ज्याला आपण फक्त एक अभिनेता समजत होतो, तो आहे प्रसिद्ध व्हिलन ‘प्रेम चोपडा’चा जावई, फोटो बघून व्हाल चकित..

ज्याला आपण फक्त एक अभिनेता समजत होतो, तो आहे प्रसिद्ध व्हिलन ‘प्रेम चोपडा’चा जावई, फोटो बघून व्हाल चकित..

मनोरंजन

बॉलीवूडमध्ये, हिरो म्हणजेच नायक जितके लोकप्रिय ठरतात. तेवढेच लोकप्रिय, व्हिलन म्हणजेच खलनायक देखील ठरतात. अमरीश पुरी, अमजद खान,डॅनी, आशुतोष राणा, हे काही कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या करियरमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आणि त्यातूनच त्यांना ओळख आणि लोकप्रियता मिळाली.

या कलाकारांनी साकारलेल्या, खलनायकाच्या भूमिका आजही अनेक प्रेक्षकांच्या ध्यानात आहेत. आजही, सर्वात ख’तरनाक खलनायक म्हणून बॉलीवूडमध्ये याच खलनायकाची ओळख आहे. यामध्ये अजून एक नाव आहे, ज्यांच्यशिवाय ही यादी अपूर्ण ठरेल. ‘प्रेम चोप्रा नाम है मेरा,’ या डायलॉगने आजही अनेक चाहत्यांच्या मनात आपली जागा, बनवून असणारे प्रेम चोप्रा.

बॉबी, कटी पतंग, दो रास्ते, दोस्ताना, तिसरी मंजिल, नागीण, मर्द यासारख्या अनेक सुपरहिट बॉलीवूड सिनेमामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. आपल्या हटके अंदाजाने त्यांनी, स्वतःची खास ओळख बनवली. आजही त्याचे अनेक चाहते आहेत. सध्या प्रेम चोप्रा अभिनयापासून दूर असले तरीही त्यांचे जावई मात्र, बॉलीवूडमध्ये आपले नाव गाजवत आहेत.

प्रेम चोप्रा यांना पुनिता, रतिका आणि प्रेरणा अशा तीन मुली आहेत. पुनिता यांचा विवाह अभिनेता विकास भल्लासोबत झाले आहे, तर रतिकाचा पती राहुल नंदा हा एक पब्लिसिटी डिझायनर आहे. तिसरी मुलगी प्रेरणाने, बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशी याच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. शर्मन जोशीला, नव्याने ओळख करुन देण्याची गरज नाही.

सुरुवातीपासूनच, शर्मन जोशीने आपली वेगळी ओळख बॉलीवूडमध्ये बनवून कायम ठेवली आहे. सुरुवातीच्या काळात, त्याने काही सिनेमामध्ये छोटे-मोठे रोल्स केले होते. मात्र त्याचा स्टाईल सिनेमा त्याच्यासाठी लकी ठरला. याच सिनेमाने त्याला नवीन ओळख मिळवून दिली. मात्र त्यानंतर त्याचे सिनेमा जास्त हिट ठरले नाही.

२००६ मध्ये गोलमाल आणि रंग दे बसंती या दोन सुपरहिट सिनेमामध्ये त्याने काम केले होते. त्यानंतर, थ्री इडियट्स या इतिहास बनवलेल्या सिनेमामध्ये त्याने, राजुची भूमिका साकारली होती. शर्मन जोशीने नेहमीच एक उत्तम अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. म्हणून आज त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर, तो एक उत्तम फॅमिली मॅन देखील आहे.

शर्मन जोशीची कॉलेजमध्येच प्रेरणासोबत पहिल्यांदा भेट झाली होती. पहिल्याच भेटीत, तो तिच्या प्रेमात पडला होता. मात्र, त्याने लगेच आपल्या भावना प्रेरणासमोर व्यक्त नाही केल्या. पहिले तिच्यासोबत मैत्री केली. आणि हळूहळू आपलं प्रेम प्रेरणापुढं व्यक्त केलं. त्यानंतर काही काळ, त्यादोघांनी एकमेकांना डेट केलं.

आपले प्रेम ओळखून दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबीयांना देखील त्यांच्या या निर्णयाने आनंद झाला, आणि १५ जून २०००मध्ये त्यांच लग्न झालं. त्यादोघांना जुळी मुलं आहेत. शर्मन जोशी कायमच आपल्या, दमदार अभिनयासाठी ओळखला जातो.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *