कधीकाळी भाड्याच्या खोलीत राहणारी नेहा कक्कर आज आहे इतक्या कोटींची मालकीण..पहा एका गाण्यासाठी घेते तब्बल एवढे रुपये…

बॉलिवूडमधील आघाडीची गायिका म्हणून नेहा कक्कर हिच्याकडे पहाण्यात येते. नेहा कक्कर ही आज खूप प्रसिद्ध अशी गायिका बनली आहे. मात्र, कधीकाळी नेहा कक्कर ही पाचशे रुपयांसाठी जागरणा मध्ये गीत गायन करायची. आज आम्ही आपल्या नेहा कक्कर हिच्या या सर्व बाबींबद्दल माहिती सांगणार आहोत.
नेहा कक्कर सध्या इंडियन आयडलच्या शोमध्ये ज ज भूमिकेत दिसली होती. आज ती आपल्या पतीसोबत वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. तिने आपल्या वाढदिवसाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे. लग्नानंतर हा माझा पहिलाच वाढदिवस आहे, असे तिने फोटोखाली म्हटले आहे.
नेहा कक्कर हिने आपल्या करिअरची सुरुवात देखील इंडियन आयडॉलमधून केली होती. इंडियन आयडल मध्ये ज्या वेळेस ती आली होती, त्यावेळेस ती अकरावीला होती. मात्र, दुर्देवाने त्यावेळी तिचे सलेक्शन झाले नव्हते. मात्र, त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने अनेक हिट अल्बम दिलेले आहेत.
मिले हो तुम हमको, हा तिचा अल्बम प्रचंड गाजलेला आहे. नेहा कक्कर हिच्या घरची परिस्थिती त्या काळात अतिशय गरिबीची होती. नेहा कक्कर हिचा जन्म एका पंजाबी कुटुंबात दिल्ली येथे झाला होता. त्यानंतर तिने आपले शिक्षण दिल्लीतच पूर्ण केलेले आहे. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ती सोनू देवीच्या जागरणामध्ये भजन करायची.
यासाठी तिला केवळ पाचशे रुपये मिळाले. नेहा कक्कर हिचे वडील एका कॉलेजच्या बाहेर समोसे विकण्याचे काम करत होते. मात्र, कालांतराने नेहा कक्कर हिला शो मिळू लागले आणि त्यानंतर तिला काही अल्बम मध्ये देखील काम मिळाले. आता ती चित्रपटात देखील गायन करत असते. तिने आजवर दिलबर यासह इतर हिट गाणे दिलेले आहेत.
तिच्याकडे आगामी काही ऑफर देखील असल्याचे सांगण्यात येते. नेहा कक्कर हिच्याकडे आज अलीशान अशा गाड्या आहेत. नेहा कक्करकडे ऑडी क्यू सेवन ही गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास 70 लाख ते 1 कोटी रुपयांच्या घरामध्ये असल्याचे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे तिच्याकडे मर्सडीज गाड्यांची रांग असल्याचे देखील सांगण्यात येते.
ती सध्या मुंबईतील ज्या फ्लॅटमध्ये राहते त्या फ्लॅटची किंमत जवळपास 1 कोटी वीस लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. तिचा हा फ्लॅट वर्सोवा येथे असून हा फ्लॅट थ्री बीएचके आहे. नेहा कक्कर एका शोसाठी जवळपास 25 लाख रुपये आकारत असल्याचे सांगण्यात येते. तसेच ती इंडियन आयडलमध्ये जज देखील आहे.
एका चित्रपटातील एका गाण्यासाठी नेहा कक्कर ही 10 ते 15 लाख रुपये आकारत असल्याचे सांगण्यात येते. नेहा कक्करकडे आज दिमतीला जवळपास 38 कोटी रु’पयांची संपत्ती असल्याचे सांगण्यात येते. एकेकाळी पाचशे रुपये रोजावर काम करणारी ही गायिका आज कोट्यवधीची मालकीण बनली आहे. अशी कमाई करण्यासाठी प्रयत्न गरजेचे असतात, त्याशिवाय नशिबाची साथ असावी लागते, असेही तिने सांगितले आहे.