कीर्तनकार शिवलीला पाटील ‘बिग बॉस’च्या घरातून कायमची बाहेर, म्हणाली; मी जास्त वेळ राहिले तर…

मनोरंजन
बिग बॉस या रियालिटी शोचे दरवाजे कायमच सर्वच क्षेत्रातील व्यक्तींसाठी खुले असतात. हिंदी बिग बॉसमध्ये खेळाडू पासून ते गु’न्हेगा’रापर्यंत सर्वाना, मेकर्सने संधी दिली होती. काही बाबा, काही भविष्यकार यांना देखील हिंदी बिग बॉसमध्ये झळकण्याची संधी मिळाली होती.
यामध्ये काहींना, आपापले व्यक्तित्व उत्तम प्रकारे दाखवण्यात यश आले, मात्र काहींना ते जमेलच नाही. यंदाच्या बिग बॉस मराठीच्या पर्वात, मेकर्सने चांगलाच गोंधळ व्हावा यासाठी पूर्ण तैयारी केली होती. कीर्तनकारांच्या वि’रोधात आं’दोलन करणाऱ्या तृप्ती देसाईंच्या वि’रोधात, लोकप्रिय कीर्तनकार शिवलीला पाटील यांना मेकर्स बिग बॉसच्या घरात घेऊन आले होते.
मात्र, शिवलीला पाटील यांच्या सहभागामुळे, सुरुवातीपासूनच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टी’का करायला सुरुवात केली होती. काहींनी त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात किती तफावत आहे, असं देखील आपलं मत मांडलं होत. मात्र, बिग बॉसच्या घरात राहताना, शिवलीला यांनी केवळ प्रेक्षकांची मनच जिंकली होती.
तृप्ती देसाईने त्यांना, वारंवार कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून टार्गेट केलं होत. मात्र तरीही, शिवलीला यांनी अगदी नम्रपणे त्यांना उत्तर दिल होत. त्यांच्या याच खास शैलीचे अनेक चाहते कौतुक करत होते. नॉमिनेशन टास्कच्या वेळी, अनेक सदस्यांनी शिवलीलाला नॉमिनेट केलं होत. त्यावेळी, आपलं मत मांडताना शिवलीला बोलल्या होत्या की,’बिग बॉसच घर म्हणजे भांडण, काड्या आणि वा’द असाच सगळ्यांचा समज आहे.
मात्र मी असा विचार केला नव्हता. बिग बॉसच्या घरात जेव्हा मी प्रवेश केला होता तेव्हा, मी हाच विचार केला होता की इथे असणारा प्रत्येक व्यक्ती माझा आहे. इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आपलं समजते. कोणाबद्दल देखील माझ्या मनात काहीच नाहीये, त्यामुळे जेव्हा पण या घरातून बाहेर जाणार तेव्हा नक्कीच सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल.’
त्यांच्या या बोलण्याने केवळ घरातील सदस्यच नाही तर, प्रेक्षकांचे देखील मनं जिंकली होती. मात्र, त्यानंतर शिवलीला यांची प्र’कृती खालावली. डॉ’क्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना, घराच्या बाहेर उ’पचारांसाठी काढण्यात आले. मात्र त्यानंतर देखील, त्या बिग बॉसच्या घरात कधी जाणार याबद्दल मोठा प्रश्न होता. तर आता त्याच उत्तर मिळालं आहे.
वीकेंडच्या चावडीत शिवलीलाचा एक व्हिडियो सर्व स्पर्धकांना दाखवण्यात आला. त्यामध्ये आपली प्रकृती ख’राब असल्यामुळेच आपण शोमधून बाहेर जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्या व्हिडियोमध्ये शिवलीला म्हणाल्या की, “बिग बॉसच्या घरात असताना माझी प्र’कृती बि’घडली. गो’ळ्या घेऊन, आराम करून पाहिलं. मात्र तरीही फारसा फरक पडला नाही.
अखेर उ’पचारासाठी मला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. महेश मांजरेकरांनी सूचना दिल्याप्रमाणे मला शोमध्ये खूप चांगली कामगिरी करायची होती. मात्र तब्येत साथ देत नसल्याने मी घरात पुन्हा येऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांत विशाल, मीनल, सोनाली यांच्यासोबत माझी चांगली गट्टी जमली.
घरातील इतर स्पर्धकांना मी त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याची विनंती करते”. तिचा व्हिडियो बघताना, सोनाली आणि विशाल दोघे अत्यंत भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांच्या बाहेर पडण्यामुळे त्यांचे चाहते देखील दुखावले गेले आहेत.