Big Boss मराठी मध्ये तृप्ती देसाई आणि शिवलीलामध्ये जुंपली ! तृप्ती देसाई म्हणाली; माझ्यामुळे इंदुरीकर महाराजांची 80% कीर्तने…

Big Boss मराठी मध्ये तृप्ती देसाई आणि शिवलीलामध्ये जुंपली ! तृप्ती देसाई म्हणाली; माझ्यामुळे इंदुरीकर महाराजांची 80% कीर्तने…

मनोरंजन

बिग बॉस मराठी चे नवीन पर्व नुकतेच चालू झाले आहे. मराठी पर्वातील बिग बॉस या रिॲलिटी शोचा हा तिसरा सीजन आहे. पहिले दोन्ही सीजन चांगले चर्चेमध्ये राहिले, त्यामुळेच मेकर्स तिसरा सिझन देखील त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला घेऊन आले आहेत. कायमच बिग बॉस या रियालिटी शोचा मोठा चाहता वर्ग बघायला मिळाला आहे.

प्रादेशिक भाषेच्या बिग बॉस ला देखील उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांकडून बघायला मिळत आहे. बिग बॉस मराठी चे पहिले पर्व चांगलेच रंगले होते. आणि आता बिग बॉस 3 चे पर्व चांगले रंग यावे यासाठी मेकर्सने कोणतीही कसर सोडली नाही. बिग बॉस मराठी मध्ये यावेळेस वेगवेगळे वा’दग्र’स्त सेलिब्रिटीज देखील सदस्य म्हणून आले आहेत.

त्यापैकी एक सदस्य अरुण गवळी यांचा जावई आहे. त्यातच समाजसेविका तृप्ती देसाईला देखील बिग बॉसने आपल्या सदस्य म्हणून घरात जागा दिली आहे. तृप्ती देसाई या सुरवातीपासूनच वा’दाच्या भोव’ऱ्यात अड’कलेल्या असतात. प्रसिद्ध आणि लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर केलेल्या के’समुळे त्यांना खास लाईमलाईट मिळाली होती.

त्यातच बिग बॉसने प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांनादेखील बिग बॉसच्या घरात आणले आहे. त्यामुळे पहिल्याच एपिसोड पासून तृप्ती देसाई आणि शिवलीला पाटील या दोघींचे नाते कसे असेल हे बघण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आत्ताच झालेल्या एपिसोड मध्ये तृप्ती देसाईने इंदुरीकर महाराजांबद्दल पुन्हा विधान केले आहे.

विशेष म्हणजे ही चर्चा सुरू असताना शिवलीला तिथेच उपस्थित होत्या. तृप्ती देसाई म्हणाल्या की, ‘आमच्या आंदोलनामुळे इंदुरीकर महाराजांची युट्युब वरील 80 टक्के किर्तन डिलीट करण्यात आली. हा खूप मोठा बदल आहे. त्यामुळे हा पण एका अर्थी माझा विजयच आहे.’

त्यावर उत्तर देत असताना शिवलीला म्हणाल्या की, ‘मला बिग बॉसच्या या घरात आत येण्यापूर्वी तुमचा फोटो दाखवण्यात आला होता, आणि तुमच्याबद्दल काय मत आहे असं विचारलं होतं. तेव्हा मी फक्त एकच बोलले होते, या ताईंनी इंदूरीकर महाराजांच्या कीर्तनाचा मतितार्थ ना समजून घेता त्यांच्याविरोधात के’स दाखल केली होती.

मीच काय कोणतेही कीर्तनकार असू देत पुराव्याशिवाय आम्ही कीर्तन करत नाही. जे पण आम्ही बोलतो त्याला कुठे ना कुठे काही तरी संदर्भ असतो. आणि त्याचा पुरावा देखील हजर असतो.’ त्यावर बोलत असताना तृप्ती देसाई म्हणाली की, ‘इंदुरीकर महाराज कायमच आपल्या कीर्तनामध्ये महिलांचा अप’मान करतात. ते म्हणतात ची बायकांनी फेटा घालू नये.

तू फेटा घातला तर मी काय गाऊन घालावा का? असं ते म्हणतात. पण बायकांनी फेटा घातला म्हणून काय बिघडलं? तू स्वतः आपण फेटा घालतेसच ना? त्यांच्या याच सर्व गोष्टींमुळे त्यांची युट्युब वरून कीर्तन डिलीट केली गेली हेच खरं आहे.’ त्यावर शिवलीला पाटील म्हणाल्या की, ‘केवळ कीर्तनाच्या वेळी मी फेटा घालते. इतर वेळी फेटा घालत नाही.

आणि फक्त इंदुरीकर महाराजांचीच नाही तर, त्यावेळी अनेकांचे कीर्तन युट्युब वरून डिलीट करण्यात आले होते. मला नाही वाटत की या आंदोलनाचा काही संबंध आहे.’ तृप्ती देसाई च्या बद्दल बोलल्या कि, ‘हि कीर्तने डिलीट करण्यात आले, कारण तेव्हा आंदोलनाचा काळ चालू होता.

त्यामुळे घाबरून सगळ्यांनी कीर्तने डिलीट केले.’ त्यावर शिवलीला पाटील यांनी देखील उत्तर दिले आणि म्हणाल्या की, ‘एकच गोष्ट सत्य आहे बा’टली आणि बाई च्या मागे जाणारा तरुण वर्ग, या माणसामुळे आज कीर्तनाकडे वळला आहे. इतका मोठा समाज प्रबोधन करण्याचे काम साधारण व्यक्ती मध्ये असूच शकत नाही.’

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *