श्रुती मराठे चा पती आहे हा प्रसिद्ध अभिनेत्रता, पहा या चित्रपटाचे सेटवर पहिल्याच भेटीत झाली होती लव्हस्टोरी सुरू…

‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे श्रुती मराठेचा पती आहे, दिसायला आहे खूपच हँडसम आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री श्रुती मराठेने मराठी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाने फॅन्सच्या मनात जागा निर्माण केली आहे. अभिनय व सौंदर्याची खान असलेली श्रृती मराठेने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रुतीने तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुतीने तमिळमधील ‘प्रेम सूत्र’, मराठीतील ‘सनई चौघडे’सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे.
श्रुतीचा पतीदेखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. श्रुती आणि गौरवची ओळख ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता. मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. श्रुती गौरवसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
अभिनेत्री श्रुती मराठे व अभिनेता गौरव घाटणेकर याचे लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाले आहे. श्रुतीने मराठेने तिच्या इन्स्टाग्रामच्या खात्यावर गौरवसोबत घेतलेला फोटो देखील शेअर केला आहेत. आणि तिने त्याला वेडिंग अॅनिव्हसरीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रेटींनी देखील या दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 4 डिसेंबर 2016 मध्ये श्रुती आणि गौरव लग्नाच्या बंधनात अडकले आहे.
सन 2009 मध्ये आलेल्या ‘सनई चौघडे’ या चित्रपटातून श्रुती मराठे हिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तसेच इंदिरा विजहा या चित्रपटतून तिने दक्षिणेत देखील एंट्री घेतली होती. श्रुतीने असा मी तसा मी, लागली पैज सत्या, सावित्री आणि सत्यवान, रामा माधव आणि तुझी माझी लव्हस्टोरी यासारख्या भरपूर सिनेमांमध्ये काम केले आहे. सिनेमांसोबत श्रुती छोट्या पडद्यावर ही झळकत आली आहे.