मराठी चित्रपटसृष्टी हादरली ! अभिनेते प्रवीण तरडेंची अतिभावूक पोस्ट, एकापेक्षा एक गाणी लिहून माझा दादा गेला, कायमचा….

सध्या मृ’त्यूने थै’मान मांडले आहे असे भासत आहे. एका पाठोपाठ एक अश्या दुः’खद बातम्याचे सत्र सुरु आहे. कधी बॉलिवूड मधून तर कधी टेलिव्हिजन इंडस्ट्री मधून, कधी मराठी सिनेसृष्टी मधून अत्यं’त दुःखद आणि मोठाल्या व दिग्ग्ज कलाकारांच्या मृ’त्यूच्या वार्ता वारंवार समोर येत आहेत.
ह्या दुःखद वातावरणात, सगळीकडेच शो’कक’ळा पसरली आहे आणि कलाविश्वावरुन हे दुः’खाचे सावट हटतच नाही. आता, पुन्हा अजून एक अगदी दुःखद बातमी समोर आली आहे. अजून एका मोठ्या आणि लोकप्रिय कलाकाराच्या मृ’त्यूची बातमी समोर आली आहे. ह्या कलाकाराच्या मृ’त्यूच्या बातमीने संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टी हा’दरली असून, अनेक मराठी कलाकार अत्यंत भावुक झाले आहेत.
संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी हि अत्यंत दुःखद घटना असून, त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ने एक दिग्ग्ज आणि उत्तम कलाकार गमावला आहे. अभिनेते प्रवीण तरडे ह्यांनी, ‘माझा प्रणित दादा गेला…सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभु हरपला’ अशी अत्यंत भावुक भावना व्यक्त केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील अगदी प्रसिद्ध गीतकार प्रणीत कुलकर्णी ह्यांचं नि’ध’न झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे ह्यांनी याबद्दल सो’शल मी’डियावर माहिती दिली. प्रणीत कुलकर्णी ह्यांनी अनेक चित्रपटांमध्ये प्रवीण तरडे यांच्यासोबत काम केलं आहे.
प्रवीण तरडे यांनी आपल्या सो’शल मी’डियाच्या अधिकृत अकाऊंटन वरुन एक खूप भावुक पोस्ट लिहिली आहे. मराठी चित्रपट जसे की, देऊळबंदसोबत लेखन-दिग्दर्शन आणि देऊळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीररावचे गीतकार इ मध्ये त्यांनी काम करुवून चाहत्यांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली आहे.
प्रवीण तरडे ह्यांची अत्यंत भावूक पोस्ट
“माझा प्रणित दादा गेला. सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभु हरपला. गीतकार, लेखक, दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही .. नंतर सविस्तर लिहिलच ..देऊळबंदला माझ्यासोबत लेखन दिग्दर्शन आणि देऊळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीररावचा गीतकार … अ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळा आभाळा, गुरूचरीत्राचे कर पारायण, हंबीर तु खंबीर तु अशी एका पेक्षा एक गाणी लिहून प्रणीतदादा गेला .. कायमचा… ,” अशी अत्यंत भावूक पोस्ट अभिनेते प्रवीण तरडे यांनी केली आहे.
प्रविण तरडे व प्रणित कुलकर्णी हे कित्येक वर्षांपासूनचे मित्र
गीतकार व म्युझिक अल्बमचा निर्माता म्हणून प्रणित ह्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम केले आहे. प्रवीण तरडे आणि प्रणित कुलकर्णी हे दोघे अनेक वर्षापासून असलेले मित्र. सर्जनशील निर्मिती करण्याच्या वेडानं त्या झपाटलेल्या दोघांनी देऊळबंद हा लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शित केला आहेत. सिनेमाचं लेखन देखील त्या दोघांनी मिळूनच केलं होते.
मुळशी पॅटर्न, हंबीरराव, देऊळ बंद यांसारख्या अनेक चित्रपटसाठी कुलकर्णी ह्यांनी गीत लेखन केलं होतं. मुळशी पॅटर्न चित्रपटामधील ‘आरारारा खतरनाक’ हे गाणं त्यांनीच लिहिलं होतंं. या गाण्याने रसिकांच्या मनावर अक्षरश: भूरळ पाडली होती. अनेक चित्रपटांसह टीव्हीवर बहुतांश मालिकांसाठी सुद्धा त्यांनी अनेक गाणी लिहिली होती.
शिवबा ते शिवराय या दृकश्राव्य कार्यक्रमाचे ते लेखक, गीतकार, दिग्दर्शक होते. ‘जीवन यांना कळले हो’ या प्रसिद्ध स्टेज रियालिटी शोचे लेखन, दिग्दर्शनही त्यांनी केलं. “सुरक्षित अंतर ठेवा” या नाटकाचे ते लेखक आणि दिग्दर्शक होते.
प्रणित कुलकर्णी ह्यांनी फिरोदिया करंडक स्पर्धा चांगलीच गाजवली होती. त्यानंतर त्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. यानंतर त्यांनी ऑल द बेस्ट या टीव्ही के मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन देखील केले होते. सगळ्यात खास म्हणजे सध्या स्टार प्रवाहवर लोकप्रिय ठरत असलेल्या ‘लक्ष्य’ या मालिकेचेही ते लेखक होते.
अ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळा आभाळा, गुरूचरित्राचे कर पारायण, हंबीर तु खंबीर तु अशा एका पेक्षा एक गाणी लिहून प्रणीतदादा गेला. कायमचा..गीतकार, लेखक, दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही…
नंतर सविस्तर नक्कीच लिहिनच..असे प्रणित तरडे ह्यांनी लिहले आहे.. गीतकार प्रणीत कुलकर्णी ह्यांचे ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ या गाण्याने सोशल मीडियासह अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला. आज देखील अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणं आवर्जुन वाजवलं जातं