‘राणादा’ला मिळाली ‘अंकिता’ची साथ, नवी जोडी, नवा “डाव” असेल नवीन चित्रपट..

सध्या मराठी मालिका ‘आई कुठं काय करते’ने सर्व टीआरपी रेकॉर्ड्स ब्रेक करुन आपला प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. या मालिकेचे कथानक,साधे असून देखील त्यात नवेपण आणि म्हणूनच, या मालिकेने अल्पावधीतच मोठा चाहता वर्ग कमवला आहे. बंगाली, तेलगू, मराठी आणि आता हिंदी अश्या जवळपास ७ भाषांमध्ये हीच मालिके वेगवेगळ्या नावाने सुरु आहे.
विशेष म्हणजे या सर्वच मालिकेचे ट्विस्ट आणि ट्रॅक सामान आहे मात्र तरीही, या मालिकांना प्रेक्षकांची भरगोस दाद मिळत आहे. त्यातल्या त्यात, मराठी मध्ये तर या मालिकेने नवीन विक्रमच केला आहे. या मलिकेमधील गडद पात्र असेल किंवा, मुख्य पात्र असेल सर्वच पात्रांना चाहत्यांची दाद मिळत आहे.
यामध्येच अंकिता म्हणजेच, अरुंधतीची सून हे पात्र रेखाटणारी राधा सागरच्या पात्राला देखील प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. तिचा अभिनय सर्वच प्रेक्षकांच्या मनाला भाळला आहे. यापूर्वी देखील राधा काही मराठी मालिकांमध्ये तर, काही हिंदी मालिका आणि हिंदी सिनेमामध्ये देखील काम केलं आहे.
मात्र अंकिता म्हणून तिला नवी ओळख मिळाली, आणि त्यानंतर पासून आता ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा रंगवतच आहे. हीच अंकिता आता पुन्हा चर्चेत आली आहे. कारण देखील तसेच आहे. तिने चक्क राणा दा म्हणजेच तुझ्यात जीव रंगला चा मुख्य अभिनेता हार्दिक जोशीसोबत एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमुळे आता ती आणि हार्दिक देखील चांगलेच चर्चेत आले आहेत. खास म्हणजे दोघांनी देखील हा फोटो शेअर केला आहे. तुझ्यात जीव रंगला मधून, मोठा चाहतावर्ग कमविला होता. मात्र, हा फोटो त्यांच्या येणाऱ्या नव्या चित्रपटातील आहे. अशी माहिती समोर आली आहे. राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी आणि राधा सागर ‘डाव’ या मराठी सिनेमामधून काम करणार आहेत.
या चित्रपटाचे कथानक प्रेमकथा असली तरीही खूपच हटके आहे असे मेकर्स सांगत आहेत. राधा आणि हार्दिकचा सोबतच फोटो बघून, त्यांची जोडी नक्कीच शोभून दिसणार असं दिसत आहे. तर, काही नेटकऱ्यांनी त्यावर ‘लवली कपल’ असं देखील कमेंट केलं आहे.
त्यामुळे या सिनेमामध्ये त्यांची जोडी कमाल करेल कि नाही हे बघणे, रोमांचकच ठरेल. दरम्यान, मेकर्स करुन या दोघांच्या सोबत अजून इतर नावांची माहिती आलेली नाही. मात्र लवकरचं, या सिनेमाचे शूटिंग सुरु होत आहे. तेव्हा राधा सागर आणि हार्दिक जोशी यांची केमिस्ट्री बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.