‘आई कुठे..’ फेम ‘या’ अभिनेत्रीची हटके आहे लव्ह स्टोरी !स्वतःच्याच पीआर मॅनेजरच्या पडली प्रेमात, आणि लगेच गुपचूप उरकले लग्न..

‘आई कुठे..’ फेम ‘या’ अभिनेत्रीची हटके आहे लव्ह स्टोरी !स्वतःच्याच पीआर मॅनेजरच्या पडली प्रेमात, आणि लगेच गुपचूप उरकले लग्न..

चित्रपटसृष्टीची एक खासियत आहे. आजवर ज्या कलाकारांनी नकारात्मक भूमिका साकारली आहे त्यांचा देखील मोठा चाहता वर्ग आहे. रुपेरी पडद्यावर जे कलाकार नकारात्मक भूमिका साकारत आहेत त्यांचे तेवढेच अधिक फॅन्स खऱ्या आयुष्यात देखील बनतात. असे अनेक उदाहरण आपण पाहिले आहेत.

मालिकांमध्ये तर नकारात्मक यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला देखील, तेवढीच लोकप्रियता मिळते जेवढी प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला मिळते. तर अनेक वेळा आपण हे देखील पाहिले आहे की, नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला प्रमुख अभिनेत्री पेक्षा जास्त लोकप्रियता मिळते. हिंदी मालिकांमध्ये आपण ते सत्र पाहिलेच आहे.

कसोटी जिंदगी की या मालिकेमध्ये व्हॅम्प कोमोलिका ने प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्रेरणापेक्षा जास्त लोकप्रियता प्राप्त केली होती. त्याच प्रमाणे उतरण या मालिकेत देखील तपस्या च्या भूमिकेची जास्त चर्चा रंगली होती. आता हेच सत्र मराठी मालिकांमध्ये देखील बघायला मिळत आहे. आई कुठे काय करते या मालिकेतील नकारात्मक पात्र रेखाटणार्‍या संजना चा देखील भला मोठा चाहतावर्ग आहे.

अरुंधती इतकीच प्रसिद्धी आणि लोकप्रियता संजनाला देखील मिळत आहे तिचे काम आणि तिचा हटके अंदाज सर्वांच्या मनाला भोवला आहे. त्यामुळे अल्पावधीतच तिने भला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. बिग बॉस मराठी मधून तिने पुन्हा सिनेसृष्टीमधे पदार्पण केले. बिग बॉस मधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

आणि याच सेटवर तिला आपले पूर्व देखील मिळाले. संजना म्हणजेच रुपाली भोसले हिचा पीआर म्हणून अंकित मगर काम बघत होता. त्यामुळे, बिग बॉस मराठीच्या आधीपासूनच त्यांची ओळख होती. मात्र, या शोच्या दरम्यान त्यांची ओळख मैत्रीमध्ये आणि मैत्री प्रेमामध्ये रूपांतरित झाली. रुपाली सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

आपले अनेक फ़ोटोज ती आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. तिने अंकित आणि तिचे देखील अनेक फोटोज सुरुवातीपासून शेअर केले. त्यांनी जाहीररीत्या आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली होती. त्यानंतर तर त्या दोघांनी आपले लॉकडाऊन मधील देखील फोटोज शेअर केले होते. लॉकडाउनच्या काळात या दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चाना उधाण आलं होत.

काही फोटोंमध्ये, रुपालीने गळ्यात मंगळसूत्र आणि सिंदूर देखील लावलेला दिसून येत आहे. त्यामुळे त्या दोघांच लग्न झालं असल्याची खात्री आता त्यांच्या चाहत्यांना आहे. रुपालीचे हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी तिने एका बिझनेसमॅनसोबत लग्न केलं होत. ७वर्ष त्यादोघांनी सोबत संसार केल्यांनतर ते वेगळे झाले. मात्र, अंकितच्या रूपात तिला तिचे खरे प्रेम मिळाले.

प्रोफेशनली सुरु झालेले अंकित आणि रुपालीचे नाते कधी, प्रेमात रूपांतरित झाले हे त्या दोघांनाच समजलं नाही, असं रुपालीने एकदा बोललं आहे. अंकितची पीआर कंपनी आहे आणि मोठाल्या स्टार्स सोबत तो काम करत आहे. अनेक अभिनेत्रींसोबत आणि क्लाइंट्ससोबत काम केल्यानंतर त्याला रुपालीमध्ये आपले खरे प्रेम मिळाले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *