‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका संपल्यामुळे राधिका म्हणजेच अनिता दाते करत आहे ‘हे’ काम…

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका संपल्यामुळे राधिका म्हणजेच अनिता दाते करत आहे ‘हे’ काम…

कोरोना महामारीचा उद्रेक सध्या राज्यभरात प्रचंड वाढला आहे. असे असले तरी अनेक मालिकांमधून कोरोणा बाबत प्रबोधन करण्यात येत आहे. काही मालिकांमध्ये मास्क घालून देखील सर्व कलाकार वावरत असल्याचे दिसत आहेत. गेल्या काही वर्षात छोट्या पडद्यावर अशा काही मालिका आल्या की या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले.

यातील काही मालिकांचे तर कौतुक साता-समुद्रापार देखील झाले. यामध्ये श्रीयुत गंगाधर टिपरे, होणार मी सुन या घरची, उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट यासारख्या मालिका यांचा समावेश होता. या मालिकेनंतर इतर मालिका देखील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन फार मोठ्या प्रमाणात करत होत्या. यामध्ये काही वर्षांपुर्वी सुरू झालेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका देखील प्रचंड गाजली होती.

ही मालिका जवळपास एक वर्ष टीव्हीवर सुरू होती. या मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. मात्र, सरते शेवटी ही मालिका खूप कंटाळवाणे होत असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. काही महिन्यापूर्वी या मालिकेचा शेवट हा करण्यात आलेला आहे. या मालिकेमध्ये अभिजित खांडकेकर याने गुरुची भूमिका साकारली होती, तर त्याच्या पत्नीची भूमिका अनिता दाते हिने साकारली होती.

यात तिने राधिका हे पात्र अतिशय चांगल्या पद्धतीने रंगवले होते. गुरुचे मालिकेत अनेक प्रेमप्रकरण दाखवलेले आहे. त्यामध्ये शनया हे पात्र देखील अतिशय चांगले गाजले होते. या पात्राला अभिनेत्रींनी चांगला न्याय दिला होता. वैदर्भीय संस्कृती असलेले कुटुंब यामध्ये दाखवण्यात आलेले होते. तर त्यांचा मुलगा हा अतिशय लाडका असतो.

त्याचे बाहेर प्रेमप्रकरण असते. मात्र, अनिता ही अतिशय नेटाने आपला संसार पुढे नेते आणि सडेतोड उत्तर यामध्ये देते, असे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर ती एका कंपनीची मालकिन देखील बनते, असे मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे. ही मालिका नुकतीच संपली आहे, त्यामुळे आता राधिका नेमकी काय करत आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना अनेक दिवसापासून पडलेला आहे, तर आम्ही आपल्याला या लेखांमध्ये राधिका बद्दलच माहिती देणार आहोत.

राधिका म्हणजे अनिता दाते ही आपल्या पतीसोबत राहते.तिच्या पतीचे नाव चिन्मय असे आहे. राधिकाने सांगितले की, मी आणि चिन्मय दोघेच घरात असतो. कामाच्या व्यापामुळे आम्हाला दोघांना बोलायला वेळ भेटत नाही. मात्र, आता मालिका संपलेली आहे. त्यामुळे माझ्याकडे थोडा वेळ होता. त्यामुळे आम्ही बाहेर फिरण्यासाठी निघालो आहोत.

आमच्या आवडीनिवडी या अतिशय वेगळ्या असल्याचे देखील तिने सांगितले आहे आणि त्यातही पती चिन्मय सोबत तसेच अभिनेत्री पल्लवी पाटील आणि स्नेहा माजगावकर यांच्यासोबत कोकणात फिरायला गेलेली आहे. सध्या ती सावंतवाडी येथे फिरायला गेलेली आहे, असे तिने सांगितले आहे. दोन दिवस समुद्रकिनारा, तीन दिवस जंगलात, आम्ही फिरलो, असे देखील ती म्हणाली.

माझा पती आणि मी आमच्या आवडीनिवडी अतिशय वेगळ्या आहेत. मात्र, तरीदेखील आमचे खूप चांगले जमते, असेही तिने म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसापासून आमचा फिरायला जाण्याचा प्लॅन होता. मात्र, हा योग येत येत नव्हता. पतीने आता ठरून आमचा फिरण्याचा प्लॅन केला आहे, म्हणून आम्ही पाच दिवस मस्तपैकी जंगलामध्ये आम्ही फिरलो.

मला पक्षांची अधिक ओळख नाही. मात्र, कबूतर, कोकिळा किंवा इतर पक्षाचे मी आवाज ओळखू शकते. आणि पक्षांना ओळखू देखील शकते. मात्र, माझा पती चिन्मय पक्षीप्रेमी आहे, तो जंगलामध्ये अनेक गोष्टी पाहू शकतो. त्याचा आनंद घेऊ शकतो. तसेच अनेक पक्षांना ओळख देखील शकतो, असे ती म्हणाली. या पाच दिवसांमध्ये आम्ही खूप एन्जॉयमेंट केली, असेही ती म्हणाली.

आम्ही वानोशी फॉरेस्ट मध्ये फिरलो. तिथे आम्हाला प्रवीण देसाई यांनी खूप मदत केली. प्रविण देखील आमचा मित्र झालेला आहे. तसेच विशाल देखील आमचा मित्र झाला आहे, असे ती म्हणाली. भविष्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा फिरायला इकडे येऊ, असे ती म्हणाली. या वेळी आम्ही माशावर ताव मारला. मला मासे खूप आवडतात आणि आम्ही मासे भरपूर खाल्ले, असेही ती म्हणाली. माझ्याकडे आगामी काही प्रोजेक्ट आहेत आणि लवकरच याबाबत मी आपल्याला माहिती देईल, असेही तिने या वेळी बोलताना सांगितले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.