सैराट’च्या ‘आर्ची’ची मोठी झेप, अभिनेत्री रिंकू राजगुरू दिसणार बॉलिवूडच्या ‘या’ आगामी चित्रपटात!

रिंकू राजगुरू अर्थातच आर्ची आता बॉलीवूड मध्ये देखील दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये ती आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणार आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या सैराट या चित्रपटाने रिंकू राजगुरु हिने मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालून दिला होता.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. हा चित्रपट मराठीमध्ये एवढा चालला की या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर हा चित्रपट हिंदी मध्ये देखील रिमेक करण्यात आला होता. हिंदी मध्ये धडक या नावाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.
या चित्रपटात जान्हवी कपूर आणि इशान खट्टर हे दोघे दिसले होते. हिंदीमध्ये हा चित्रपट अधिक कमाई करू शकला नाही. मात्र, या चित्रपटाची खूप मोठी चर्चा झाली होती. हिंदी मधील चित्रपटाला देखील अजय-अतुल यांनी संगीत दिले होते. त्यानंतर रिंकू राजगुरू हिला मराठीत काही चित्रपट मिळाले. मात्र, तिला हवे तसे यश मिळाले नाही.
२९ एप्रिल २०१६ रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावले. या चित्रपटातले प्रत्येक गाणे आणि संवाद सुपरहिट ठरले. त्यासोबतच यातील कलाकार मंडळींनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या भूमिका साकारणाऱ्या नवोदित कलाकारांनी पहिल्याच चित्रपटातून त्यांच्यातील अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. आर्चीची भूमिका साकारणीरी रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत असते. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आर्ची आणि परश्या या जोडीने सर्वांच्या हृदयावर राज्य केले. रिंकू राजगुरूने सिनेमाच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आता रिंकू राजगुरू आणखी एक मोठी झेप घेत आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू नेटफ्लिक्सच्या आगामी ‘अनकही कहानिया’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच तिच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या या चित्रपटामध्ये प्रेमाच्या तीन वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
नेटफ्लिक्सचा नवा चित्रपट
नेटफ्लिक्सच्या या चित्रपटामध्ये प्रेमाच्या तीन वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. यातील एका कथेत रिंकू राजगुरु झळकणार आहे. अश्विनी तिवारी, अभिषेक चौबे, साकेत चौधरी यांनी या चित्रपटातील कथांसाठी दिग्दर्शन केले आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू सोबतच या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, झोया हुसेन, कुणाल कपूर, पालोमी, देलझाद हिवले हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. रिंकू राजगुरू हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती शेअर केली आहे. रिंकू या पोस्टमध्ये लिहीते की, “या मोठ्या शहरात प्रेम मिळणं सोपी गोष्ट नाही. अश्याच प्रेमाची अनकही कहानिया लवकरच नेटफ्लिक्सवर 17 सप्टेंबरला येत आहे.”
‘200 हल्ला हो’मध्ये झळकणार मुख्य भूमिकेत!
ZEE5ने गुरुवारी आपला आगामी चित्रपट ‘200 – हल्ला हो’चा ट्रेलर रिलीज केला. 200 Halla Ho हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे, ज्याने संपूर्ण देशाला हा’दरवून सोडले. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, अभिनेता बरुण सोबती आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे. व्हर्च्युअल कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ‘200 हल्ला हो’ हा एक अतिशय गं’भीर स’मस्येवर भाष्य करणारा चित्रपट आहे. ही घटना कित्येक वर्षांपूर्वी घडली होती, जेव्हा 200 द’लित महि’लांनी एकत्रितपणे का’यदा आणि न्याय हातात घेतला होता. या चित्रपटात ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
कशी आहे रिंकूची भूमिका?
या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगताना रिंकू म्हणाली की, ‘ही एक अशी मुलगी आहे, जी स्वतः एका द’लित कुटुंबातून पुढे आली आहे. तिने वर्षानुवर्षे स्त्रि’यांवर होणारा अ’त्याचार पाहिला आहे. इतका अ’त्याचार स’हन करूनही या स्त्रीया गप्प का बसतात, असा प्रश्न तिला नेहमीच पडत असतो. आता ही मुलगी स्वतःच्या पा’यांवर उभी राहिली आहे. इतकंच नाही तर या स्त्रियांच्या आणि आपल्या हक्कासाठी जोरदार लढा देणार आहे, अशी लढाऊ आशा साकारताना मला देखील खूप छान वाटलं.’