साऊथच्या ‘या’ अभिनेत्याने 16 वर्षात केली 3 लग्न, बनला चार मुलांचा बाप, दुसरी पत्नी होती ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…

साऊथच्या ‘या’ अभिनेत्याने 16 वर्षात केली 3 लग्न, बनला चार मुलांचा बाप, दुसरी पत्नी होती ‘ही’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…

दक्षिणेतील चित्रपट आपण पाहिले असतील. दक्षिणचे चित्रपट म्हणजे एकदम मनोरंजनाचा खजाना असतो. प्रचंड मारधाड ॲनिमेशन आणि गाणी हे तिकडच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य असते. तसेच लोकेशन देखील यांचे फार छान ठरलेली असते. त्यामुळे दक्षिणेतील चित्रपट प्रचंड प्रमाणात चालताना पाहायला मिळतात. रजनीकांत यांनी हा ट्रेंड फार मोठ्या प्रमाणावर ठेवला आहे.

काही वर्षापूर्वी आलेला बाहुबली हा चित्रपट देखील प्रचंड चालला होता. बाहुबलीचा दुसरा भाग देखील मोठ्या प्रमाणात चालला होता. या चित्रपटाने अनेक मोठे विक्रम केले होते. दक्षिणेतील चित्रपट पाहायला एक वेगळीच मजा असते. त्यामुळे मराठीच्या तुलनेत दक्षिणेतील चित्रपट हे मोठ्या प्रमाणात हिट होत असल्याचे आपण पाहिले असेल. आम्ही आपल्याला आज एका अशा अभिनेता बद्दल माहिती देणार आहोत की, ज्याने दक्षिणेत नाव कमावले आहे.

मात्र, तो सध्या एका राजकीय पक्षामध्ये देखील आहेत. हा व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांचा भाऊ होय. चिरंजीवी याने काही वर्षांपूर्वी दक्षिणमध्ये प्रचंड यश मिळविल्यानंतर हिंदी चित्रपट देखील केली आहेत. हिंदी चित्रपटात त्याचे काही चित्रपट प्रचंड गाजले होते आणि काही वर्षांपूर्वी प्रजाराज्यम पक्ष स्थापन केला. या पक्षाचे बर्‍यापैकी आमदार तिकडे निवडून आलेले आहेत.

त्यानंतर चिरंजीवी आता राजकारणात स्थिरावलेला आहे. आज आम्ही आपल्याला चिरंजीवी यांचा भाऊ पवन कल्याण याच्याबद्दल माहिती देणार आहोत. पवन कल्याण दक्षिणेतील दिग्गज अभिनेता आहे. पवन कल्याण बाबत नुकतीच पोस्ट व्हायरल होत आहे. पवन कल्याण यांनी सोळा वर्षात तब्बल तीन लग्न केले असून त्यांना चार मुले आहेत. पवन कल्याण याने १९९७ मध्ये गोकुलमला सीमा या चित्रपटात मधून पदार्पण केले होते.

त्यानंतर त्याने बद्री, जोनी, अनावरण, पुल्ली या चित्रपटातून काम केले. यानंतर त्याला काही चित्रपट मिळालेले आहेत. 1997 ते 2013 या काळात पवन कल्याणी याने तब्बल तीन लग्न केले होते. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव नंदिनी असे आहे. मात्र, त्यांचा हा संसार केवळ दोन वर्षे टिकू शकला. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न हे रेणू देसाई यांच्यासोबत केले.

रेणू देसाई यांनी मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांच्यासोबत काम केले आहे. या दोघांना अथिरा आणि अध्या मुली आहेत. त्यानंतर त्याने दुसरे लग्न एका रशियन महिलेसोबत केले आहे. सध्या त्यांचा संसार चांगला सुरू आहे. पवन हा मार्शल आर्ट ट्रेनर देखील आहे. काही वर्षांपूर्वी पवन कल्याण याचा फोर्सच्या 100 श्रीमंतांच्या यादीत देखील क्रमांक लागला होता. त्यामुळे एकूणच पवन कल्याण याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *