‘ती सध्या काय करते..’अचानक गायब झालेली ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, कोकणात फुलवतेय शेती…

‘ती सध्या काय करते..’अचानक गायब झालेली ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, कोकणात फुलवतेय शेती…

सध्या बरेच लोक आपले शहरी जीवन सोडून शेतीकडे वाळलेली आपल्याला बघायला मिळत आहे. शहरी जीवनात सर्वच कृत्रिम वापरण्याच्या सवय झालेल्या या लोकांना, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याच्या आवडीने शेतीची आवड निर्माण होते.आपण असे अनेकवेळा ऐकले असेल की, सेटल असलेले आयुष्य सोडून कोणीतरी गावाकडे जाऊन शेती करत आहे. आपल्याला प्राथमिक दृष्ट्या जरी तो पोरखेळ वाटत असला तरीदेखील त्यामधून मिळणारा आनंद निराळाच असतो.

सर्वसाधारण लोक, आपले काम सेटल आयुष्य सोडून शेती करत असलेलं आपण ऐकलं असेल मात्र, एखादी सेलेब्रिटी असे करत आहे असे आपण ऐकले आहे का ? माघील २५-३० वर्ष मराठी सिनेसृष्टीमधे लेखन, नृत्य, निवेदन, सूत्रसंचालन, नाट्य दिग्दर्शन, अभिनय सर्व काही करत सेलेब्रिटी बनलेल्या संपदा कुलकर्णी अचानकच गायब झाल्या. मात्र त्या आता पुन्हा दिसत आहेत, ते कोकणात..

आता संपदा कुलकर्णी कोकणात नक्की काय करत आहेत, असे तुम्हाला वाटत असेल. तर आपले पती राहुल कुलकर्णी यांच्यासोबत त्या कोकणात शेती करत आहेत. आपल्या शेतीच्या प्रेमाविषयी संपदा सांगतात,’शहरातलं आयुष्य येथेच्छ जगलो आणि आता आम्ही गावाकडे वळलो आहोत. पूर्णपणर ओसाड जमिनीत विहिरीचा पॉइंट काढण्यापासून सर्व सुरुवात केली.

पैसा मिळवणं हा एकच उद्देश नव्हताच. शांत, समाधानी, निसर्गाची हानी न करता निसर्गातच कसं राहता येईल यासाठी आमची धडपड होती. स्वत:च्या जमा होत जाणाऱ्या पुंजीवर घर बांधलं. ओटी, पडवी, मंडप आणि पूर्वी ज्याला शेजघर, माजघर असं संबोधलं जायचं, त्याचं पर्यटकांना राहता येईल अशा खोल्यांत रुपांतर केलं.

पहिल्यांदाच ‘कृषी’ला सुरुवात केली. तांदूळ, नाचणी, पावटा, कुळिथ, तीळ, हळद याची शेती. तसंच आंबा, काजूची लागवड केली. गेल्या १२ वर्षापासून शेती आणि गेली ६ वर्ष ‘होम स्टे’ सुरू आहे.’ एका उत्तम अभिनेत्री, निवेदिकाच्या भूमिकेत तिला सर्वानीच पहिले आहे मात्र, आता शेतकरी म्हणून तिला बघून सगळीकडूनच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होता आहे. कोकणातील ‘फुणगूस’ या गावी आपल्या पतीसोबत सध्या ती शेती करत आहे.

सुरुवातीला शेती बद्दल या दोघांना काहीही माहिती नव्हती. राहुल हे सुरुवातीला जाहिरात क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांची देखील शेतीबद्दलची पती कोरीच होती. मात्र त्यांनी शेतीविषयक पुस्तके, गुगल, तज्ञ मंडळी यांच्या सहाय्याने शेतीचं रीतसर ज्ञान आत्मसात केलं. मग, त्यानंतर त्यांनी देखील आपल्या क्षेत्रातून निवृत्ती घेऊन शेती कडे आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले.

कोकणातील पर्यटन वाढावे यासाठी देखील ते दोघे काम करत आहेत. त्यांनी ‘आनंदाचे शेत’ ही एक संकल्पना सुरु केली आहे. यामध्ये बैलगाडीमधून फटका मारणे, शेतीचे झाडे त्यांची माहिती देणे, झाडाखाली बसून निसर्गाच्या सान्निध्यात जेवणाचा आनंद घेणे या सर्व बाबी पर्यटकांसाठी करतात.

संपदा कुलकर्णी यांची मुलगी शर्वरी कुलकर्णी सुद्धा एक अभिनेत्री आहे. अलीकडेच विभव बोरकरसोबत तिचे लग्न झाले आहे. ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत ती झळकली होती. मात्र, तिची आई म्हणजेच संपदा आता शेतीमध्येच चांगल्या रंगल्या आहेत आणि पुन्हा चित्रपटसृष्टीमध्ये आता त्या येणार नाही.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *