कौतुकास्पद ! ‘या’ मराठी अभिनेत्रीने को’रोना काळात केलं लग्न, पण लग्नात जे काही केलं ते वाचून तुम्हीही कराल तीच कौतुक…

‘लव लग्न लोचा’ फेम अभिनेत्री रुचिता जाधव ही नुकतीच विवाहबंधनामध्ये अ’डकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सो’शल मी’डियावर जबरदस्त व्हा’यरल होत आहे. साताऱ्यामधील पाचगणीत को’रो’नाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार झाला होता. या विवाहसोहळ्याच्या दरम्यान या नवदाम्पत्याने अगदी गुपचूप एका सामाजिक कार्यास हातभार लावला आहे.
बॉलीवूड असेल किंवा मराठी चित्रपटसृष्टी सर्व कलाकार आपल्या करियरसोबतच कायम कौटुंबिक सुखाचा सुद्धा शोध घेत असतात. म्हणूच अनेक कलाकार सर्वात सुंदर असे नाते म्हणजेच लग्नाच्या बेडीत अडकत आहेत.
मिताली मयेकर, सिद्धार्थ चांदेकर, आस्ताद काळे, संग्राम समेळ, ऋचा आपटे, क्षितीज दातेनंतर आत्ताच अजून एक अभिनेत्री लग्नंबंधनात अ’डकली आहे. ‘लव्ह लग्न लोचा’ फेम अभिनेत्री रुचिता जाधव हिने नुकतेच आनंद मानेसोबत लग्नगाठ बांधली आहे. माघील बऱ्याच दिवसांपासून रुचिता जाधव तिच्या लग्नाला घेऊन चांगलीच चर्चेत होती.
आणि साताऱ्यात काहीच दिवसांपूर्वी अखेर हा विवाह सोहळा पार पडला. सध्या को’रो’नाने थै’मान घातलं असल्यामुळे सर्वच सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात तर कडक लॉकडाऊनचा पर्याय को’रो’नाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निवडण्यात आला आहे.
त्यामुळे लग्नासारखे कार्यक्रम सरकारच्या नियमांनुसारच करावे लागत आहेत. म्हणूनच रुचिताने देखील हे सर्व नियम पाळत आपल्या कुटुंबाच्या उपस्थित हा विवाहसोहळा पार पाडला आहे. पाचगणीच्या एका रिसोर्टवर हा लग्नसोहळा पार पडला. याची माहिती आधीच रुचिताने दिलेली होती.
यावेळी मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. बऱ्याच दिवसांपासून रुचिता आपल्या लग्नाबद्दल चर्चेत होती. लग्नाला रुचिता आईचा शालू नेसणार अशी देखील चर्चा होती. त्यामुळेच ती बरीच चर्चेत आली होती.
‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेमुळे रुचिता खुपचं प्रसिद्ध झाली होती. मात्र रुचिताने आपल्या कामाची सुरुवात जाहिरातीमधून केली होती. यातून तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला होता. रुचिता ही एक पुणेकर आहे. रुचिता सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती सतत आपल्या हॉ’ट आणि बो’ल्ड फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
रुचिता ने उद्योजक आनंद माने याच्याशी लग्नगाठ बांधली होती. सध्या लॉकडाउन असल्याने लग्नात केवळ २५ पाहूण्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसारच सगळ्या नियमांचे कडेकोट पालन करून पाचगणीतील फर्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला होता.
ठरल्याप्रमाणे मेहेंदी, संगीत, हळद अशा कार्यक्रमांच नियोजन देखील झालं होतं. मात्र, रुचिता व आनंद यांनी संगीत सोहळा रद्द करत पाचगणीच्या आजूबाजूला असलेल्या गावांत १५०० गहू तांदूळाचे पॅकेट्स वाटले आहेत. रुचिता आणि आनंद यांनी दाखवलेली हि सामाजिक बांधिलकी बघून सगळ्यांनीच त्यांच तोंडभरून कौतुक केलं आहे.
आनंद आणि रुचिताच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडिया वर फार व्हायरल होत आहेत. तर रुचिता ही लग्नाच्या पोषाखात अगदी मनमोहक दिसत आहे. रुचिता सोशल मीडिया वर फार सक्रिय असते. तर लग्नाच्याही सगळ्या अपडेट्स ती शेअर करत होती. ३ मे रोजी रुचिता आणि आनंदने लग्न केलं होतं. त्यानंतर रुचिताच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. रुचिता ही ‘लव लग्न लोचा’ सह काही हिंदी मालिकांमध्येही दिसली होती.