‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेला नवीन वळण, होणार ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री..

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेला नवीन वळण, होणार ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री..

मालिका म्हटलं की, वेगवेगळे रोमांचक वळण हे येणारच. प्रत्येक मालिकेमध्ये जेव्हा प्रेक्षकांना वाटायला लागते की,आता सर्व ठीक होऊ मालिका संपेल नेमकं तेव्हाच मेकर्स कोणतातरी एक ट्विस्ट मालिकेत टाकतात आणि मग ती मालिका अजूनच रोमांचक वळण घेते.

जसे की, रंग माझा वेगळा या मालिकेत जेव्हा डिलीवरी च्या आधी दीपा आपल्या सासूच्या बोलण्यावरून कार्तिक सोबत राहायला लागते, तेव्हा आता सगळं ठीक होईल असं प्रेक्षकांना वाटत होते. मात्र त्याही मालिकेने एक वेगळेच वळण घेतले आणि आता पुढे काय होणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. अशा अनेक मालिका आहेत या अनपेक्षित वळण घेतात.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सध्या टीआरपीवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेत स्वीटूचं ओमसोबत लग्न न होता मोहितसोबत झालेलं लग्न पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसलाय. लग्नाच्या दिवशी ओम नक्की कुठे होता, हे अद्याप स्वीटूला कळलं नाही आणि ओम सुद्धा स्वीटूला हे सत्य सांगत नाही.

स्वीटू आणि ओम एकत्र येताना पाहण्यासाठी आतुरलेल्या प्रेक्षकांची मोठी निराशा झाली. मात्र आता या मालिकेत आणखी नवा ट्विस्ट आलाय. प्रेक्षकांची निराशा दूर करण्यासाठी एका अभिनेत्री एन्ट्रीची होणारेय. ही अभिनेत्री स्वीटू आणि ओमला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणारेय.

स्वीटूला मोहीतसोबतचं लग्न मान्य नसलं तरी ती घरच्यांसाठी तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव आणत खूश असल्याचं दाखवते. पण स्वीटू आणि ओम एकत्र येऊन त्यांचं लग्न व्हावं, अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी एका अभिनेत्रीची धमाकेदार एन्ट्री दाखवण्यात येणार आहे. ही अभिनेत्री ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्याची पत्नी आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अविनाशची भूमिका साकारणाऱ्या शांतनू मोघेची पत्नी प्रिया मराठे ही एन्ट्री करणारेय. अभिनेत्री प्रिया मराठे या मालिकेत स्वीट आणि ओमला एकत्र आणण्यासाठी धडपड करताना दिसून येणार आहे. त्यामूळे ओम आणि स्वीटू यांना परत एकत्र करण्यासाठी प्रिया मराठे यशस्वी होते का? ते येत्या काही दिवसांत कळणार आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना प्रिया म्हणाली, “येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत अशा विलक्षण वळणावर माझ्या व्यक्तिरेखेची एन्ट्री होणार आहे याचा मला खूप आनंद आहे. ही मालिका खूप जास्त लोकप्रिय आहे आणि या मालिकेत प्रेक्षकांचे लाडके ओम आणि स्वीटू यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यात माझ्या व्यक्तिरेखेचा खूप मोठा हात असणार आहे.

त्यामुळे मी जास्त उत्सुक आहे. मी एका सकारात्मक पण तितकीच ठसकेबाज भूमिका निभावतेय. त्यामुळे ती प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडेल याची मला खात्री आहे.” अभिनेत्री प्रिया मराठेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ‘या सुखांनो या’ मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एन्ट्री केलीय. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’ मालिकेत तिने काम केलंय.

‘तू तिथे मी’ मालिकेत तिने साकारलेली भूमिका खूपच गाजली होती. याशिवाय ‘कसम से’ या मालिकेतून तिने हिंदी मालिकेत एन्ट्री केली. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील भूमिकेमुळे तर ती सर्वांची लाडकी बनली होती. ‘बडे अच्छे लगते है’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘साथ निभाना साथिया’ अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलंय.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.