फॅन्ड्रीतील जब्याची ‘शालू’ उर्फ राजेश्वरी खरात पडली प्रेमात? , व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

काही वर्षांपूर्वी नागराज मंजुळे नावाचा एक तरुण करिअर करण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीत आला होता. हा तरुण आता बॉलीवूडमधील देखील स्थिरावत आहे. नागराज मंजुळे आता अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड हा चित्रपट करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झालेले आहे.
मात्र, को’रो’ना म’हा’मा’रीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे टाकण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. दरम्यान, या चित्रपटात काम करणे आपले सौभाग्य असल्याचे अमिताभ बच्चन यांनी देखील सांगितले होते. या चित्रपटात कोण कोण कलाकार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नागराज मंजुळे यांनी सुरुवातीला पि’स्तुल्या या लघुपटाची निर्मिती केली होती. हा लघुपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्यांना ग्रामीण भागात असलेला चित्रपट करायचा होता. मात्र, यासाठी त्यांना कलाकार मिळत नव्हता. या चित्रपटाचे नाव फॅन्ड्री असे होते. या चित्रपटांमध्ये त्यांना एक असा कलाकार घ्यायचा होता की, जो सहजतेने अभिनय करू शकत होता.
त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावातील जब्या याची निवड केली. हा अभिनेता म्हणजे सोमनाथ अवघडे हा होय. सोमनाथ अवघडे काही वर्षांपूर्वी बारावी पास झाल्याचे सांगण्यात येते. अतिशय निरागस असा त्याचा या चित्रपटांमध्ये लुक होता. त्यामुळे तो सगळ्यांना आवडला होता. त्याच्या वडिलांच्या भूमिकेत किशोर कदम यांनी भूमिका साकारली होती.
त्यांनी देखील आपल्या अभिनयाने चार चांद लावले होते. या चित्रपटामध्ये जब्याची प्रियसी दाखवण्यात आली होती ती म्हणजे शालू. तिचे खरे नाव राजेश्वरी खरात असे आहे. या चित्रपटात तिने एकदाही संवाद साधला नव्हता. संवाद न करता अभिनय करणे काय असतो, हे तिने दाखवून दिले होते. त्यानंतर ती प्रचंड गाजली होती.
फॅन्ड्री या चित्रपटात शालूच्या भूमिकेतून अभिनेत्री राजेश्वरी खरात नावारुपाला आली. तिने साकारलेली शालूची भूमिका रसिकांना चांगलीच भावली होती. शालू म्हणजेच राजेश्वरी खरात खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. सध्या ती तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. तिचे फॅन फॉलोव्हिंगदेखील जास्त आहे.
त्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. दरम्यान तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यात ती प्रेमात पडल्याचे सांगताना दिसते आहे. राजेश्वरी खरात हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती डान्स स्टेप करताना दिसते आहे. या व्हिडीओत राजश्रीने व्हाइट रंगाचा शॉर्ट स्लिव्हलेज ड्रेस परिधान केला आहे.
या व्हिडीओत ती चोरी चोरी सपनों में आता है कोई या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. हा व्हिडीओ शेअर करून तिने लिहिले की, मुझे प्यार हो गया. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप भावतो आहे. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. राजेश्वरी खरातने नागराज मंजुळेच्या फॅन्ड्री या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.