‘आई कुठे काय करते’मधील अंकिता झळकलीय ‘या’ हिंदी सिनेमात, पहा रियल लाईफमध्ये दिसते अधिकच ग्लॅमरस आणि हॉट..

आता सध्याच्या काळात, बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीमधे फार असे अंतर राहिले नाहीये. सुरुवातीपासूनच बॉलीवूड मध्ये कित्येक, उत्कृष्ट अश्या मराठी कलाकारांनी काम केलं आहे. आता देखील बऱ्याच हिंदी म्हणजेच बॉलीवूड च्या सिनेमांमध्ये आपण मराठी कलाकारांना बघतो.
सिद्धेश जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, सुचित्रा बांदेकर, विनीत शर्मा,विकास कदम, आश्विनी कळसेकर अश्या कित्येक मराठी कलाकारांनी बॉलीवूड मधील अनेक सिनेमांमध्ये काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीच्या काळात काही मराठी कलाकार,बॉलीवूड मधील सिनेमांमध्ये अनेक वेळा छोटाले पात्र निभावतात मात्र आपल्याला त्यांची ओळख देखील पटत नाही.
जसे कि, मुन्नाभाई एम बी बी एस मध्ये छोट्याशा भूमिकेत एका कॉलेज विद्यार्थिनीच्या भूमिकेत असणारी प्रिया बापट आज मराठी सिनेसृष्टीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्याचबरोबर वास्तव सिनेमामध्ये, संजय दत्तच्या जिवलग मित्राची भूमिका साकारलेला संजय नार्वेकर आज मराठी चित्रपटसृष्टीमधील एक मोठे नाव आहे.
असेच अनेक कलाकार बॉलीवूड मध्ये छोटीशी भूमिका निभावतात मात्र, पुढे तेच कोणत्या तरी प्रमुख भूमिकेद्वारे लोकप्रियता प्राप्त करतात. अगदी तसेच काही झाले आहे, मराठी अभिनेत्री राधा सागर बद्दल.
‘आई कुठे काय करते’ या अतिलोकप्रिय मालिकेमध्ये, आईची नव्याने बनलेली सून म्हणजेच अंकिता हे पात्र सध्या राधा सागर रेखाटत आहे. अंकिता या भूमिकेमध्ये, राधाला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. राधाने यापूर्वी, अनेक मालिकांमध्ये आणि बऱ्याच बॉलिवूडच्या सिनेमामध्ये काम केले आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनलेला सिनेमा ‘मलाल’ मध्ये ती झळकली होती. त्याचबरोबर हिंदी आणि मराठी मध्ये बनलेला, स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित सिनेमा ‘ठाकरे’ मध्ये देखील राधाने काम केले होते.
‘नाती खेळ’या मराठी चित्रपटासाठी राधाने पुरस्कार देखील पटकवला आहे.
राधा आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वर चांगलीच ऍक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच ती, स्वतःचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो टाकत असते. नुकताच काही दिवसांपूर्वी तिने आपला ‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील एक फोटो देखील शेअर केला आहे.
राधा एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. आपल्या फिटनेसच्या बाबतीत ती खास करुन जागरूक असते.आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरुन, ती बऱ्याच वेळा फिटनेसचे महत्व सांगत आपल्या चाहत्यांना त्याबद्दल जागरूक करत असते. कथ्थक या नृत्य प्रकारामध्ये तिने प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे ती बऱ्याच वेळा आपल्या नृत्याच्या छोट्याला व्हिडियो देखील शेअर करत असते.
त्याचबरोबर राधाला स्वयंपाकाची देखील आवड आहे. आपण बनवलेल्या नवीन पदार्थाचे फोटो ती नेहमीच शेअर करत असलेली दिसते. मालिकेमध्ये, एका डॉ’क्टरची भूमिका साकारणारी अंकिता अगदी लाडात वाढलेली असल्यामुळे तिला स्वयंपाकाची वगैरे आवड नाहीये. मात्र खऱ्या आयुष्यात, तिला स्वयंपाकाची चांगली आवड आहे.