितीश आणि श्वेता दोघांचेही एकत्र सोशल मीडियावरील फोटो पाहून ”दो दिल मिल रहें है चुपके चुपके” अशी शंका तुम्हालाही आल्याशिवाय राहणार नाही. अनेक फोटोंमध्ये नितीश आणि श्वेताचे अनोखं बॉन्डिंग पाहायला मिळतं. त्यामुळे हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सतत दोघेही एकमेकांसह व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. दोघांनीही त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नसली तरी फोटोंच्यामाध्यमातून आपल्या प्रेमाचीजाहीर कबुलीच दिली अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *