OMG! ना जिम ना योग जेठालालनं ‘या’ ‘ट्रिक’ने घटवलं 10 किलो वजन; चाहत्यांना सांगितलं सिक्रेट..

मनोरंजन
फिटनेस हा सर्वांसाठी महत्त्वाचा असतो. मग ते सेलिब्रिटीज असतील किंवा सर्वसामान्य लोक. आपल शरीर फिट असेल तर भरपूर कामे अगदी सहजपणे आपण करू शकतो. शिवाय आपले शरीर उत्तम असेल तर काम करण्यासाठी नवीन ऊर्जा आपल्याला मिळते. त्यामुळे फिट राहणे हे सर्वात महत्त्वाचे असते.
फिटनेस वर काम केल्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते किंवा त्यापासून आपण दूर राहतो. त्यामुळे आज काल सर्वच जण फिटनेस कडे लक्ष केंद्रित करून आहेत. बरेच सेलिब्रिटीज फिटनेससाठी हवं ते करायला तयार असतात. अनेक सेलिब्रिटी त्यासाठी चांगलेच पैसे खर्च करतात. कित्येक तास जिम मध्ये घालतात आणि आपल्याला हवी तशी बॉडी बनवतात.
त्यासाठी बर्याच वेळा कृत्रिम प्रोटिन्स चा देखील ते वापर करतात. मात्र कृत्रिम प्रोटिन्स शरीरासाठी हानिकारक ठरते, हे पुढे गेल्यावर लक्षात येते. त्यामुळे योग्य आहार आणि योग्य व्यायाम हा हेच फिटनेसचे मूलमंत्र आहे, हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. आणि हेच पुन्हा एकदा तारक मेहता का उल्टा चश्मा या प्रसिद्ध कलाकाराने देखील सिद्ध केले आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या आवडीची आहेत. अनेकांना तर ती स्वतःच्या आसपासचीच पात्रे आहेत असे वाटते, त्यामुळे या या मालिकेची लोकप्रियता प्रचंड आहे.
या मालिकेतील मुख्य पात्र अर्थात जेठालाल हे कायमच चर्चेत असते जेठालाल यांची व्यक्तिरेखा दिलीप जोशी या कलाकाराने साकारली आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी दिलीप जोशी नेहमीच प्रकाश झोतात असतात. आता पुन्हा एकदा दिलीप जोशी आपल्या फिटनेस मुळे प्रकाश झोतात आले आहेत. गेली कित्येक वर्षे ते चित्रपट सृष्टी मध्ये काम करत आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत काम करण्यापूर्वी त्यांनी अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र जेठालालची भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरली आणि याच भूमिकेने दिलीप जोशी यांना जेठालाल ही ओळख दिली. दिलीप जोशी अर्थात जेठालाल एक खाऊन पिऊन सुखी असलेल्या कुटुंबातील व्यक्ती, असे पात्र आहे. त्यामुळे त्यांचे वजन थोडेसे जास्तच होते.
मात्र वयानुसार आता दिलीप जोशी यांनी आपले वाढते वजन नियंत्रणात आणलेच नाही तर कमी देखील केले आहे. यात कौतुकास्पद आणि विशेष बाब ही की, त्यांनी कोणताही योगा क्लास किंवा जिमची मदत न घेता तब्बल दहा किलो वजन घटवले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप जोशी यांनी कोणत्याही एक्झरसाइज शिवाय दहा किलो वजन कमी केले आहे.
याबद्दल त्यांना विचारले असता दिलीप जोशी म्हणाले की, ‘मध्यंतरी माझा वजन चांगल्या प्रमाणात वाढलं होतं. वाढलेल्या वजनामुळे मला शारीरिक त्रासाचा सामना करावा लागत होता. म्हणून वजन कमी करायचं असा निश्चय मी मनाशी केला. सहाजिकच अभिनेता असल्यामुळे आमच्या शूटिंगच्या वेळा कधीच ठरलेल्या नसतात.
वेगवेगळ्या सीन साठी वेगवेगळे शेडूल असते, मग ह्या बिझी शेड्युलमधून जिम आणि इतर गोष्टींसाठी वेळ मिळणं माझ्यासाठी अवघडच होतं. म्हणूनच मी दुसरा पर्याय अवलंबला. आपल्या आहारात बदल केला. आणि एकदम खडक असे डायट मी फॉलो केले.
या डायट मुळे माझे वजन कमी झाले.मी जवळपास दहा किलो वजन कमी केले आहे, त्यामुळे आता मला फिट असे वाटत आहे. आतूनच एक वेगळी ऊर्जा मला जाणवत आहे.’ जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांच्यामध्ये झालेला हा बदल बघून त्यांचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या वजनाची चांगली चर्चा होत आहे.