‘बिग बॉस’धून बाहेर आल्यानंतर शिवलीला पाटीलला कीर्तन करणे पडले महागात, गु’न्हा दाखल…कारण वारकरी संप्रदायाने…

मनोरंजन
माघील काही दिवसांपासुन, कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगल्याची आपण पहिली आहे. सुरुवातीपासूनच, कीर्तनकार शिवलीला यांचा मोठा चाहतावर्ग सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यांचे कीर्तन, मोठ्या आवडीने इंटरनेटवर पहिले जातात. कीर्तन हे सुरुवातीपासूनच पुरुषप्रधान क्षेत्र आहे.
मात्र, तरुण शिवलीला पाटील यांनी आपली मधुर वाणी आणि ज्ञानाच्या जोरावर अल्पावधीतच, चांगलीच ख्याती मिळवली. राजमाता जिजाऊचे कीर्तन करताना, ज्याप्रकारे तल्लीन होऊन त्या कीर्तन करतात; त्याचप्रमाणे त्यांचे कीर्तन ऐकनारा देखील मंत्रमुग्ध होऊन जातो. त्यांची लोकप्रियता बघता, वा’दग्र’स्त रियालिटी शो, बिग बॉसमध्ये त्यांना जाण्यासाठी विचारण्यात आले.
तेव्हा, त्यांनी देखील होकार दिला आणि बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. त्यांनी वारकरी म्हणूनच प्रवेश केला आणि तिथे वावरताना त्यांनी वारंवार आपल्या संस्कृतीचाच परिचय दिला. मात्र, तरीही सुरुवातीपासून त्यांच्या बिग बॉसच्या घरात जाण्यावरून अनेकांनी त्यांच्यावर स’डकून टी’का केली. त्यामुळे अवघ्या एका आठवड्यामध्ये त्यांना घराच्या बाहेर यावं लागलं.
त्यानंतर नुकतंच बुलढाणा जिल्ह्यातील, देऊळगाव मही येथे, नवरात्र निमित्त शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या, महाराष्ट्र सरकाराच्या आदेशानुसार, को’रो’नाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवानिमित्त गर्दी करण्यास स’क्त म’नाई आहे. हेच आदेश, बुलढाणा जिल्ह्यातील जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले होते.
मात्र, हभप कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाला प्रचंड प्रमाणात गर्दी जमली. २००हुन अधिक, लोकं शिवलीला पाटीलची कीर्तन ऐकायला, हजर झाले होते. यासंदर्भात पो’लिस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी सरकारतर्फे पो’लि’सात दिलेल्या तक्रारीवरून, सदर मंडळाचे आयोजक संदीप विजय राऊत (वय २५), गणेश साहेबराव गोरे व किशोर शालिकराम पोफळकर (राहणार देऊळगाव मही) यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी, यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गु’न्हा नोंदविण्यात आला.
कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांनी बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री केली होती, आणि त्यामुळे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने, कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या नि’षेधार्थ सदर कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी आयोजकांकडे केली. बिग बॉस हा शो पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन घडविणारा आहे.
त्यामुळे, यामध्ये एन्ट्री करून हरीभक्त पारायण या सन्मानाचा अवमान झाला आहे, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने व्यक्त केली आणि सदर कीर्तनाच्या कार्यक्रमास वि’रोध दर्शविला. तरीही आयोजकांनी मात्र माघार घेतली नाही. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि कीर्तनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.
दरम्यान घडल्या प्रकारावर शिवलिलाताई पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, ‘बिग बॉसमध्ये गेले ही माझी चूक. मात्र, आपल्या धर्माची संस्कृती आपल्या संप्रदाय माझे कीर्तन माझी तुळशी माय अख्ख्या महाराष्ट्राला दिसावी म्हणून मी बिग बॉसमध्ये गेले.
मात्र, तिथं राहून मात्र तिथे, मी वारकरी संस्कृतीचेच दर्शन घडविले. मी अभंगावर बोलले. ज्ञानेश्वरी वाचन तुळशी पूजन अजिबात सोडले नाही. वारकरी संस्कृती जपूनच बिग बॉसच्या घरात राहिले. मात्र एक मुलगी आहे म्हणून, माझ्यावर कीर्तन न करण्यासाठी अनेकवेळा दबाव टाकण्यात आला होता.’