बाबो ! ‘या’ मराठी अभिनेत्रीने कुणालाच न सांगता समुद्रकिनारी गुपचूप उरकून घेतले लग्न, लग्नाचे फोटो viral झाल्यानंतर..

बाबो ! ‘या’ मराठी अभिनेत्रीने कुणालाच न सांगता समुद्रकिनारी गुपचूप उरकून घेतले लग्न, लग्नाचे फोटो viral झाल्यानंतर..

मनोरंजन 

झी मराठी वाहिनीवरील, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावले होते. या मालिकेतील सर्व पात्र चांगलेच लोकप्रिय ठरले होते. गावाकडील सर्वसाधारण आणि एका भोळ्या मुलीशी लग्न केलेला नवरा, शहरात दुसऱ्या मुली सोबत अफेअर करतो.

आपल्या पहिल्या पत्नीला घ’टस्फो’ट देण्याच्या विचारात असतो. अशा कथानकावर आधारित माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेचा चाहतावर्ग देखील खूप मोठा होता. राधिकावर होणारा अन्याय, अत्याचार बघून तो सर्व खरा आहे की काय, असे समजून अनेक महिलावर्ग भावुक देखील झाल्याचे बघायला मिळत होते.

याच मालिकेत न’कारात्मक पात्र साकारणारी शनाया देखील चांगलीच लोकप्रिय ठरली होती. शनायाच्या ग्लॅमरस लुक आणि भन्नाट अभिनयाने रसिकांची मने जिंकली होती. रसिका सुनीलने, हे शनयाचे पात्र साकारले होते. रसिका कायमच चर्चेत असते. रसिकाने पोस्टर गर्ल, गॅटमॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

‘तुम बिन मोहे’ या व्हिडिओ अल्बम मध्ये गायनासोबतच रसिकाने काम देखील केले होते. त्यावेळी रसिकाच्या संगीत कौशल्याबद्दल देखील सर्वांना माहिती मिळाली. त्यामुळे अभिनय, गायन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात रसिका अव्वल असल्याचे समोर आले. म्हणून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. सोशल मीडियावरती देखील ती चांगलीच सक्रिय असते. आता याच रसिकाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

काहीच दिवसांपूर्वी रसिकाने आपल्या बॉयफ्रेंडची ओळख सगळ्यांना करून दिली होती. आदित्य बिलागी सोबत ती 2018 मध्ये लॉस एंजलिसमध्ये भेटली होती. तिथे एका कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्या दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले आणि हळूहळू जवळीक वाढली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. आपल्या प्रेमाची ग्वाही रसिकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत दिली होती.

आता तिचे काही फोटोज सगळीकडे व्हायरल होत आहेत. या प्रेमी जोडप्याने गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर प्री-वेडिंग फोटोशूट पूर्ण केले आहे. एका रोमँटिक व्हिडिओ मध्ये शनाया आणि आदित्य लग्न गाठ बांधत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यांचे हेच फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

रसिका आदित्य सोबत सप्तपदी घेत असलेला हा व्हिडिओ बघून त्या दोघांनी गुपचूप लग्न तर उरकले नाही ना, असा देखील प्रश्न अनेकांनी केला आहे. नुकताच रसिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. सप्तपदी घेतानाचा हा फोटो शेअर करत ’18 ऑक्टोबर 2021 बीचवर रस्की-आदीच लग्न’ असं कॅप्शन या फोटोला दिले आहे.

18 ऑक्टोबर रोजी या दोघांनी लग्न केले, आणि 30 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनेक सेलिब्रिटीजनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर चाहत्यांनी लाईक कमेंटस वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य बिलागी हा मूळचा औरंगाबादचा आहे.

मात्र मागील नऊ वर्षांपासून तो लॉस एंजलिस मध्ये स्थायिक झाला. आदित्य हा एक इंजिनीअर असून उत्कृष्ट गायक देखील आहे. ट्वायकान्डोमध्ये देखील त्याने ब्लॅक बेल्ट मिळवलेला आहे. काही वर्षांपूर्वी रसिका जेव्ह शिक्षणासाठी परदेशात गेली होती त्यावेळी, तिची आणि आदित्यची भेट झाली होती आणि हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात रूपांतरित झाली.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *