Bigg Boss Marathi : सोनाली पाटील आणि तृप्ती देसाईचा वा’द विकोपाला, पहा फक्त ‘भाता’साठी दोघांनी…

मनोरंजन
बिग बॉस मराठीला सुरु होऊन आता महिना लोटला आहे. त्यामुळे आता, स्पर्धकांचे खरे रंग बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच आठवड्यापासून जे स्पर्धक प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करत होते, आता ते माघे पडले असून त्यांची जागा इतरांनी घेतल्याचे चित्र समोर येत आहे. पहिल्याच आठवद्यात, उत्कर्ष शिंदे आणि मीरा जगन्नाथ यांनी चांगलाच खेळ रंगवला होता.
मात्र आता उत्कर्ष कुठे दिसत नाही आणि महेश मांजरेकर आणि प्रेक्षकांच्या मते, मीरा आपली वाट चुकली आहे. मीराचा प्रत्येक निर्णय अगदी आर या पार असतो आणि त्यामध्ये नेहमीच ती स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात, चुकांवर चुका करत आहे. सोबतच गायत्री, पडद्याच्या मागाहून खेळ खेळत आहे.
प्रेक्षक तिच्या वि’रोधात गेलेले आहेत, त्यामुळे ती जेव्हा नॉमिनेट होईल ती नक्कीच घराच्या बाहेर असं अनेक, बिग बॉसच्या चाहत्यांना खात्री आहे. तर दुसरीकडे, पहिल्याच आठवड्यापासून नॉमिनेट होऊन देखील सोनाली, विशाल, मीनल, विकास इतर सदस्यांना मात देत आपला खेळ खेळत आहेत. विशाल आणि मिनलच्या खेळावर प्रेक्षक अत्यंत खुश आहेत.
मीनल जितकी मैत्रीला पक्की आहे तेवढाच उत्तम गेम देखील खेळते, त्यामुळे तिला लंबी रेस का घोडा म्हणलं जात आहे. तर देवमाणूस फेम सोनाली पाटील, आपल्या अस्सल कोल्हापुरी हटके स्टायलमुळे अनेकांची मनं जिंकली आहेत. केवळ कोल्हापूरचेच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्राला तिचा हटके अंदाज आवडला आहे. तिचा खेळ सध्या अगदी योग्य सुरु आहे.
विशाल आणि मीनल सोबत तिची घट्ट मैत्री जमली आहे. त्या तिघांच्या मैत्रीची जोडी, चाहत्यांना देखील खूप जास्त आवडत आहे. सोनाली नेहमीच, स्पष्ट बोलते. त्यामुळे अनेकवेळा सुरेख कुडचीने तिला धारेवर धरलं होत. मात्र, असं असलं तरीही चूक नसताना तिला कोणी नडलं तर ती त्यांना स्वतःची बाजू मांडून बोलायला माघे पुढे बघत नाही.
आज तिच्या याच स्वभावामुळे, तृप्ती देसाईसोबत तिचा वा’द रंगल्याच बघायला मिळालं. रात्रीचा भात कोणी तरी बनवून ठेवला. मात्र तो भात, कच्चा होता तो आता कोण वाफवणार यावर हा वा’द सुरु झाला. सोनाली पहिल्या आठवड्यापासून किचनमध्ये काम करत आहे. किचनमध्ये, सर्वांचा स्वयंपाक बनवण्याचं काम सोनालीवर आहे.
त्यामुळे जेव्हा भात पुन्हा वाफवण्याची आणि त्याला फोडणी देण्याचे काम समोर आले, तेव्हा हि माझी ड्युटी नाहीये ना ताई, असं म्हणत सोनाली आणि तृप्ती मध्ये सुरु झालेल्या च’र्चेचं रूपांतर वा’दामध्ये झाल्याचे बघायला मिळालं. ‘ताई मी आजवर कधी तुमच्यासोबत वा’द घातला आहे का? मी आता पण तुम्हच्यासोबत वाद घालत नाहीये.
पण मला जे पटत नाही, जे खटकते ते तर मी बोललं पाहिजे ना? मग मला बोलू द्या ना ? माझी सकाळची ड्युटी नाहीये, बस इतकी छोटी गोष्ट आहे. त्यामुळे मी सकाळचं काम नाही करणार. सकाळचं काम करा, रात्रीच करा आणि मग बाकीच्यांनी काय काहीच नाही करायचं का? प्रत्येक गोष्टींमध्ये तुम्ही काही तरी बोललंच पाहिजे असं पण नाहीये ना?छोटी गोष्ट आहे, वाढवू नका’ असं सोनाली तृप्ती देसाईला बोलते. तर तृप्ती सध्या कॅप्टन असल्यामुळे त्या म्हणाल्या,’मी पण तेच बोलत आहे. गोष्ट छोटी आहे. तुम्ही वाद घालू नका. उगाच बडबड सुरु आहे.’