अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या बहिणीला पाहिलंत का? दोघीही दिसतात एकमेकांची कार्बन कॉपी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल चिकित..

मनोरंजन
नुकतंच आपल्या देशात सर्वानी रक्षा बंधनाचा सण साजरा केला. भावंडांच्या प्रेमाचा हा सण आपल्या देशात सगळीकडेच मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो. या दिवशी, भावंड जगात कुठेही असले तरीही थोडा वेळ तरी त्यांच्यासोबत राहता यावं अशी सर्वांचीच इच्छा असते.
राखीपौर्णिमा सणाला अनेकांनी आपले आणि आपल्या भावंडांचे फोटोज शेअर केले. अनेक सेलेब्रिटीजने देखील आपले फोटोज शेअर करत आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. या खास दिवशी आपल्या भावाने काय गिफ्ट दिले, हे अगदी कौतुकाने अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले.
तर काहींनी आजचा दिवस किती खास आहे आणि तो अजून खास होण्यासाठी आपल्या भावाने किंवा बहिणीने काय केले हेसुद्धा शेअर केले. याच दरम्यान प्रथमच अनेक सेलेब्रिटीजने देखील आपल्या भांवंडासोबत फोटोज शेअर केले. त्यामुळे पहिल्यांदा अनेक सेलेब्रिटीजच्या भांवंडांचे दर्शन त्यांच्या चाहत्यांना झाले. मराठी सिनेसृष्टीमधे देखील अनेक कलाकारांनी आपल्या भांवंडाची फोटोज शेअर करत सर्वाना चकित केले.
आई कुठे काय करते मधील यश आणि इशा म्हणजेच अभिषेक आणि अमृता देशमुख हे सख्खे भाऊ बहीण असल्याचं, राखीच्या मुहूर्तावर अनेकांना समजले. त्याचबरोबर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर याने सुद्धा आपल्या बहिणीचा म्हणजेच दीक्षाच फोटो शेअर केला. दीक्षा देखील अभिनेत्री असून, तू सौभाग्यवती हो मालिकेत सध्या काम करत आहे.
असे अनेक कलाकारांच्या भावंडाची रक्षाबंधनाच्या दिवशी पहिल्यांदाच ओळख झाली. तशीच तेजस्विनी पंडितच्या बहिणीलादेखील रक्षा बंधनाच्या दिवशी पाहायला मिळाले. ज्यांनी पण हा फोटो पहिला ते एक क्षण अक्षरशः चकितच झाले, कारण तेजस्विनी आणि तिची बहीण पूर्णिमा दोघीही अगदी सारख्याच दिसतात. पंडित बहिणी, प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री मधू चांदेकर यांच्या मुली आहेत.
मधु चांदेकर यांनी अनेक सिनेमामध्ये आणि नाटकांमध्ये काम केले होते.आजही त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या आईच्याच पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनीने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सिंधुताई सपकाळ या सिनेमाने तिला खरी ओळख मिळवून दिली. यामध्ये तिच्या सुंदरतेपेक्षा तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले, आणि कोणत्याही अभिनेत्री साठी हीच सर्वात मोठी गोष्ट असते.
त्यानंतर तिने अनेक सिनेमामध्ये काम केले आणि प्रत्येक सिनेमामध्ये तिला भरगोस यश मिळाले. इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या समांतर या मराठी वेब-सिरीजमध्ये ती झळकली होती. यामध्ये देखील तिच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले. तेजस्विनी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. रक्षा-बंधनाच्या दिवशी तिने आपल्या बहिणीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
यामध्ये ती आणि तसाही बहीण दोघीही कमालीच्या सुंदर दिसत आहेत. तेजस्विनीची बहीण पूर्णिमा हुबेहूब तिच्यासारखीच दिसते. हॅप्पी रक्षाबंधन आणि हॅप्पी ओणम असं लिहत तिने पोस्ट शेअर केली आहे. यापूर्वी देखील अप्लाय बहिणीच्या वाढदिवसाच्या दिवशी तेजस्विनीने तिचा फोटो शेअर केला होता. तिचे हे दोन्ही फोटो सगळीकडेच तुफान वायरल होत आहेत.