‘श्रेयस तळपदे’नंतर आता बॉलिवूड मधील हा प्रसिद्ध अभिनेता दिसणार मराठी मालिकेमध्ये..

मनोरंजन
काही दिवसापूर्वी झी मराठी या वाहिनीवर “माझी तुझी रेशीमगाठ” मालिका सुरू झाली आहे. या मालिकेमध्ये श्रेयस तळपदे हा अभिनेता दिसला आहे. श्रेयस तळपदे याच्यासोबत प्रार्थना बेहरे ही अभिनेत्री देखील दिसली आहे. ही मालिका आता चांगलीच गाजत आहे. या दोघांसोबतच मायरा या छोट्या मुलींची भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीने प्रचंड थैमान घातले आहे. यामुळे अनेकांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळेच हे कलाकार आता छोट्या पडद्यावर मालिकांमध्ये काम करताना दिसत आहे. या माध्यमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन तर करतच आहेत. मात्र, त्यांना चार पैसेही मिळत आहेत.
आता मराठीमध्ये निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे या सारखे कलाकार देखील मालिकांमध्ये काम करताना दिसत आहेत. कारण की आता टीव्हीवर देखील या कलाकारांना चांगल्या संधी मिळत आहेत. याच प्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अनेक कलाकार आपले नशीब आजमावत आहेत. कारण की मोठ्या पडद्यावर म्हणजेच चित्रपटगृहांमध्ये चित्रपट आता प्रदर्शित होत नाहीत.
याला आणखीन काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे या कलाकारांनी आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे. याप्रमाणे मराठीतील दिग्गज चित्रपट निर्माते दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे हे देखील आताछोट्या पडद्यावर नशीब अजमावताना दिसत आहेत. महेश कोठारे यांची “सुख म्हणजे नक्की काय असतं” ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलच मनोरंजन करताना दिसत आहे.
यामध्ये जयदीप आणि गौरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. यामध्ये वर्षा उसगावकर यांनी देखील काम केले आहे. काही दिवसापूर्वी या मालिकेत एक वादाचा प्रसंग घडला होता. मात्र, त्यानंतर महेश कोठारे यांनी यासाठी जाहीर माफी देखील मागितली होती. बॉलीवूडमध्ये अतिशय गाजलेला अभिनेता रितेश देशमुख देखील आता मराठी मालिका मध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येते.
रितेश देशमुख याने काही वर्षांपूर्वी “तुझे मेरी कसम” या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत जेनिलिया देशमुख-डिसुजा ही दिसली होती. या चित्रपटात दरम्यानच्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर या दोघांनी लग्न केले. बॉलीवुडची सर्वात आदर्शवत जोडी म्हटले जाते. रितेश देशमुख याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे चांगलीच मनं जिंकली आहेत.
त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने काम केलेले जवळपास सगळे हिट चित्रपट ठरलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याने “लय भारी”, “माउली, या मराठी चित्रपटात देखील काम केले आहे.आता रितेश देशमुख देखील मराठी मालिकांमध्ये काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 2016 मध्ये रितेश देशमुख याने “विकता का उत्तर” या शोचं सूत्रसंचालन केले होते.
त्यानंतर आता पाच वर्षांनंतर रितेश देशमुख आता छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे. स्टार प्रवाह वर एक नवीन मालिका सुरू होणार आहे.आता रितेश देशमुख या मालिकेत नेमकी कुठली भूमिका करणार आहे. हे मात्र स्पष्ट झाले नाही. तसेच रितेशसोबत कुठली अभिनेत्री या मध्ये दिसणार हे ही कळू शकले नाही.