‘हे’ आहेत जगातील ५ सर्वात श्रीमंत क्रिकेटर्स, कॅप्टन कूल आणि कोहलीची संपत्ती बघून व्हाल अवाक…

काही वर्षापूर्वी भारतामध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाली. इंग्रज भारतात आले. त्यांनी भारताच्या लोकांना चहा पिण्याची सवय लावली. याचबरोबर त्यांनी एक खेळ देखील भारताला दिला. हा खेळ म्हणजे क्रिकेट होता. आता हा खेळ भारतीयांचा जीव की प्राण झाला आहे.
क्रिकेट हा असा एकमेव खेळ आहे, तिथे जात, धर्म, पंथ काहीही पाहिल्या जात नाही. क्रिकेटमुळे सर्वजण एकत्र गुण्यागोविंदाने राहतात, असेही पाहायला मिळते आहे. जुन्या काळात अनेक असे दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत. मात्र, साधारण ज्यांचे वय आता पन्नासच्या आसपास आहे, असे सर्व लोक हे सुनील गावस्कर, कपिलदेव यांच्यासारख्या खेळाडूंना हे आवर्जून ओळखतात.
त्याखालोखाल सचिन तेंडुलकर, अजहरुद्दिन राहुल द्रवि ड, सौरव गांगुली, अजय जडेजा यासारखे खेळाडू देखील भारतीय संघामध्ये होऊन गेलेले आहेत. मात्र, सर्वार्थाने लक्षात राहणारा आजच्या पिढीतल्या खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर हा होय.सचिन तेंडुलकर याने सर्वार्थाने जागतिक स्तरावर भारताच्या क्रिकेट ची ओळख बदलून टाकली असेच म्हणावे लागेल.
त्याच्यासारखा आक्रमक फलंदाज भारताने आजवर अनेक विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. सचिन तेंडुलकरला मास्टर ब्लास्टर अशा पदव्या देखील देण्यात आलेल्या आहेत. सचिनने जाहिरात जगतातून पैसा कसा कमवावा, हे सर्व खेळाडूंना दाखवून दिले असेच म्हणावे लागेल. कारण सचिन याने सुरुवातीला जाहिरात केल्या होत्या.
त्यानंतर अनेक खेळाडू या क्षेत्रात उतरले. आता जाहिरात करणे म्हणजे एक व्यवसाय झाला आहे. क्रिकेट खेळण्यापेक्षा जास्त पैसे खेळाडूंना जाहिरातीचे मिळत असतात. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशाच काही क्रिकेटपटू बद्दल माहिती देणार आहोत की, ज्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून आणि जाहिरातीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत.
1) रोहित शर्मा- रोहित शर्मा हा अतिशय आक्रमक फलंदाज भारतीय क्रिकेट संघाला लाभलेला आहे. तो सध्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळत आहे. भारतीय संघात देखील त्याचा चांगलाच बोलबाला आहे. रोहित शर्मा याची एकूण संपत्ती ही 145 कोटी रुपये एवढी आहे.
2) ब्रायन लारा- ब्रायन लारा हा वेस्ट इंडीजचा आक्रमक असा फलंदाज होता. निवृत्तीनंतरही त्याच्या संपत्तीमध्ये काही पटींनी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. ब्रायन लारा याची एकूण संपत्ती ही 454 कोटी रुपये एवढी आहे.
3) रिकी पॉंटिंग- ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आहे. रिकी पॉंटिंग याने क्रिकेटच्या माध्यमातून आणि जाहिरातीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. आजच्या घडीला रिकी पॉंटिंग याची संपत्ती 492 कोटी रुपये एवढी आहे.
4)विराट कोहली- विराट कोहली हा भारताचा आक्रमक फलंदाज आहे. विराट कोहली याच्या नावावर अनेक विक्रम देखील नोंदविण्यात आलेले आहेत. विराट कोहली हा प्यूमा, ऑडी यासारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडची जाहिरात करत असतो. विराट कोहली याची अंदाजे संपत्ती ही 696 कोटी रुपये एवढी असल्याचे सांगण्यात येते.
5) महेंद्रसिंग धोनी- महेंद्रसिंह धोनी याने आपल्या एकट्याच्या जीवावर अनेक सामने हे जिंकून दिले आहेत. महेंद्रसिंग धोनी हा देखील जाहिरात क्षेत्रात खूप माहि र आहे. महेंद्रसिंग धोनी याने आजवर रीबोक, टीव्हीएस यासारख्या जाहिरातीमध्ये काम केले आहे. त्याने 840 कोटी रुपयांची संपत्ती जमवली आहे.
6) सचिन तेंडुलकर- सचिन तेंडुलकर याला निवृत्त होऊन बराच कालावधी लोटला आहे. असे असले तरी सचिन तेंडुलकर हा सर्व क्रिकेट पटू मध्ये आजही खूप श्रीमंत आहे. सचिन तेंडुलकर याची चालू वर्षांमध्ये संपत्ती ही ८७० कोटी रुपये एवढी असल्याचे सांगण्यात येते.