पुणे जिल्ह्यातील ‘या’ गावचे मूळ रहिवासी आहेत रजनीकांत, आजही डो’ळ्यात ते’ल घा’लून गावकरी बघताय सुपरस्टारची वाट..

पुणे जिल्ह्यातील ‘या’ गावचे मूळ रहिवासी आहेत रजनीकांत, आजही डो’ळ्यात ते’ल घा’लून गावकरी बघताय सुपरस्टारची वाट..

सुपरस्टार रजनीकांत यांना नुकताच सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. रजनीकांत हे सुपरस्टार असले तरी त्यांनी सर्वाधिक चित्रपट दक्षिण मध्येच केलेले आहेत. रजनीकांत यांचे चाहते संपूर्ण देशात तसेच विदेशात देखील आहेत. रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगलोर येथे झाला होता.

रजनीकांत यांनी दक्षिणेसोबतच हिंदी चित्रपट अधिक मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे. हिंदीमध्ये त्यांचा चालबाज हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील काम केलेले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी हम या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट देखील त्या वेळेस खूप चालला.

या चित्रपटात किमी काटकर हिची भूमिका देखील होती. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे चुम्मा चुम्मा हे गाणे प्रचंड गाजले होते. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये रजनीकांत यांच्या बद्दल माहिती देणार आहोत. रजनिकांत हे पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र, ही गोष्ट खरी आहे.

रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. रजनीकांत यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार हे आहे. त्यांचे हे गाव जेजुरी पासून अतिशय जवळच आहे. 2400 लोक या गावांमध्ये राहतात. या गावांमध्ये गायकवाड नावाचे ३० कुटुंब असल्याचे सांगण्यात येते.

रजनीकांत यांच्या आजोबा चे देखील या गावामध्ये घर होते. मात्र, काही वर्षांपूर्वी रजनीकांत यांचे आजोबा कर्नाटकामध्ये गेले होते. कर्नाटकातील बसवणा या गावात ते गेले होते. तिकडे ते रोजगार शोधण्यासाठी गेले होते, असे सांगण्यात येते. मात्र, त्यांना तिथे काही काम धंदा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी थेट बेंगलोर गाठले. त्यानंतर ते बेंगलोरला स्थायिक झाले.

रजनीकांत यांचा जन्म बेंगलोर येथे झाला. रजनीकांत यांच्या मूळ गावचे लोक आजही रजनीकांत यांच्या आजोबांची आठवण सांगत असतात. रजनीकांत यांची मावडी कडेपठार येथे काही एकर जमीन देखील असल्याचे सांगण्यात येते. तसेच त्यांचे घर देखील येथे आहे.

माजी सरपंच वैशाली खोमणे यांनी देखील याबाबत इच्छा व्यक्त करतांना सांगितले की, रजनीकांत यांनी आमच्या गावाला एकदा भेट द्यावी. मात्र, रजनीकांत यांनी अजूनही या गावाला कधीही भेट दिली नाही. 2017 मध्ये रजनीकांत हे राजकारणात प्रवेश करणार होते. त्यावेळी गावच्या लोकांनी यशवंत राय मंदिरामध्ये पूजाअर्चा देखील केली होती.

2010 मध्ये रजनीकांत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. त्यावेळी रजनीकांत म्हणाले होते की, मी एक मराठी माणूस आहे. त्यासोबत तमिळ आणि कर्नाटक चा देखील आहे. त्याहीपेक्षा म्हणजे मी एक भारतीय आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी त्यांचे म्हणणे सर्वांनाच भावले होते.

काही वर्षांपूर्वी त्यांच्या भवकितील लोकांनी रजनीकांत यांच्या आजोबाची बेंगलोर येथे जाऊन भेट घेतली होती, असे जुने लोक सांगतात. लोणावळा येथे काही वर्षापूर्वी रजनीकांत यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळेस गावच्या श्रीरंग गायकवाड यांनी रजनीकांत यांची भेट घेतली होती. तसेच त्यांना गावांमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते.

मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे रजनीकांत यांना या गावाला अजूनही भेट दिली नाही. मात्र, रजनीकांत यांनी आपल्या गावात एकदा भेट घेऊन गावाची पाहणी करावी, असे अनेकांना वाटते. रजनीकांत यांचे गावांमध्ये घर देखील आहे. मात्र, ते एकदाही इथे आले नाहीत. तसेच त्यांचे हे घर आता पडलेले आहे, असे देखील अनेक जण सांगत असतात.

दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव
रजनीकांत यांना भारतीय चित्रपट सृष्टी सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार चित्रपट सृष्टीमध्ये अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांना देण्यात येतो. त्यामुळे हा पुरस्कार आपल्याला मिळाला हे आपले भाग्य समजतो, असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *