‘कट्यार काळजात घुसली की मेंदूत’ ! सचिन पिळगावकर यांनी ‘उर्दूत’ जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्यामुळे नेटकऱ्यांनी घेतली ‘शाळा’..

‘कट्यार काळजात घुसली की मेंदूत’ ! सचिन पिळगावकर यांनी ‘उर्दूत’ जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्यामुळे नेटकऱ्यांनी घेतली ‘शाळा’..

सोमवारी देशभर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साहात साजरा झाला. पण कोरोनामुळे यावेळेस देखील भाविकांचा हिरमोड झाला. त्याला कारण म्हणजे राज्य सरकारने लावले प्रतिबंध. पण तरी देखील मनसेने त्यांच्या शैलीमध्ये दहीहंडी साजरी केलीच.

दरम्यान, सण म्हटलं की बॉलिवूडच्या आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी या प्रसंगी चाहत्यांना भरभरून शुभेच्छा देत असतात. त्यांच्या सोशल मीडिया अकॉउंटच्या माध्यमातून अनेक कलाकार शुभेच्छा देत असतात. पण शुभेच्छा देताना धार्मिक गोष्टीचे भान ठेऊन त्यांना या शुभेच्छा द्याव्या लागतात यामध्ये थोडी जरी चूक झाली की त्या कलाकाराला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामान करावा लागतो.

असेच काहीसे घडले ते ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याबद्दल. सचिन पिळगावकर हिंदी तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्ग्ज अभिनेत्यांमध्ये गणले जातात. मराठीप्रमाणे हिंदीमध्ये आजही त्यांचा चाहतावर्ग आहे. तसेच त्यांनी दूरदर्शनवरील अनेक मालिकांमध्ये काम आणि त्याचबरोबर अनेक मालिकांचे दिग्दर्शन देखील केले आहे.

पण आज सचिन पिळगावकर वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत ते त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे. कारण त्यांनी शुभेच्छा देताना ना मराठी ना हिंदी तर उर्दू भाषेचा वापर केला आहे. त्यामुळे त्यांना नेटकाऱ्यानी धारेवर धरले आहे.

सचिन यांनी फेसबुकवरून शुभेच्छा दिल्या होत्या. पण त्यांच्या शुभेच्छा चाहत्यांना फार रूचल्या नाहीत आणि मग काय, लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली.फेसबुकवर कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना सचिन यांनी एक उर्दू शेर शेअर केला. ‘अगर किशन की तालीम आम हो जाए, तो काम फितनागरों का तमाम हो जाए…,’ हा मौलाना जफर अली खान यांनी शेअर केला. सोबत जन्माष्टमी मुबारक हो.., असेही लिहिले.

ही पोस्ट पाहून अनेकांनी सचिन यांना लक्ष्य केले. गोकुळाष्टमीसारख्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी, हिंदी, संस्कृत असे पर्याय उपलब्ध असताना उर्दूचाच आग्रह का? अशा आशयाचा सवाल अनेकांनी पिळगावकर यांना विचारला.

पिळगावकर, भगवद्गीतेत 600 पेक्षा अधिक श्लोक आहेत. तुम्ही ‘कट्यार’मध्ये मुस्लिम गायकाची भुमिका केलीत, त्या भुमिकेतून बाहेर या आणि कुणाचेही दाखले देऊ नका, अशी कमेंट एका फेसबुक युजरने केली. श्रीकृष्णाने अख्खी गीता संस्कृतमध्ये सांगितली, त्याच श्रीकृष्णाच्या जन्म तिथीच्या शुभेच्छा उर्दू भाषेत दे आहात? काही विचार करून तरी शुभेच्छा द्यायच्या, असे एका युजरने लिहिले.

तुमच्याकडून हीच नकली धर्मनिरपेक्षता अपेक्षित होती, अशा शब्दांत एका युजरने सचिन यांना ट्रोल केले. अहो सचिन, तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलात, मराठीचा वापर करा, असा सल्ला एकाने त्यांना दिला. कट्यार नक्की काळजात घुसली की मेंदूत, अशी कमेंट एकाने केली.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.