सचिन पिळगांवकर यांची ‘कोल्हापूरच’ नाव बदलण्याची मागणी! म्हणाले; कोल्हापूरच नाव बदलून ‘हे’ नाव ठेवा..

सचिन पिळगांवकर यांची ‘कोल्हापूरच’ नाव बदलण्याची मागणी! म्हणाले; कोल्हापूरच नाव बदलून ‘हे’ नाव ठेवा..

नावात काय आहे असं म्हणून शेक्सपियरने आपले नाव इतिहासात अमर केले. काम केल्याने आपली ओळख निर्माण होते, मग नावात ठेवलंच काय आहे असं शेक्सपियरच मत आहे. आणि संपूर्ण जगाने देखील ते मान्य केले. मात्र, तस पाहिलं तर नावात बरच काही आहे, तस पाहिलं तर काहीच नाही.

मात्र कोणत्याही गावाची किंवा प्रांताची ओळख ही त्या गावाच्या नावावरच असते. आपल्याच काय इतर देशात देखील कोणत्याही गावाचे नाव, म्हणजे त्या गावाचा ऐतिहासिक वारसा असतो. त्या गावाच्या नावावरून, तिथे घडून गेलेल्या गोष्टींची माहिती मिळते. आपल्या देशात काही गावांचे नावं बऱ्याच वेळा बदलण्यात आले.

ऐतिहासिक नाव हे त्या प्रांताच्या राजाच्या नावावर, किंवा देवाच्या नावावर असते. बऱ्याच दिवसांपासून आपल्या देशात अनेक गावांचे नाव बदलण्याचे सत्र सुरु झाले आहे. त्यातच आता सचिन पिळगावकर यांनी कोल्हापूरचे नाव बदलण्याची मागणी केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. कोल्हापूर म्हणलं, की सगळ्यात पहिले आपल्यासमोर येते ते महालक्ष्मीचे मंदिर.

महालक्ष्मी देवस्थानाची संपूर्ण जगात कीर्ती आहे. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचे कोल्हापूर म्हणून ओळखले जाऊ लागले. या नंतर कोल्हापूरमधून अनेक कर्तृत्व समोर आले. पण या दोन्ही ओळख शाश्वत आहेत. अनेक नेते, पहिलवान, कलाकार यांनी कोल्हापूरला कायमच प्रकाशझोतात ठेवले. चित्रपटसृष्टीचे माहेर म्हणून देखील कोल्हापूरची वेगळी ओळख आहे.

दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये भारतात चित्रपटसृष्टीचा पाया घातला, मात्र मराठी चित्रपटसृष्टीचा पाया बाबुराव पेंटर यांनी कलानगरी कोल्हापूर शहरात घातला. सगळ्याच मराठी कलाकरांना याचा सार्थ अभिमान आहेच. म्हणून तर कोल्हापूरच्या चित्रपटनगरी बाबुराव पेंटर यांचं नाव द्यावं अशी मागणी, माघील कित्येक काळापासून होत आहे.

कोल्हापूर हे मूळ नाव नाहीच, म्हणून या शहराचे नाव बदलण्यात यावे. कोल्हापूरचे नाव बदलून कलापूर करावे असं सचिन पिळगावकरने म्हणलं आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमामध्ये सचिन यांनी आपलं मत मांडत ही मागणी केली आहे. यामध्ये ते बोलले की, ‘त्या शहराचं नाव कोल्हापूर असं कधीच नव्हतं.

चित्रपट निर्मितीचा गाव म्हणून त्या शहराचं ऐतिहासिकत्व आहे. बऱ्याच कलावंतांनी चित्रपटक्षेत्रातील महत्त्वाचे प्रथम प्रयोग तिथे केले आहेत. सर्वच प्रकारचे दिग्गज कलाकार तिथे घडले आहेत. म्हणून त्या शहराला लोक ‘कलापूर’ असं म्हणत होते. इंग्रजांनी ‘मुंबई’ शहराचं नाव उच्चारताना बदलून ‘बॉम्बे’ असं केलं होतं, त्याचप्रकारे ‘कलापूर’ शहराचा उच्चार इंग्रजांनी वेगळा केला आणि त्यांनीच शहराचं नाव ‘कोल्हापूर’ असं केलं.’

त्याचबरोबर सचिन पिळगावकरने सिनेमाक्षेत्रात झलेल्या बदलांबद्दल देखील आपलं मत यावेळी व्यक्त केलं. ‘सध्याच्या काळात सिनेमांमध्ये आधीसारखी मजा राहिलेली नाहीये. कारण आता हे क्षेत्र प्रचंड बदलले आहे. या क्षेत्राला आता डिजिटल स्वरुप मिळालं आहे.

या क्षेत्राने कायमच नवीन प्रयोगांचा स्वीकार केला आहे आणि हीच याची खासियत आहे. माघील ५८ वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करत आहे.मी देखील माझ्या कारकिर्दीत अनेक नविन प्रयोग केले आहेत. आणि अजूनही रोज मला येथे नवीन काही शिकायला मिळते.” असं ते म्हणाले

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *