‘रिलेशनशिप’बद्दल रिंकू ने सोडलं मौन ! चाहत्याच्या प्रश्नामुळे बॉयफ्रेंडबद्दल केला मोठा खुलासा..

‘रिलेशनशिप’बद्दल रिंकू ने सोडलं मौन ! चाहत्याच्या प्रश्नामुळे बॉयफ्रेंडबद्दल केला मोठा खुलासा..

रुपेरी पडद्यावर सुंदर तारकांना बघून आपण देखील, त्या पडद्यावर झळकाव असं आपल्या देशातील अनेक मुली स्वप्न बघतात.मात्र त्यापैकी काहीच मुलींच हे स्वप्न पूर्ण होतं. मात्र आपल्या देशात एक अशी अभिनेत्री आहे, जी १८ वर्षांची होण्यापूर्वीच आपलं हे स्वप्न पूर्ण केलं. तिने केवळ आपलं हे स्वप्न पूर्णच नाही केलं तर, त्याचसोबत संपूर्ण देशभरात आपले लाखो चाहते कमवले.

नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाने त्यामधील सर्वच कलाकारांनी तुफान प्रसिद्धी मिळवून दिली. मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरुने सैराट सिनेमात बिनधास्त व बेधडक आर्चीची भूमिका साकारली, आणि लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. त्यानंतर तिने कधीच माघे वळून पहिले नाही. तेव्हापासून रिंकू कायमच चर्चेत असते.

तिची लाईफस्टाईल काय आहे? तिचा मित्रपरिवार आणि कुटुंबीय कसे राहतात? तिला परीक्षा देताना आलेली समस्या, अश्या सर्वच बाबींनी नेहमीच चांगलीच चर्चा रंगवली होती. काही दिवसांपूर्वीच आर्चीने आपले वजन कमी केले आहे आपली हॉ’ट बॉडी फ्लॉन्ट करत काही फोटोज शेअर केले होते, ती पोस्ट देखील जबरदस्त वा’यरल झाली होती.

सैराटमध्ये बिनधास्त अश्या ‘आर्ची’ची भूमिका साकारत अगदी बेधकपणे ती परश्याला आय लव्ह यू म्हणत आपल्या प्रेमाची कबुली देणाऱ्या, रिंकूच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाबद्दल म्हणजेच बॉयफ्रेंड बद्दल जाणून घेण्यासाठी देखील चाहते नेहमीच उत्सुक असतात. आणि यातच एका चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देत, रिंकूनं आपल्या बिनधास्तपणे आपल्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला.

रिंकू राजगुरु सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यात होत असणाऱ्या घटना, आपले नवीन प्रोजेक्ट्स याबद्दल नेहमीच इंस्टग्राम वरुन ती आपल्या चाहत्यांना माहिती देत असते. खूप वेळा रिंकू लाइव्ह किंवा वेगवेगळ्या सोशल मीडिया सेशनमधून देखील आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत असते. काही दिवसांपूर्वी, रिंकूनं #AskMeAnything हे सेशन इन्स्टाग्रामवर घेतलं होतं.

ज्यामध्ये तिच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले आणि तिनंसुद्धा चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची अगदी खरी आणि प्रामाणिक उत्तर दिली. चाहत्यांनी रिंकूला तिचा आवडला पदार्थ, आगामी चित्रपट, आवडतं ठिकाण असे खूप वेगवेगळे प्रश्न विचारले. एका चाहत्यांनं मात्र तिला थेट तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दलच प्रश्न विचारला.

‘तुझा बॉयफ्रेंड आहे का?’ असा एका चाहत्यानं #AskMeAnything मध्ये रिंकू राजगुरूला प्रश्न विचारला आणि विशेष म्हणजे रिंकूनं अगदी बिधास्तपणे त्याच्या या प्रश्नाचं उत्तरही दिलं. ‘No’ म्हणजे नाही असं या प्रश्नाचं उत्तर देताना रिंकू म्हणाली. आर्चीला तिच्या खऱ्या आयुष्यातला परश्या, तिचं खरं प्रेम अद्याप तिला भेटलेलं नाही आणि ती सिंगल आहे.

रिंकूची हीच इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाली आहे. लंडनमध्ये चित्रीकरण झालेल्या सिनेमात ‘छूमंतर’ या मराठी सिनेमात प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांच्यासोबत लवकरच रिंकू राजगुरू देखील दिसणार असून तिची यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. त्याचबरोबर, नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ सिनेमातसुद्धा रिंकू दिसणार आहे.सोबतच खुशबू सिन्हा दिग्दर्शित ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटात देखील ती काम करत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *