‘ही’ मराठी अभिनेत्री अ’डकली होती एका भ’यंकर प्रसंगात, 3 महिने एकाच खोलीत डांबून ठेवले होते निर्मात्याने, पहा बाळासाहेबांच्या मदतीने अशी झाली सुटका…

आज मुंबई मध्ये मराठी माणसाचे अस्तित्व टिकून आहे आणि ह्याचे श्रेय जाते ते, हिंदुहृदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे ह्यांनाच. मराठी माणसाचा वाकत चाललेला कणा आणि नाहीसे होत चाललेले अस्तित्व, त्यानी पुन्हा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आणि ते करून देखील दाखवले.
मराठी स्वाभिमान त्यांनी जागरुक केला आणि जेव्हा जिथे अ’न्याय होत असेल तिथे त्यांनी साम, दाम वापरून काम करूनच घेतले. त्यांच्या ह्या पर्यायांना काहींनी अयोग्य ठरवले असले तरीही असे बरेच प्रसंग आहेत, ज्यांचा खुलासा झाल्यानंतर त्यांनी वापरलेला मार्गच उत्तम होता असे सिद्ध झाले आहे.
चित्रपट निर्माते आपल्याकडे ऑडिशन ला आलेल्या अभिनेत्री ना हवी तशी वाग’णूक देतात. त्यांच्याकडून हवे ते काम करवून घेतात असे आपण ऐकले आहे आणि कित्येकी अभिनेत्रींनी हे सांगितले देखील आहे. अशा वेळी नक्की कोठे जावे आणि काय करावे हेच त्यांना सुचत नाही. मात्र मुंबईमध्ये एक अर्थातच हक्काचे घर सगळ्यांसाठी उपलब्ध होते आणि ते म्हणजे ‘मातोश्री’.
आपण अनेक वेळा ऐकले असेल कि, बाळासाहेब ठाकरे ह्यांनी बऱ्याच मराठी कलाकारांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत केली आहे. मात्र ह्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची कथा तुम्हाला अवाक करेल, तेव्हा योग्य वेळी जर बाळासाहेब ठाकरेंची मदत मिळाली नसती तर कदाचित आपल्याला त्यांचे सुंदर हास्य परत कधीच बघायला मिळाले नसते.
सुप्रिया पठारे, ह्यांना तुम्ही अनेक वेगवेगळ्या नावाने ओळखत असाल. मराठी चित्रपटसृष्टीमधील एक उत्कृष्ट अशी विनोदी कलाकार म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील घराघरात बघितल्या जाणाऱ्या ‘फु बाई फु’ ह्या विनोदी मालिकेमध्ये आपल्या भन्नाट विनोदांनी ज्यांनी रसिकांना खळखळून हसवले त्या सुप्रिया पठारे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील विनोदसम्राज्ञी म्हणून आज त्यांना ओळखले जाते. आपल्या भन्नाट आणि वेगळ्या अश्या विनोदी शैली मुळे त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. जागो मोहन प्यारे मधील त्यांची भूमिका देखील चांगलीच लोकप्रिय झाली होती. सुपारी बायकोची, फक्त लढा म्हणा,टाईमपास १ आणि २, चि व ची सौ का, बालक पालक अश्या अनेक मराठी सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आहे.
१६ वर्ष खडतर प्रवास करून आज त्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसल्या आहेत. मात्र हे सगळं कदाचित त्यांना भेटलं नसत तर जर, एका कठीण प्रसंगाच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची मदत नसती केली. १९९५ मध्ये एका सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांना एका निर्मात्याने आपल्या घरात कोंडून ठेवले होते.
फक्त घरच्यांसोबत बोलायचे आणि तेदेखील त्याच्या समोर आणि हिंदी मधेच, कुठे जाणे येणे आणि इतर कोणाशी बोलायला देखील काहीच सोय नव्हती. मोठ्या प्रयत्नांनी एक दिवस त्यांनी आपल्या बहिणीला सर्व प्रकार सांगितलं आणि त्यांच्या बहिणीने थेट मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंकडे धाव घेतली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी,सुप्रिया ह्यांना त्या निर्मात्याच्या तावडीतून सोडवले.