महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलीवूडच्या ‘या’ एकमेव अभिनेत्रीने घेतला पुढाकार..अशी करतेय मदत..

महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलीवूडच्या ‘या’ एकमेव अभिनेत्रीने घेतला पुढाकार..अशी करतेय मदत..

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर भाग म्हणून कोकणाची ओळख आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर जगभरात, कोकणच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक केले जाते. त्यासाठी संपूर्ण जगात दरवर्षी अनेक पर्यटक, सुट्टीसाठी आणि निसर्गाच्या सन्निधायत राहण्याचा आनंद घेणयासाठी येतच असतात. माघील जवळपास दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, येथील बाहेरील देशातील पर्यटकांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.

मात्र, तरीही देशातून अनेक पर्यटकांनी मधले काही महिने तिथे हजेरी लावलीच होती. एरव्ही अतिसुंदर असणाऱ्या कोकणची अवस्था, अतिवृष्टी आणि महापुरामुळे अगदी भ’यान’क आणि द’यनी’य झाली आहे. गावेच्या गवे, कुटुंब उ’ध्वस्त झाली आहेत. संसार उघड्यावर आलाय आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

अश्यातच अनेक नेते मंडळी कोकणचा दौरा करत त्यांना दिलासा देत आहेत. माघील आठवड्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या भागाचा दौरा केला आणि सरकारची जबाबदारी स्वीकारत नागरिकांना दिलासा दिला. कोकणसह, कोल्हापूर, सांगली, या भागाला महापुराने आपल्या वि’ळाख्यात अ’डकवले. येथे देखील जनसामान्यांचे भरपूर नु’कसान झाले.

त्याच पार्श्वभूमीवर मराठमोळा अभिनेता कोकणपुत्र भरत जाधवने, कोकणग्रस्तांच्या मदतीचे आवाहन केले होते. सुंदरा मनात भरली मालिकेचा कलाकारांनी देखील, एका व्हिडियोद्वारे चाहत्यांना कोकग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले होते. आता बॉलीवूडची अभिनेत्री स्वर भास्करने देखील कोकणग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

तिने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन, आपल्या चाहत्यांना मदतीचे आवाहन केले आहे. आपल्या ट्विटरच्या अकाऊंट वरून तिने युथ फॉर डेमॉक्रसीचे टॅग वापरत एक ट्विट केले आहे. यामध्ये स्वराने लिहले आहे की, “महाराष्ट्रातील गरजू पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या सर्वांना सलाम. कोणतीही मदत लहान किंवा मोठी नाहीये.

मी सर्वांना विनंती करते की त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठं काम करणाऱ्या युथ फॉर डेमॉक्रसीला मदत करावी. कृपया दान करा.” बॉलीवूडमधून प्रथमच एका कलाकाराने, महाराष्ट्राच्या पुरग्रस्तांसाच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. स्वर नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर न भीत आपले मत परखडपणे मांडत आलीये. त्यामुळे ती अनेकवेळा वा’दाच्या भोवऱ्यात देखील अ’डकली आहे.

मात्र आता तिने आपले सामाजिक भान ठेवत कोकणग्रस्तांसाठी घेतलेला पुढाकार आवश्यकच होता. मदतीचे आवाहन करत तिने क्राऊड फंडिग जमा करणाऱ्या मिलाप या प्लॅटफॉर्मची लिंकही शेअर केलीय. यामध्ये, युथ फॉर डेमॉक्रसीने मदतीसाठी सुरू केलेल्या मोहिमेची सगळी माहिती देण्यात आलीय. तिच्या या ट्विटला आणि आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

त्यानंतर शेकडो लोकांनी या मोहिमेचा भाग होत देणगी दिलीय.“आपल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त बांधवांसाठी आता आपण आपले बहुमोल योगदान ‘युथ फॉर डेमोक्रेसी’च्या माध्यमातून आमच्या अधिकृत खात्यावर जमा करू शकता. आपल्या मार्फत केल्या गेलेल्या सर्व योगदानाचे अपडेट्स YFD मार्फत १५ दिवसांच्या कालावधीत आमच्या सोशल मिडिया पेजवर पोस्ट केले जातील.”असं युथ फॉर डेमॉक्रसीच्य अधिकृत अकाऊंटवरुन सांगण्यात आलं आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *