अभिनेत्री नसूनही श्रेयस तळपदेची पत्नी दिसतेय इतकी सुंदर की, तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही पडतील फिक्या..

मराठी चित्रपटसृष्टीमधून जाऊन बॉलिवूडमध्ये खूप कमी कलाकारांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. आपली मेहनत आणि दमदार अभिनय या जोरावर त्यांनी बॉलीवूडमध्ये नाव कमवले.
उपेंद्र लिमये, सचिन खेडेकर, विक्रम गोखले, राधिका आपटे, वर्षा उसगांवकर, सई ताम्हणकर अश्या अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळ्या शैलीने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. यामध्ये श्रेयस तळपदेचे नाव जरा पहिलेच घ्यावे लागेल. श्रेयस तळपदेने मराठी मालिकांमधून आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली.
त्यानंतर सावरखेड एक गाव, पछाडलेला, सनई चौघडे सारख्या हिट मराठी सिनेमामध्ये त्याने काम केलं. सावरखेड एक गाव सिनेमामध्ये त्याच्या अभिनयाचे खास कौतुक करण्यात आले. आणि याच उत्कृष्ट मराठी सिनेमामुळे बॉलीवूडची दारं तिच्यासाठी उघडली. इक्बाल या हिंदी सिनेमामधून त्याने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले.
आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये, उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर त्याने बोलिवडूमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्या सिनेमासाठी त्याला अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले होते. त्यानंतर डोर सारख्या सिनेमामध्ये त्याने काम केले. आणि आपल्या सहजपणे कोणत्याही भूमिकेमध्ये एकरूप होण्याच्या शैलीमुळे, श्रेयसला शाहरुख खानच्या ओम शांती ओम सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली.
या सिनेमामध्ये देखील त्याच्या अभिनयाला चांगलीच दाद मिळाली. श्रेयस आपल्या यशाचे श्रेय आपल्या पत्नीला म्हणजेच दीप्ती तळपदेला देतो. अनेक सिनेमामध्ये मला यश मिळाले आणि काही सिनेमा फ्लॉप झाले. मात्र अशा वेळी, दीप्ती नेहमी माझ्यासोबत खंबीरपणे उभी होती. बॉलीवूडमध्ये काही हिट सिनेमामध्ये काम केल्यानंतर मात्र, श्रेयसने बऱ्याच फ्लॉप सिनेमामध्ये देखील काम केलं.
मात्र अशा कठीण वेळी, दीप्तीने श्रेयसचा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. आणि त्यामुळेच गोलमलच्या सिरीजमध्ये त्याने यशस्वीरीत्या कमबॅक केलं. सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमधून श्रेयस पुन्हा मराठी टेलिव्हिजनमध्ये एन्ट्री करत आहे. मात्र सध्या त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या पत्नीची म्हणजेच दीप्तीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
मालिकेच्या लाँचच्या कार्यक्रमामध्ये दिप्ती कमालीची सुंदर दिसत होती, आणि त्यामुळे चर्चेला उधाण आले. एखाद्या अभिनेत्रीलाही माघे टाकेल, इतकी जास्त सुंदर दीप्ती तिथे दिसत होती. दीप्ती नेहमीच, आपल्या सोशल मीडिया हँडलवरून आपले फोटोज शेअर करत असते. ती प्रत्येक फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसते. दीप्ती दिसायला जितकी सुंदर आहे, तेवढीच ग्लॅमरस देखील आहे.
अनेकवेळा श्रेयस देखील आपल्या बायकोसोबत फोटो शेअर करत असतो आणि त्याच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होतो. त्या दोघांना आद्या नावाची एक मुलगी देखील आहे. अनेकवेळा आपल्या मुलीचे फोटोज देखील श्रेयस शेअर करतच असतो. दिप्तीने सायकॉलजीचे शिक्षण घेतले आहे. मात्र श्रेयस सोबत काही मराठी सिनेमा देखील तिने प्रोड्युस केले आहेत.
पोस्टर बॉईज आणि बाजी सिनेमाची निर्माता म्हणून दिप्तीने काम केलं आहे. श्रेयस आपल्या नात्याबद्दल बोलताना सांगतो, ‘दीप्ती मला जास्त वेळ रागात राहूच देत नाही. आमच्या दोघात देखील भांडण होतात, वाद होतात, मात्र तो फार काळ टिकत नाही. आमच्या दोघांचे नातेच तसे आहे. दिप्तीने नेहमीच प्रत्येक परिस्थितीमध्ये माझी साथ दिली आहे.
ती सोबत आहे, म्हणून मी माझ्या आयुष्यातील कठीण काळात देखील आत्मविश्वास न गमावता पुन्हा उभं राहू शकलो. तिच्या मुळेच माझं हे छोटंसं आणि सुंदर विश्व बनलं आहे. यामध्ये मी खूप आनंदी आणि समाधानी आहे.’