झोपडपट्टीत राहणारी ‘ही’ अभिनेत्री बनली होती मिस इंडिया, आज आहे परेश रावल यांची पत्नी…

झोपडपट्टीत राहणारी ‘ही’ अभिनेत्री बनली होती मिस इंडिया, आज आहे परेश रावल यांची पत्नी…

बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या प्रेमकथा देखील अगदी फिल्मी असतात. मग अनेकवेळा विश्वासच बसत नाही की ही प्रेमकहाणी खरी आहे की, केवळ कथानक. नेहमी प्रकाशझोतात राहणाऱ्या कलाकारांच्या प्रेमकथा आणि लग्नापर्यंतचा प्रवास, त्यानंतरचे आयुष्य हे सर्व माहीतच असते.

मात्र असे काही दिग्गज कलाकार आहेत, ज्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं कोणाला काही माहित नाही. परेश रावल देखील अशाच काही मोजक्या दिग्गजन कलाकारांपैकी एक आहेत. बॉलीवूड मधील प्रसिद्ध कलाकार परेश रावल याना त्यांनी रेखाटलेल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी सर्वच जण ओळखतात.

खलनायकापासून ते विनोदी भूमिका, तर तरुण युवकापासून ते वयोवृद्ध अशा सर्व प्रकारच्या भूमिका परेश यांनी रेखाटल्या आहेत. प्रत्येक भूमिका साकारताना ते त्या भूमिकेसोबत एकरुप होतात. त्यांच्या करियर बद्दल तर सर्वाना माहीतच आहे, मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं कोणाला माहित नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की त्यांची पत्नी देखील एक मोठी अभिनेत्री होती.

इतकंच काय तर त्यांनी मिस इंडिया खिताब देखील जिंकला होता. स्वरूप संपत हे परेश यांच्या पत्नीचे नाव आहे. स्वरूप आणि परेश एकाच कॉलेजात शिकत होते. तिथेच १९७५ मध्ये सुरुवातीलाच परेश यांनी स्वरुपला पहिले आणि पाहताच त्यांच्या प्रेमात पडले. स्वरुप याना बघताच, याच मुलीसोबत मी लग्न करणार असं परेश यांनी आपल्या मित्राला सांगितले होते.

पुढे १९७९ मध्ये स्वरुप मिस इंडियाचा खिताब जिंकल्या, मात्र यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. कारण त्या बराच काळ अक्षरशः एका झोपडीत राहत होत्या. एका मुलाखतीमध्ये सांगताना स्वरुप बोलल्या होत्या,’मिस इंडिया आणि तू असं म्हणत अनेकजण माझी खिल्ली उडवत असत. कारण खूप काळ मी झोपडीत राहत होते. आमची परिस्थितीच तशी होती.

परेश आणि मी एकाच कॉलेज मध्ये होतो. एका नाटकाच्या वेळी, आमची ओळख झाली आणि तेव्हाच आम्ही एकमेकांसोबत मैत्री केली. परेश आणि माझ्यात सुरुवातीला मैत्रीच्या पलीकडे काहीच नव्हतं, मात्र हळू हळू आम्ही प्रेमात पडलो. तेव्हा मला समजलं की, परेश आधीपासूनच माझ्या प्रेमात होते.’ स्वरुप यांनी अनेक सिनेमामध्ये काम केले आहे.

‘ये जो जिंदगी है’, या मालिकेत त्यांनी काम केले आहे. त्यानंतर, हिम्मतवाला, नरम गरम, सप्तपदी, साथिया अशा काही सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. शृंगार या कुंकूंच्या कंपनीच्या त्या अनेकवर्ष मुख्य चेहरा होत्या.

हिम्मतवाला सिनेमा नंतर आपली दोन्ही मुले आणि समाजसेवा यासाठी त्यांनी बॉलीवूडमध्ये काम करणं कमी केले. त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहली आहेत. की अँड का या सिनेमात त्यांन काम केले आहे. मात्र परेश आणि स्वरुप यांची प्रेमकहाणी खरोखर पूर्ण फिल्मीच आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *