सोनू सूदला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने भावुक होऊन होनू सूदने…

सोनू सूदला भेटली भारतातील सर्वात श्रीमंत महिला, तिच्या मदतीने भावुक होऊन होनू सूदने…

मागच्या वर्षापासून सोनू सूद हा आपल्या सामाजिक कार्यामुळे चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. नेत्यांपेक्षा जास्त काम माघील एक वर्षात सोनू सूद ने केले आहे. त्याचे हे निस्वार्थ काम बघून कित्येक लोक, समाजकार्य करण्यास प्रवृत्त झाले आहे. त्याच्या कामामुळे कित्येक जण निस्वार्थ भावनेनं समाजकार्य करत, इतरांना मदत करत आहेत.

सोनू सूद एक खरा हिरो आहे असेच सर्वच जण बोलत आहेत. त्याने केलेलं कार्य हे अलौकिक आहे, त्याच्या ह्या कामासोबत खूप लोक निस्वार्थ भावनेने जोडले जात आहेत. सोनू सूद ह्याला, सर्वच जण सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणत आहेत. पैशाने नाही तर त्याच्या निस्वार्थ कामाने त्याला सर्वात जास्त श्रीमंत बनवले आहे… मात्र सोनू सूद स्वतःला नाही तर एका दुसऱ्याच व्यक्तीला सर्वात श्रीमंत म्हणून सांगत आहे.

को’रो’ना म’हा’मा’री’मध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद एखाद्या देवदूतासमान सर्व गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सोनू सूद दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या देशातील गरजू लोकांची निस्वार्थ भावनेने मदत करत आहे. सोनूच्या या सर्वोत्तम उपक्रमात अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहेत.

मात्र नुकताच सोनू सूदच्या फौंडेशनमध्ये एका अशा मुलीने आपला मदतीचा हात दिला आहे, जी तिच्याकडे असणाऱ्या पैशाने नाही तर मनाने श्रीमंत आहे. ह्या मुलीचं इतकं मोठं मन बघून चक्क सोनू देखील तिचा चांगलाच चाहता बनला आहे.

आंध्र प्रदेश मधील एका दि’व्यांग मुलीने ही अगदी निस्वार्थ मदत केली आहे. स्वतः सोनू सूद ह्याने आपल्या अधिकृत ट्विटरच्या अकाऊंट वरुन ट्वीट करत माहिती दिली आहे. बोड्डू नागा लक्ष्मी असं ह्या दि’व्यांग मुलीचं नाव असून ती एक युटयूबर देखील आहे.

सोनू सूदचं काम पाहून देशचं नव्हे तर विदेशी लोकसुद्धा सोनूचे चाहते झाले आहेत. मात्र, आता हाच सोनू सूद या मुलीचा चाहता बनला आहे. सोनू सूदने या मुलीचं कौतुक करत एक ट्वीट केलं आहे, तसेच त्या मुलीचा फोटो पोस्ट करत, तिला भारतातील सर्वात श्रीमंत मुलगी असं त्याने म्हटलं आहे.

सोनूने आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे, ‘बोड्डू नागा लक्ष्मी ही एक दि’व्यांग मुलगी व युटयूबर आहे. आंध्रप्रदेशमधील ‘वरीकुंटापाडू’ या छोट्याशा खेड्यात ती राहते. सूद फौंडेशनमध्ये १५ हजार रुपयांचा निधी मदत म्हणून तिने दिले आहेत. तिच्या ५ महिन्यांच्या पेन्शनचा हा पैसे आहे आणि खरोखर हीच माझ्यासाठी सर्वात श्रीमंत भारतीय आहे. तुम्हाला कोणाचही दुख पाहण्यासाठी फक्त डोळ्यांचीच गरज असते असं नाही हे तिने दाखवून दिले आहे. ही एक रियल हिरो आहे. अशा आशयचा ट्वीट सोनूने केला आहे.

या मुलीच्या मदतीनंतरच्या ट्विट नंतर, सोनूला अनेक लोकांनी विचारणा केली आहे, की कशा प्रकारे ते देखील मदत करू शकतात. सोनू सूद रात्रंदिवस गरजूंच्या मदतीसाठी धडपड करत आहे. विविध शहरांमधून सोनूला मदतीसाठी फोन येत आहेत. आणि सोनू देखील त्यांना आवर्जून मदत करत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *