सानिया मिर्झाने भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल केले वक्तव्य, म्हणाली; भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी मी…

सानिया मिर्झाने भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल केले वक्तव्य, म्हणाली; भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी मी…

भारत, आणि पाकिस्तान हे पारंपरिक श’त्रू आहेत. या दोन्ही देशांमधील क्रिकेटचे सामने देखील मोठ्या उत्सुकतेने जगभरामध्ये पाहिल्या जातात. भारत आणि पाकिस्तान चा सामना जर असेल तर जगभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष या दोन्ही देशांच्या क्रिकेटवीराकडे लागलेले असते. त्याचप्रमाणे इतर देशांमध्ये देखील आणि क्रिकेटचे चाहते हा सामना पहात असतात.

कारण या दोन्ही देशांमधील युद्ध या सामन्यामध्ये पाहायला मिळत असते. त्याचप्रमाणे कोट्यावधी रुपयाचा स’ट्टा देखील लावण्यात येत असतो. त्यामुळेच या सामन्याला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व असते. आता पाकिस्तानचा खेळाडू आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हे दोघेही पती-पत्नी आहेत. सानिया मिर्जा हिला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असेल तर तिला खूप मोठ्या प्रमाणात ट्रो’ल करण्यात येते.

तू आता कोणाची बाजू घेणार आहेस असे तिला विचारण्यात येते. त्यामुळे ती अतिशय कात्रीत सापडलेली असते. एकीकडे पती असतो तर एकीकडे देश असतो. त्यामुळे तिला काय करावे, ते समजत नाही. मात्र, मी कायम भारताच्या बाजूने आहे, असे ती म्हणत असते. यंदा टी 20 विश्वचषकामध्ये भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.

24 ऑक्‍टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अतिशय उत्कंठावर्धक असा सामना होणार आहे. आता हा सामना होणार असल्याने अनेक क्रिकेटपटूंना पासून राजकीय व्यक्तींनी देखील या सामन्यात बाबत वेगवेगळे वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे हा सामना होईल त्यावेळेस अतिशय मजा येणार असल्याचे देखील आत्ताच दिसत आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने देखील भारत आणि पाकिस्तानच्या मॅच बद्दल एक महत्त्वाची घोषणा आत्ताच करून टाकली आहे.

त्यामुळे देखील ती आता एकदम च’र्चेत आली आहे. सानिया मिर्झा हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून एक नुकताच व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सानिया मिर्झा म्हणाली की, भारत आणि पाकिस्तान यादरम्यान सामना असेल तेव्हा मी सोशल मीडिया पासून काही काळासाठी दूरच राहणार आहे. कारण की याच दरम्यान मला अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागते, असे ती म्हणताना दिसत आहे.

मी भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सामन्याच्या दिवशी सोशल मीडिया आणि वा’ई़ट वातावरणापासून दूर राहणार असल्याचे तिने सांगितले आहे. तसेच सानिया मिर्झा हिने या व्हिडिओला कॅप्शन देखील दिलेली आहे. त्यामध्ये तीने ‘बाय-बाय’ असा उल्लेख करताना दिसत आहे. या सानिया मिर्झाच्या व्हिडिओवर क्रिकेटर युवराज सिंह याने देखील आपली कमेंट टाकलेली आहे.

त्याने एक हसणारी इमोजी पोस्ट केली आहे. तसेच त्याने म्हटले आहे की, तुझा चांगला विचार आहे. सानिया मिर्झा हिने शोएब मलिक याच्यासोबत लग्न केल्यापासून तिला अनेकदा ट्रो’ल करण्यात येत असते. सानियाचा पती शोएब मलिक याला अगदी शेवटच्या क्षणी टी २० विश्वचषकासाठीच्या संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. जखमी झालेल्या सोहेब मकसूदच्या जगी शोएबला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्याकडे पूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *