मराठी अभिनेता सुमित राघवनची बायको देखील आहे एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, पहा ‘या’ मालिकेत साकारतेय मुख्य भूमिका…

चित्रपट सृष्टीमध्ये कायमच, परिस्थितीनुसार नाते बदलताना आपण पाहिले आहेत. बॉलीवूड असेल किंवा मराठी सिनेसृष्टी असेल सगळीकडेच आपण, नाते बदलताना पाहिले आहेत. कधी कोणता अभिनेता अमुक एका अभिनेत्रीच्या प्रे’मा’त प’डतो मग त्यांचे अ’फे-अर सुरु होते आणि काही दिवसात ते संपुष्टात देखील येते.
कधी कधी वर्षानुवर्षे सोबत असलेले पती पत्नी व्यावहारिक होऊन वेगळे होतात. खूप कमी अश्या जोड्या आहेत ज्यांनी आपल्या प्रेमाची साथ आयुष्यभर निभावण्याचे वचन दिले आणि ते निभावत देखील आहेत. त्यांनाच आपण मेड फॉर इच अदर म्हणतो. काजोल- देवगन, ट्वीनकल- अक्षय, रितेश-जिनेलिया, अशोक सराफ-निवेदिता, असे अनेक मेड फॉर इच आदर कपल देखील आपल्या सिने सृष्टी मध्ये आहेत.
तसेच मराठी सिने सृष्टी मध्ये अजून एक कपल आहे ज्यांना असे म्हणतात. सुमित राघवन आणि त्याची पत्नी चिन्मयी. सुमित ने मराठी चित्रपट, हिंदी मालिका, सिनेमा, नाटक अश्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आपले नाव क’मवले आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई, तू तू मै मै, या भन्नाट मालिकांमधून सुमितने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.
भूमिका कोणतीही असो आपल्या दमदार अभिनयाने सुमित नेहमीच स्वतःची वेगळी छाप सोडत असतो. डॉ काशिनाथ घाणेकर या सिनेमा मध्ये त्याने प्रसिद्ध अभिनेते डॉ श्रीराम लागू यांची भूमिका साकारली होती. त्यावेळी त्याचे सगळीकडूनच खास कौतुक देखील करण्यात आले होते. त्याची पत्नी चिन्मयी देखील एक अभिनेत्री आहे.
ज्वालामुखी या नाटकाच्या दरम्यान चिन्मयी आणि सुमित ची भेट झाली होती. त्यानंतर त्या दोघांनी सोबत खूप काम केले. काम करत असताना ते दोघे एकमेकांच्या प्रे’मात पड’ले आणि मग लग्न केले. संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी त्यांना मेड ऑफ इच दर म्हणून च संबोधते. सेलेब्रिटी कपल म्हणून हे दोघे अनेक वेळा वेगवेगळ्या शो मध्ये हजेरी लावतात, आणि प्रत्येक वेळी त्यांच्या नात्याचा नवीन पैलू समोर येतो.
त्यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाले आहे. सुमित ने आज आपल्या सोशल मीडियावरून एक फोटो शेअर केला आहे. सध्या ची परिस्थिती बघता आम्ही मुलांसोबत सिल्वर वेडिंग सेलेब्रेट करत आहोत असे आपल्या पोस्ट मध्ये त्याने लिहलं आहे. आपल्या लव्ह-स्टोरी बद्दल सांगताना एका कार्यक्रमामध्ये चिन्मयीने सांगितले होते की,’आम्ही ज्वा’लामुखी नाटकाच्या वेळी भेटलो.
त्यानंतर आम्ही बरेच काम सोबत केले आणि त्यातच चांगले नाते निर्माण झाले. कोणी कोणाला प्रपोज वगैरे करण्याच्या आम्ही भा’नग’डीत नाही पडलो कारण एकमेकांवर प्रे’म झाले असल्याचे आमच्या एव्हाना लक्षात आले होते. मग काय लगेच च’ढलो बोह’ऱ्यावर.’ लग्नाला इतके वर्ष झाले असले तरीही एकमेकांबद्दल असणारे प्रेम आणि विश्वास यामुळे अजूनही त्या दोघांच्या नात्यामध्ये नवेपणा आहे, असे सुमित सांगतो.
चिन्मयी या देखील अनेक मराठी सिनेमांमध्ये झळकल्या आहेत. सध्या त्या जीव झाला येडा पिसा, या मालिकेमध्ये आत्याबाई आमदारांची भूमिका साकारत आहे. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. सुमित आणि चिन्मयी या दोघांच्या फोटोवर लाईक्स चा वर्षाव होत आहे.