नेहा कक्करने चाहत्यांना दिली गुडन्यूज, भावुक पोस्ट करत म्हणाली…

नेहा कक्करने चाहत्यांना दिली गुडन्यूज, भावुक पोस्ट करत म्हणाली…

मनोरंजन

बॉलीवूडमधील सर्वोत्तम गायिका म्हणून आज नेहा कक्करचे नाव सगळ्यात पुढे आहे. आपल्या आवाजाने आणि दमदार गायिकेने नेहाने सगळ्यांचा अक्षरशः वे’ड लावलं आहे. आपल्या मेहनत आणि सुंदर आवाजासोबत उत्तम अशा गाण्याच्या खास शैलीमुळे नेहा देशातील एक सर्वात नावाजलेली सेलेब्रिटी आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर सध्या नेहा बसलेली आहे.

मात्र हे स्टारडम किंवा ही प्रसिद्धी नेहाला एका रात्रीतून मिळालेली नाहीये. तिला हे यश आणि कीर्ती कमावण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यामुळेच आज ती अनेक नव्या, गायिका-गायिकांची प्रेरणास्तोत्र बनली आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर बसलेली नेहा कायमच चर्चेत असते. विवाह करण्यापूर्वी आपल्या बॉयफ्रेंड सोबत असलेल्या नात्यामुळे ती चर्चेत असायची.

माघील वर्षी अचानकच नेहाच्या लग्नाची बातमी समोर आली आणि अनेकांना धक्का बसला. तिने अचानकच रोहनप्रीत सोबत विवाह केला, त्यामुळे तिच्या फॅन्सला एक सुखद ध’क्का बसला होता. रोहनप्रीत आणि नेहाचे एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. ते अनेकवेळा आपल्या सोशल मिडियावरून, काही खाजगी फोटोज शेअर करतच असतात.

नेहा आणि रोहनप्रीतच्या जोडीला त्यांचे फॅन्स रबने बना दि जोडी असच म्हणतात. विवाह झाला आणि त्यानंतर काहीच दिवसात नेहा प्रे’ग्नन्ट असल्याची बातम्या सुरु झाल्या. कदाचित त्यामुळेच नेहाने असं अचानक, गुपचूप लग्न केलं असावं असं देखील अनेकजण बोलू लागले. मात्र, नेहाचा तो प्रे’ग्न’न्ट असण्याचा लूक एका गाण्यासाठी होता, असं समोर आलं आणि ट्रो’लर्स गप्प झाले.

त्यानंतर देखील अनेकवेळा त्या दोघांचे फोटोज सोशल मीडियावर बघायला मिळतात आणि त्यावर अक्षरशः लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पडतो. नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूकमध्ये फोटोज शेअर करणाऱ्या नेहाचा लूक मात्र काही दिवसांपासून चांगलाच बदललेला बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या पतीसोबत ती एअरपोर्टवर दिसली होती, तेव्हा देखील तिचा लूक काही वेगळा होता.

दरम्यान, नेहाने एक गुडन्यूज दिली आहे, ही गुड न्यूज अर्थातच कसली, याबाबतचा प्रश्न तुम्हालाही पडला ना? तर, ही गुडन्यूज बाळाची वगैरे नसून नात्याच्या वर्षपूर्तीची आहे. नेहा आणि रोहनप्रीत त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका खास ठिकाणी गेले.

रोहनप्रीतनंही या सुरेख प्रवासाला एक वर्ष पूर्ण होण्यानिमित्त खास भावनिक पोस्ट लिहित काही फोटोही शेअर केले. ‘मागच्या वर्षभरात माझं आयुष्य… काही अनमोल आणि कायमस्वरुपी स्मरणात रातील असे क्षण मी सर्वात अमूल्य अशा व्यक्तीसोबत, माझ्या जीवाभावाच्या व्यक्तीसोबत (नेहासोबत) जगलो.’ असं त्यानं लिहिलं.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *