‘चांगलं काम, प्रसिद्धी, पैसा, सगळं मिळालं पण ‘ही’ एक गोष्ट खूप मिस करतेय रिंकू राजगुरू, भावुक होत म्हणाली..

‘चांगलं काम, प्रसिद्धी, पैसा, सगळं मिळालं पण ‘ही’ एक गोष्ट खूप मिस करतेय रिंकू राजगुरू, भावुक होत म्हणाली..

मनोरंजन

मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक हिट ठरलेला चित्रपटात म्हणजे सैराट. सर्वाधिक कमाईच्या बाबतीतही सैराट पहिला मराठी चित्रपट आहे. कदाचितच याचा हा रेकॉर्ड दुसरा कोणता मराठी चित्रपट तोडू शकेल. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट आजही प्रेक्षकांच्या तेवढाच लक्षात आहे.

२०१६ ला सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आणि परशा म्हणजेच आकाश ठोसर लोकप्रिय झाले. अभिनय क्षेत्रात काम करायचे ध्यानीमनी नसतानाही हे दोघे सिनेइंडस्ट्रीत आले. या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिले.

आपल्या अभिनय आणि संवादाने प्रेक्षकांना अक्षरशः या दोघांनी वेड लावले. त्यांना पाहण्यासाठी लोक आजही गर्दी करताना दिसतात. सैराट चित्रपटानंतर रिंकू आणि आकाशने मागे वळून पाहिले नाही. रिंकू राजगुरूने सैराटनंतर काही मराठी सिनेमात काम केले. तसेच हिंदी वेबसीरिजमध्येही काम केले.

रिंकूने चांगली कामे केली. प्रसिद्धी आणि पैसा मिळाला पण आजही रिंकू राजगुरू एक गोष्ट खूप मिस करते आहे. रिंकू राजगुरू कोणती गोष्टी मिस करते आहे, हे जाणून घ्यायला उत्सुक असाल ना. नववी इयत्तेत असताना रिंकूने सैराट चित्रपटात काम केले. सैराट रिलीज झाला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. रिंकू राजगुरूची खूप लोकप्रियता वाढली.

त्यानंतर तिचे फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप वाढले. तिची झलक पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले. त्यामुळे तिला पाहण्यासाठी अक्षरशः झुंबड होऊ लागली. त्यामुळे दहावीत असताना सर्वजण कॉलेजमध्ये जाण्याचे आणि तिथे धमाल मस्ती करताचे स्वप्न पाहत असतात.

तसेच रिंकू राजगुरूलादेखील कॉलेजमध्ये जायचे होते आणि नवीन नवीन कपडे, लेक्चर अटेंड करणे, कॅम्पसमध्ये धमालमस्ती करायची होती. मात्र तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. याबद्दल रिंकू राजगुरूने सांगितले की, शाळेत असताना आम्ही खूप बोलायचो की कॉलेजला गेल्यावर आपण ही मज्जा करू.

त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मिस करते. रिंकू राजगुरू सध्या सेकंड इअरला आहे. तिचे अकलूजला कॉलेज आहे. मात्र सध्या ऑन लाइन लेक्चर असते पण ती अटेंड करत नाही. मैत्रिणींसो णीं बत फोनवर बोलून नोट्स काढते. घरच्या घरी अभ्यास करते. एक्सर्टनल करते त्यामुळे कॉलेजला कधीच गेले नाही, असे ती सांगते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *