प्रसिद्ध अभिनेत्री सविता प्रभुणेच्या लेकीला पाहिलंत का? सुंदरतेच्या बाबतीत सारा, जान्हवीच नाही तर आलीया भट्टला देखील देते टक्कर..

प्रसिद्ध अभिनेत्री सविता प्रभुणेच्या लेकीला पाहिलंत का? सुंदरतेच्या बाबतीत सारा, जान्हवीच नाही तर आलीया भट्टला देखील देते टक्कर..

मनोरंजन

बॉलीवूड असेल किंवा मराठी चित्रपटसृष्टी, आपल्या आवडत्या कलाकारांचे मुलं म्हणजेच स्टारकिड्स बद्दल कायमच सर्वांमध्ये आकर्षण असते. सर्व-सामान्याप्रमाणे नक्कीच त्या, स्टारकिड्सचे आयुष्य नसते, हे नक्कीच आहे. मात्र, त्यामध्ये देखील कोणत्या स्टारकिडच्या बाबतीत काय खास, हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

मराठी कलाकारांच्या मुलांच्या बाबतीत देखील कायमच, प्रेक्षांमधे उत्सुकता असते. त्यामुळे, हे स्टारकिड्स सुरुवातीपासूनच प्रकाशझोतात येतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहतावर्ग असतो. मात्र, काही असे स्टारकिड्स देखील आहेत, जे सुरुवातीपासूनच आपली वेगळी ओळख निर्मण करण्याच्या प्रयत्नात आहेत.

कारण, ते कलाकार, कायमच स्वतःला लायमलाईटपासून दूर ठेवतात. आपला चाहतावर्ग मोठा असला तरीही, काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये एक रेख नेहमीच ते कलाकार सांभाळून ठेवतात. त्याच काही मोजक्या कलाकारांपैकी एक आहेत मराठी अभिनेत्री सविता प्रभुणे. सुपरहिट मराठी सिनेमा, फेका-फेकी या सिनेमामध्ये, सविता प्रभुणे यांनी अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

आजही कित्येक, चाहत्यांच्या अगदी खास आणि आवडीच्या सिनेमामध्ये त्याच नाव आहे. त्यामध्ये, सविता प्रभुणेच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले होते. केवळ मराठी सिनेमाचं नाही तर, अनेक हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. तेरे नाम सिनेमामध्ये, सलमानच्या प्रेमळ वाहिनीची भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली होती.

पवित्र रिश्ता या बहुचर्चित मालिकमध्ये देखील, त्यांनी काम केले होते. कुसुम, साया, काव्यांजली, सारथी यासारख्या हिंदी मालिकांमध्ये त्या झळकल्या होत्या. छक्के पंजे, खरा वारसदार, लपंडाव, कळत नकळत, अशा अनेक मराठी सिनेमामध्ये त्यांनी आपल्या खास अशा अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली होती.

सुंदर आणि निरागस चेहरा, आणि सर्वात महत्वाचे प्रसन्न भावमुद्रा यामुळे कायमच, सविता प्रभुणे यांची खास वेगळी ओळख आहे. त्यांचे तेच सौंदर्य त्यांच्या मुलींमध्ये देखील आले आहे. त्यांची मुलगी, सात्विका त्यांच्याहून सुंदर आहे. सात्विका सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. मात्र, त्याआधी, आपल्या शालेय आणि कॉलेजच्या जीवनात ती नेहमीच बाकीच्या मुलीपेक्षा वरचढ होती.

शाळेत असताना पासूनच, ती उपक्रमांमध्ये, मॉडेल वॉल्क, आणि इतर स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. तिच्या सुंदर अश्या चेहऱ्यामुळे आणि अगदी उत्तम कलाप्रदर्शनामुळे शाळा असेल किंवा कॉलेज, सर्व स्पर्धा केवळ तीच जिंकत असे. शालेय जीवनापासून जडलेली आवड अजूनही कायम आहे. आता सात्विका मॉडेलिंगमध्ये आपले नशीब अजमावत आहे.

अनेक सौंदर्यस्पर्धा देखील तिने जिंकल्या आहेत. २०१४ च्या वॅन-ह्युसेनच्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये तिने आपला सहभाग नोंदवला होता. त्यावेळी, तिला काही अंकावरून ती स्पर्धा जिंकता नाही आली, मात्र अनेक मोठाल्या डिझायनरला तिने आपल्या कामाने इंप्रेस केले होते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तिने रुद्रेश आनंदसोबत विवाह केला. मात्र लग्नानंतर देखील ती मॉडेलिंग करत आहे. सात्विका अनेक डिझायनर्सच्या अगदी आवडीची मॉडेल आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *