‘सैराट’नंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या पण त्यांना मी नकार दिला कारण, मला;.. रिंकू राजगुरुने केला खुलासा..

‘सैराट’नंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या पण त्यांना मी नकार दिला कारण, मला;.. रिंकू राजगुरुने केला खुलासा..

रिंकू राजगुरू अर्थातच आर्ची आता बॉलीवूड मध्ये देखील दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये ती आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणार आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या सैराट या चित्रपटाने रिंकू राजगुरु हिने मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालून दिला होता.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. हा चित्रपट मराठीमध्ये एवढा चालला की या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर हा चित्रपट हिंदी मध्ये देखील रिमेक करण्यात आला होता. हिंदी मध्ये धडक या नावाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.

या चित्रपटात जान्हवी कपूर आणि इशान खट्टर हे दोघे दिसले होते. हिंदीमध्ये हा चित्रपट अधिक कमाई करू शकला नाही. मात्र, या चित्रपटाची खूप मोठी चर्चा झाली होती. हिंदी मधील चित्रपटाला देखील अजय-अतुल यांनी संगीत दिले होते. त्यानंतर रिंकू राजगुरू हिला मराठीत काही चित्रपट मिळाले. मात्र, तिला हवे तसे यश मिळाले नाही.

२९ एप्रिल २०१६ रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावले. या चित्रपटातले प्रत्येक गाणे आणि संवाद सुपरहिट ठरले. त्यासोबतच यातील कलाकार मंडळींनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या भूमिका साकारणाऱ्या नवोदित कलाकारांनी पहिल्याच चित्रपटातून त्यांच्यातील अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. आर्चीची भूमिका साकारणीरी रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये रिंकूने सैराट हिट ठरल्यानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर का नाकारल्या या मागचे कारण सांगितले आहे.

रिंकूने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, ‘सैराट चित्रपटाच्या यशानंतर मला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण अनेकांना सैराट सारखेच चित्रपट करायचे होते कारण सैराट हिट ठरला होता. सैराटमध्ये मी जी भूमिका साकारली त्याच प्रकारच्या भूमिकांच्या ऑफर मला येत होत्या. पण मला तशीच भूमिका परत साकारायची नव्हती. मला काही तरी वेगळे करायचे होते. त्यामुळे सैराटनंतर मी अनेक चित्रपटांना नकार दिला’ असे म्हटले.

पुढे तिला सैराट इतर भाषांमध्ये करण्याबाबत विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, ‘मी याविषयी काही बोलू शकत नाही. लोकांना करायचा असेल तर ते करु शकतात. कारण ते त्यांचे काम आहे. पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. कारण मराठी चित्रपटांचा रिमेक हिंदीमध्ये होत नाही. उलट हिंदी चित्रपटांचे रिमेक मराठीमध्ये केले जातात. हा पहिला चित्रपट आहे ज्याचा हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला.’

आता रिंकू राजगुरु हिंदी चित्रपटात देखील लवकरच दिसणार आहे. झी प्रॉडक्शनने आपला नवीन चित्रपट येणार असल्याचे सांगत याबाबत ट्रेलर नुकताच ऑनलाइन प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘200 हल्ला हो’ असे आहे आणि हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अमोल पालेकर, अभिनेता बरून सोबती आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्या भूमिका आहेत.

चित्रपटामध्ये रिंकू राजगुरू ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे. हा चित्रपट एका गंभीर समस्येवर आधारित आहे. या चित्रपटाचा व्हर्च्युअल ट्रेलर नुकताच एका कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला आहे .’200 हल्लाबोल हा’ चित्रपट वंचित, उपेक्षित आणि द’लित महिला व अ’त्याचा’राला वाचा फोडणारा चित्रपट आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *