पूजा सावंतपेक्षाही सुंदर आणि ग्लॅमरस दिसते तिची बहीण, पहा तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो…

मनोरंजन
कलाविश्व एक असं क्षेत्र आहे, ज्यामध्ये काम करण्याचे स्वप्न कमीत कमी एकदा तरी, जवळपास प्रत्येक मुलगी बघतेच. एक उत्तम अभिनेत्री बनावं आणि आपला देखील मोठा चाहतावर्ग असावा. त्याच अभिनेत्रींप्रमाणे, सुंदर डिझायनर कपडे घालावे. मीडियाने आपल्या माघे-पुढे फिरावं असं अनेक मुलींना वाटत.
पण अशी प्रसिद्धी आणि अभिनेत्री होणे, हे सर्वांच्याच वाट्याला येत नाही. काहीच मुलीचे हे स्वप्न पूर्ण होते. कधी कधी अचानकच एखाद्या मुलीसमोर अशी ऑफर येते आणि तीच नशीब पालटत, असं अनेक अभिनेत्रींच्या बाबतीत आपण पहिले आहे. जिनेलिया डिसुझा-देशमुख, प्रीती झिंटा यासारख्या अभिनेत्रींच्या बाबतीत असच काही घडलं होत.
केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर, मराठी सिनेसृष्टीमधे देखील असं झाल्याचं आपण पाहिलं आहे. अभिनेता-दिग्दर्शक सचिन पाटील, २००८ मध्ये ‘मटा श्रावण क्वीन’ ही स्पर्धा जज करण्यासाठी गेला होता. त्यावर्षीची, स्पर्धा पूजा सावंतने जिंकली आणि ती सचिन पाटील यांच्या नजरेत आली. त्यावेळी, आपल्या ‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमाच्या तैयारीत असणाऱ्या सचिनला, त्याच्या सिनेमासाठी एक सुंदर अभिनेत्री हवी होती.
पूजा सावंतला बघून त्याची शोधमोहीम संपली आणि त्याने पूजाला सिनेमामध्ये काम करण्याची ऑफर दिली. पूजा सावंतने देखील लगेच ती ऑफर स्वीकारली आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पूजाला आपल्या घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. पूजाचे वडील, विलास सावंत हे एक रंगमंचावरील उत्तम आणि नावाजलेले अभिनेते आहेत.
त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर पूजाचे आजोबादेखील रंगमंच अभिनेता होते. त्यामुळे हे बाळकडू पूजाला तिच्या घरातूनच मिळाले असं म्हणणं चुकीचे ठरणार नाही. आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये, दमदार अभिनय आणि सुंदर व निरागस चेहऱ्याने पूजा सावंतने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून नाही पहिले.
झकास, पोस्टर बॉईज, गोंदण, सांगतो ऐका, दगडी चाळ २, वृंदावन यासारख्या सुपरहिट मराठी सिनेमामध्ये पूजाने काम केले आहे. लपाछपी या सिनेमामध्ये तिने केलेल्या अभिनयाचे सगळीकडेच तोंडभरून कौतुक करण्यात आले. हा सिनेमा इतका जास्त गाजला आहे की, हिंदीमध्ये त्याचा रिमेक बनवण्यात येत आहे. जंगली सिनेमामधून विद्युत जामवाल सोबत काम करत तिने बॉलीवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे.
पूजा सावंत सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच पूजा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील देखील काही खास क्षण पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. तिच्या वैयक्तिक फोटोजमध्ये कायम तिच्यासारखी दिसणारी एक मुलगी बघायला मिळते. हि मुलगी अजून कोणी नसून, तिचीच सख्खी बहीण रुचिरा आहे.
रुचिरा सावंत देखील आपल्या बहिणीप्रमाणेच कमालीची सुंदर आहे. तीदेखील सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते आणि अनेकवेळा पूजा सोबत आपले फोटोज शेअर करतच असते. अनेकांना, रुचिरा अगदी हुबेहूब पूजासारखीच दिसते. त्यामुळे अनेकवेळा, रुचिराला ‘तू सुद्धा अभिनय क्षेत्रात प्रवेश करणार का?’ असा प्रश्न विचारला जातो. मात्र, रुचिराला अभिनयात रस नसून, ती स्वतः त्यापासून दूरच ठेवते.
‘पूजा मोठी बहीण असली तरीही ती अगदी माझ्या मैत्रिणीसारखीच आहे. तिने खूप काही केलं आहे, मात्र अजून खूप काही तिला मिळवायचं आहे. कुटुंब आणि आपले करियर यांचे समतोल राखणे हीच तिची खासियत आहे. माझ्या बहिणीमुळे, अभिनयाचे दारे माझ्यासाठी नक्कीच खूली आहेत हे मला माहित आहे. पण मला अभिनयात काही रस नाही.’ असं रुचिराने एकदा सांगितलं होत.