प्रसिद्ध व्हिलन राहुल देव वयाने १४ वर्षे लहान असणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्रीला करतोय डेट, आपल्या नात्याबद्दल खुलासा करत म्हणाला…

मनोरंजन
बॉलीवूडमध्ये पदार्पण करणं सर्वसामान्य मुलींसाठी चांगलच कठीण असतं. सुंदर चेहरा आणि आकर्षक बांधा असताना देखील,अनेक मुलींचं अभिनेत्री बनायचं स्वप्न अपूर्णच राहत. मात्र कधी कधी ज्यांनी विचार देखील केलेला नसतो, त्यांना संधी मिळते आणि त्या अभिनेत्री बनून प्रसिद्ध देखील होतात.
म्हणून तर या क्षेत्रात नशिबाची साथ असणं खूप महत्वाचं आहे असं म्हणलं जात. प्रीती झिंटा, जिनेलिया डिसुझा-देशमुख या अभिनेत्रींच्या बाबतीत देखील अगदी असच काही झालं होत. एका सध्या पर्क चॉकोलेटच्या जाहिरातीमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि नंतर त्यांनी अभिनेत्री बनून प्रचंड लोकप्रियता मिळवली.
असंच काही झालं होत, बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, मराठमोळी मुग्धा गोडसे हिच्याबद्दल. आपल्या कॉलेजच्या एका कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला होता, आणि त्या कार्यक्रमाचे जज मधुर भांडारकर होते. त्यांनी तिथे मुग्धाला पाहिले आणि तिच्यामध्ये अभिनेत्री होण्याचे सर्व गुण आहेत हे ओळखून आपल्या सिनेमामध्ये काम करण्यासाठी संधी दिली.
आपल्या पहिल्याच फॅशन सिनेमामध्ये मुग्धा प्रियांका आणि कंगना सारख्या अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली. या सिनेमामध्ये तिच्या कामाची देखील चांगलीच चर्चा झाली होती. आपल्या दमदार अभिनय आणि बो’ल्ड अंदाजाने तिने लवकरच आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आणि त्यानंतर तिने कधीच माघे वळून पहिले नाही.
मुग्धा नेहमीच आपल्या प्रोफेशनल लाईफ साठी आणि कामासाठी चर्चेत असते. मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ती कधीच फारसं काही बोलत नाही. तिचे इतर कोणत्या अभिनेत्यासोबत कधीच नाव देखील जोडण्यात नाही आले. कारण एका लग्नामध्ये तिची भेट राहुल देव सोबत झाली होती, आणि ती तिथेच त्याच्या प्रेमात पडली.
बॉलीवूड आणि साऊथ मधील सर्वात मोठा व्हिलन म्हणून राहुल देवची ओळख आहे. त्याने अनेक बॉलीवूड आणि साऊथच्या सिनेमामध्ये काम केले आहे. मात्र, त्याने नेहमीच व्हिलनचे पात्र रेखाटले आणि सर्वात लाडका व्हिलन बनला. साऊथमध्ये त्याचा भलामोठा चाहतावर्ग आहे. मुग्धा आणि राहुलची भेट झाली तेव्हा तो विवाहित होता आणि त्याला एक मुलगा देखील होता.
शिवाय राहुल तिच्यापेक्षा तब्ब्ल १४ वर्षांनी मोठा आहे म्हणून त्यावेळी मुग्धाने एक चांगला मित्र म्हणूनच त्याच्यासोबत आपले नाते ठेवले. मात्र, राहुलच्या पहिल्या पत्नीला कॅ’न्सर झालेला होता आणि त्यामध्येच तिचा मृ’त्यू झाला. अनेक वर्ष मैत्रीचे नाते असणाऱ्या मुग्धाने राहुलला पुन्हा उभं राहण्यास ठाम विश्वास दिला. हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात रूपांतरित झाली.
मात्र तरीही कधीच त्यांनी उघडपणे आपल्या नात्याबद्दल बोलायचे टाळले. २०१५ मध्ये सोनी टीव्हीच्या पावर कपल या रियालिटी शोसाठी त्या दोघांना विचारण्यात आले आणि याचवेळी प्रथम त्यांनी उघडपणे आपले नाते सर्वांसमोर मान्य केले. आपल्या प्रेमाची माहिती दिली. या शोनंतर लगेच राहुल देवला बिग बॉस १० ची ऑफर आली आणि त्याने मान्य देखील केली.
सतत सोबत राहणाऱ्या, राहुल आणि मुग्धा यांनी पहिल्यांदा या शोमुळे दूर राहण्याचा अनुभव घेतला आणि याच काळात त्यांना एकमेकांबद्दलच्या खऱ्या प्रेमाची जाणीव झाली. त्यानंतर लवकरच ते दोघे लग्न करणार असल्याचं सांगितलं जात होत. सध्या ते दोघेही सोबतच राहतात. मुग्धा आणि राहुल यादोघांकडे पहिले की प्रेमात ‘एज ईज जस्ट अ नंबर’ असं का म्हणतात हे लक्षात येत.